कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्या भाट-तामचीकरला गरबा खेळण्यास मज्जाव

ऐश्वर्याच्या पतीनेही या बहिष्काराचा फेसबुकवर पोस्ट लिहून निषेध नोंदवला आहे

2 357

कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्या भाट-तामचीकरला गरबा खेळण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.

पिंपरी चिंचवडच्या भटनगरमध्ये हा प्रकार घडला. खराडीत राहणारी ऐश्वर्या माहेरी आल्याने भटनगरमधील देवीच्या दर्शनाला गेली होती. तेव्हा ती इतर महिलांसोबत दांडिया खेळू लागली. मात्र मंडळाने हे पाहताच दांडिया खेळ बंद केला आणि डिजे सुरू केला. तिथे असलेले तरूण डिजेवर नाचू लागले. ऐश्वर्या तिथे काही वेळ थांबली होती. मग तिने एका मैत्रिणीला बोलावले, मैत्रिणीला तिथेच थांबवून ती पिंपरी पोलीस चौकीत गेली ऐश्वर्या तिथून गेल्याचं पाहताच दांडिया पुन्हा सुरु झाल्याचे तिच्या मैत्रिणीने तिला कळवलं.

कौमार्य चाचणीला विरोध केल्यानेच मला गरबा खेळू दिला नाही असा आरोप ऐश्वर्याने केला आहे. जानेवारी महिन्यापासून ऐश्वर्या आणि कंजारभाट समाजातील इतर तरूण-तरूणींना कौमार्य चाचणीला विरोध दर्शवला आहे. एवढेच नाही तर सोशल मीडियावर Stop The V Ritual या नावाने ग्रुप तयार करून हे तरूण-तरूणी एकवटलेत.

”पिंपरीतील कंजारभाट समाजातील गुंडांनी पुन्हा एकदा पुरुषार्थ दाखवून दिला. निषेध! निषेध! निषेध! माझ्या पत्नीने या जात गुंडांच्या कौमार्यपरिक्षणाच्या अमानुष प्रथेविरोधात हिंमतीने लढा दिला म्हणून तिला दांडिया, गरबा खेळण्यास मनाई करून बहिष्काराचं कृत्य करण्यात आलंय, कौमार्य परिक्षण करणाऱ्यांनी नवरात्रीत देवीची पूजा करणे हे निव्वळ ढोंग आहे.” अशी फेसबुक पोस्ट ऐश्वर्याचा पती विवेक तामचीकर याने लिहिली आहे.

बातमीचा स्रोत : https://www.loksatta.com/pune-news/pimpri-youthopposed-asihwarya-bhat-for-playing-dandiya-who-campaigning-against-virginity-1772374/?utm_source=izooto&utm_medium=push_notification&utm_campaign=browser_push&utm_content=&utm_term=

2 Comments
 1. rawsaheb gawade says

  Majhya patnichi macik pali kadhi 28 divsani tar kadi 30 tar32 divsani yate ya mule garodhr rahanes adthala yeu shakto ka

  1. lets talk sexuality says

   एखाद्या वेळी असे झाले तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. मात्र हे सारखं असंं होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य.
   दर महिन्याला पाळी येत असल्यास मुल होण्यासाठी काही अडचण वाटत नाही.पण मुल होणे वा न होणे यासाठी खूप गोष्टी जुळून याव्या लागतात, जशा की गर्भधारणेचा काळ, अंडोत्सर्जन, इ.,त्यासाठी तुम्हाला गर्भधारणा कशी होते हे पहावे लागेल, याबाबत अधिक माहितीसाठी http://letstalksexuality.com/conception/ ही लिंक नक्की पहा.
   पाळी चुकण्याची, लवकर येण्याची किंवा लांबण्याची अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.
   काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
   पाळी चक्राबाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंक पाहा.
   http://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/
   http://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/

   पुढील वेळी इथे प्रश्न न विचारता http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंकवर जाऊन प्रश्न विचारा.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.