जाणून घ्या, कलम ३७७ नेमके काय ?

0 205

मुंबई | Updated: January 8, 2018 5:09 PM

सुप्रीम कोर्टाने भारतीय दंड विधानातील (आयपीसी) कलम ३७७ बाबत पुनर्विचार करणार असल्याचे स्पष्ट केल्याने समलैंगिकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या समाजसेवी संघटनांना दिलासा मिळाला आहे. मात्र, नेमके हे कलम काय आणि डिसेंबर २०१३ मध्ये सुप्रीम कोर्टाने याबाबत काय निकाल दिला होता याचा घेतलेला हा आढावा….

 कलम ३७७ नेमके काय?

लॉर्ड मॅकॉले यांनी भारतीय दंड संहिता १८६० साली तयार केली. या संहितेवर अर्थातच ब्रिटिश कायद्यांची छाप होती. आयपीसीतील कलम ३७७ नुसार ‘अनैसर्गिक संभोग’ हा गुन्हा ठरतो. या कलमाअंतर्गत दोषी ठरल्यास १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड अशी तरतूद आहे.

 अनैसर्गिक संभोग म्हणजे काय ?

अनैसर्गिक संभोग म्हणजे ज्या संभोगातून प्रजनन होणार नाही असा संभोग. संभोग हा फक्त प्रजननासाठीच केला पाहिजे ही धारणा या मागे आहे. त्यामुळे साहजिकच हे कलम लेस्बियन, गे, बायसेक्शूअल आणि ट्रान्सजेंडर यांना लागू झाले. इतकेच नव्हे, तर या कलमानुसार एखाद्या प्रौढ विवाहित स्त्री व पुरुष जोडप्याने संमतीने प्रजनन होणार नाही, असे संबंध ठेवले तर तो देखील गुन्हा ठरतो.

दिल्ली हायकोर्टाने दिलेला निकाल काय होता?

दिल्ली हायकोर्टाने २ जुलै २००९ मध्ये ऐतिहासिक निकाल दिला होता. दिल्ली हायकोर्टाने समाजसेवी संघटनांची याचिका मान्य करत समलिंगी प्रौढांमध्ये संमतीने असलेले संबंध कायदेशीर ठरवले होते. नाझ फाऊंडेशन या संस्थेने २००१ मध्ये याचिका दाखल केली होती. दोन प्रौढ व्यक्तींमधील खासगी लैंगिक संबंध जर संमतीने असतील तर तो गुन्हा नाही, असे हायकोर्टाने स्पष्ट केले होते.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/what-is-section-377-in-ipc-naz-foundation-unnatural-sex-crime-in-india-delhi-high-court-supreme-court-1613123/

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.