तिहेरी तलाक प्रथा अत्यंत वाईट, अनिष्ट!

मासिक पाळीचा विषय चर्चेला आला असून या काळात महिलांना एक दिवसाची पगारी रजा देण्यात यावी अशी मागणी होत आहे

0 428

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मुस्लिमांमध्ये विवाहसंबंध संपविण्याची ‘तीन वेळा तलाक’ ही प्रथा विशिष्ट विचारसरणीच्या गटांच्या मते ‘कायदेशीर’ असली तरी प्रत्यक्षात ‘अत्यंत वाईट’ आणि ‘अनिष्ट’ आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले. वरिष्ठ वकील राम जेठमलानी यांनी पीडितांच्या बाजूने बेधडक युक्तिवाद केला.

तीन वेळा तलाक हा कायदेशीर आहे अशी विशिष्ट विचारसरणी आहे; परंतु ती विवाहसंबंध संपविण्याची अत्यंत वाईट आणि अनिष्ट प्रथा आहे, असे सरन्यायाधीश जे.एस. खेहार यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले. तीन वेळा तलाक प्रथेच्या कायदेशीरपणाला आव्हान दिलेल्या याचिकांवर न्यायालयात ११ मेपासून सुनावणी सुरू झाली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हे निरीक्षण व्यक्त झाले. माजी केंद्रीय मंत्री व वरिष्ठ वकील सलमान खुर्शीद हे या विषयावर न्यायालयाला वैयक्तिक पातळीवर मदत करीत आहेत.

खुर्शीद म्हणाले की, ‘न्यायालयीन छाननी आवश्यक आहे, असा हा विषय नाही. याशिवाय महिलांना ‘निकाहनामा’मध्ये तलाकला ‘नाही’ म्हणण्याची अट नमूद करण्याचा हक्क आहे.’ न्यायालयाने खुर्शीद यांना तीन वेळा तलाकवर बंदी असलेल्या इस्लामिक आणि गैरइस्लामिक देशांची यादी करण्यास सांगितले.

पाकिस्तान, अफगाणिस्तान, मोरोक्को आणि सौदी अरेबिया या देशांत तीन वेळा तलाक म्हणून विवाहसंबंध संपविण्यास परवानगी नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले.

हे तिटकारा आणणारे आहे…-

वरिष्ठ वकील राम जेठमलानी यांनी पीडितांपैकी एकीची बाजू मांडली. त्यांनी बेधडकपणे युक्तिवाद केला आणि समानतेच्या हक्कांसह वेगवेगळ्या घटनात्मक पार्श्वभूमीवर तीन वेळा तलाकच्या प्रथेवर हल्ला केला. तीन वेळा तलाकचा हक्क हा फक्त पतीला आहे, पत्नीला नाही व त्यामुळे घटनेचे कलम १४ (समानतेचा हक्क)चा भंग होतो, असे म्हटले.

साभार: http://www.lokmat.com/national/triple-divorce-custom-very-bad-undesirable/

चित्र साभार: http://www.dnaindia.com/topic/triple-talaq

Leave A Reply

Your email address will not be published.