दिल्लीत महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर वीर्याने भरलेले फुगे फोडले…

0 519

अमर कॉलनी मार्केट परिसरात होळीच्या आधीच महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर वीर्याने भरलेले फुगे फोडण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर हा प्रकार पोस्ट केला. त्यानंतर या प्रकारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

लेडी श्रीराम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा धक्कादायक प्रकार शेअर केला आहे. त्यानंतर संबधीत व्यक्तीला शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. ही विद्यार्थिनी संध्याकाळी अमर कॉलनी मार्केट परिसरात आपल्या काही मैत्रिणींसोबत गेली होती. घरी परतत येताना तिच्यावर नेम धरून फुगे मारण्यात आले. तो माझ्या अंगावर फुटला. मात्र, यात पाणी नसून काहीतरी वेगळेच असल्याने मला धक्का बसला. कोणीतरी वीर्य फुग्यात भरून ते अंगावर फेकले होते. माझ्या काळ्या कपड्यांवर ते उठून दिसत होते, असे या मुलीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकले आहे. तिने याबाबतचे फोटोही शेअर केले आहेत.

या घृणास्पद प्रकारावर नागरिकांतून कारवाई करण्याची मागणी होत आहे. ‘पिंजरा तोड’ या संस्थेने या प्रकरणी निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बुरा ना मानो होली है’ ही एक ओळ बोलून अनेकांची मनमानी चालते, कित्येक महिलांचे विनयभंग केले जातात पण , यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही, म्हणूनच ‘बुरा क्यो ना मानो?’ या मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.