लैंगिकता म्हणजे?

लैंगिकतेची काही मूलभूत तत्वं

निवडीचा अधिकार, प्रतिष्ठा, वैविध्य, समानता आणि आदर हे पाच मानवी अधिकार आहेत. आणि हेच अधिकार लैंगिकतेची मूलभूत तत्वंदेखील आहेत. निवडीचा अधिकार स्वतःच्या लैंगिकतेबद्दळ निवड करण्याचा अधिकार प्रत्येकाला असायला हवा. ही निवड मुक्तपणे, कोणत्याही…

लैंगिकतेबद्दल का बोलायचं?

स्वतःच्या शरीराबद्दल, भाव भावनांबद्दल, प्रेम आणि आकर्षणाबद्दल, आजारांबद्दल आपण किती मोकळेपणी बोलतो? आपल्या इच्छा, आवडी, नावडी आपण स्पष्टपणे मांडू शकतो का? आपल्याला कोणत्या गोष्टी घाण किंवा घाणेरड्या वाटतात? आपल्याला कोणत्या गोष्टींची भीती…

लैंगिकता म्हणजे नक्की काय काय?

सगळ्यांना असं वाटतं की लैंगिकता म्हणजे लैंगिक संबंध, सेक्स किंवा त्याविषयीचे व्यवहार, वागणं, इत्यादी. पण लैंगिकता म्हणजे फक्त सेक्स नाही. आपण आपल्या मनात असणाऱ्या लैंगिक भावना कशा व्यक्त करतो, आपल्या लैंगिक आवडी आणि निवडी, आपले लैंगिक संबंध…

लैंगिकता म्हणजे फक्त लैंगिक संबंध नाही

आपण सगळे लैंगिक आहोत. लैंगिक क्रिया करत असलो किंवा नसलो तरीही आपण लैंगिक आहोत. लैंगिक असणं म्हणजे केवळ लैंगिक क्रिया करणं नाही. यात आपल्या भावना, विचार, दृष्टीकोण यांचाही समावेश होतो. एकमेकांचा आदर आणि संमती, एकमेकांना व स्वतःला सुखकर आणि…

लैंगिकता शिक्षण म्हणजे नेमकं काय… डॉ. मोहन देशपांडे

साभार - डॉ. मोहन देशपांडे, पालकनीती (सप्टेंबर-ऑक्टोबर 2009) लैंगिकता शिक्षण म्हणजे नेमकं काय... लैंगिकता म्हणजे काय हे समजण्यासाठी लैंगिकतेबद्दल शिक्षण घेणं गरजेचं आहे. पण लैंगिकता शिक्षण म्हणजे तरी नेमकं काय हा प्रश्न राहतोच. डॉ. मोहन…

लैंगिकता म्हणजे?

लैंगिकता लैंगिक असण्याशी संबंधित आहे. पण लैंगिकता म्हणजे फक्त लैंगिक संबंध नाही. लैंगिकता त्याहून खूप जास्त आहे. स्वतःच्या आवडी निवडी, इच्छा विचार, बंधनं अशा सगळ्या गोष्टी लैंगिकतेशी संबंधित असतात. काही जणांसाठी लैंगिक कल म्हणजे लैंगिकता…

आपली शरीरे

पुरुषाचं शरीर

XY गुणसूत्रं - आपल्या सर्वांचा जन्म स्त्री आणि पुरुष बीजाच्या संयोगातून झाला आहे. या दोन्ही बीजांमधून गुणसूत्रांच्या 23 जोड्या नव्या फलित बीजामध्ये येतात. यातल्या एका गुणसूत्राच्या जोडीवरून होणाऱ्या बाळाचं लिंग ठरतं. स्त्री बीजामध्ये केवळ X…

स्त्रीचं शरीर

XX गुणसूत्रं – आपल्या सर्वांचा जन्म स्त्री आणि पुरुष बीजाच्या संयोगातून झाला आहे. या दोन्ही बीजांमधून गुणसूत्रांच्या 23 जोड्या नव्या फलित बीजामध्ये येतात. यातल्या एका गुणसूत्राच्या जोडीवरून होणाऱ्या बाळाचं लिंग ठरतं. स्त्री बीजामध्ये केवळ X…

माणसाचं शरीर

माणसाच्या शरीरात काही अवयव शरीराच्या आत तर काही शरीराच्या बाहेर असतात. काही लैंगिक व प्रजनन अवयव सोडता स्त्री पुरुषांच्या शरीरात इतर अवयव सारखेच असतात. मुलीचं शरीर बहुतेक मुलींच्या शरीरात गर्भाशय, ग्रीवा, बीजकोष, बीजनलिका, योनि, स्तन आणि…

फर्टिलिटी अवेअरनेस – ओळख आपल्या पाळीचक्राची

मासिक पाळी कधी येणार किंवा अन्डोत्सर्जन कधी होणार हे आपलं आपल्याला समजू शकतं असं तुम्हाला जर कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? किंवा मासिक पाळीच्या चक्रामध्ये गर्भधारणा नेमकी कधी होऊ शकते हे कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय समजू शकतं हे…

शरीर साक्षरता – किशोरवयीन मुलांसोबत

किशोरवय हा वादळी काळ समजला जातो. लहान मूल मोठं होण्याचा म्हणजेच वयात येण्याचा हा काळ असतो. शरीरात, मनात, भावनांमध्ये झपाट्याने बदल होत असतात. आजूबाजूच्या किंवा मित्र मैत्रिणींच्यापेक्षा कधी कधी हे बदल जास्त वेगाने किंवा हळू होत असतात. अनेक…

शरीर साक्षरता– माझ्या शरीरावर माझा हक्क

आपल्या शरीराशी मैत्री करणे आणि त्यातून आपल्या शरीराबद्दल साक्षर होणे म्हणजे शरीर साक्षरता. माहिती घेणे, कोशल्यं शिकणे आणि त्या माहिती आणि कौशल्याचा वापर करणे हे साक्षरतेची लक्षणं आहेत. म्हणूनच शरीर साक्षरतेमध्ये माहितीसोबतच शरीराविषयीची,…

सगळं नॉर्मल आहे

काही वावगं नाही… सगळं नॉर्मल आहे…

आपण सगळे मानव आहोत. आपण सगळे एक आहोत तरी आपल्यातला प्रत्येक जण वेगळा आहे. माझा रंग काळा आहे पण माझी मैत्रीण गोरी आहे. मी जाड आहे तर माझा भाऊ लुकडा. काही जणांच्या शरीरात लिंग आणि वृषणं असतात तर काहींच्या शरीरात गर्भाशय आणि योनिमार्ग. काहींना…

अपंगत्व आणि लैंगिकता

लैंगिकतेबद्दल समाजात तसंही फारसं बोललं जात नाही. आणि मग जर कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असेल तर लैंगिकतेचा प्रश्न अधिकच बिकट बनतो. अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना जणू काही लैंगिक भावना नसतातच किंवा त्या नसाव्यत असाच समाजाचा समज असतो. पण हे खरं…

विविध प्रकारची लैंगिकता आणि लैंगिक कल

वयात आल्यावर किंवा वयात येत असताना आपल्यात लैंगिक इच्छा निर्माण होऊ लागतात. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटायला लागतं. त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांच्याबरोबर लैंगिक क्रिया करावी अशी इच्छा निर्माण व्हायला…

आपण सगळे वेगवेगळे आहोत!

आपण सगळे वेगवेगळे आहोत. आपला उगम एकच असला तरीही उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आपल्यामध्ये आज खूप वैविध्य आहे. वैविध्याचा विचार अनेक पद्धतींनी करता येतो. काही जण म्हणतात, अमुक एका प्रकारची संस्कृती, लोकं श्रेष्ठ आणि इतर कनिष्ठ. गोरे श्रेष्ठ,…

मैं ऐसा क्यूं हूँ? – शरीराची प्रतिमा

माझी उंची कमी हवी होती, माझे केस जरा अजून दाट हवे होते. माझ्या अंगावर फार केस आहेत किंवा मला एकदम सलमान खानसारखी बॉडी बनवायची आहे. बऱ्याच मुलींना करीनाची झीरो फिगर हवीहवीशी वाटत असते आणि बरीच मुलं आरशात हृतिक किंवा सलमान किंवा अरनॉल्ड पाहत…

प्रेम Frame

नकार कसा स्वीकारायचा?

तुम्हाला कोणी नकार दिला तर तुम्हाला राग येतो का? तुमचा प्रस्ताव किंवा मागणी समोरच्या व्यक्तीने धुडकावून लावली तर तुम्ही अस्वस्थ होता का, तुम्हाला संताप येतो का? तुमची हार झाली आहे किंवा तुम्ही अपयशी आहात असं तुम्हाला वाटू लागतं का? तुम्ही…

लिंगभावाची व्यवस्था

मर्द आणि मर्दानगी

हे शब्द आपल्या खूप परिचयाचे आहेत. लहानपणापासून खूपदा ऐकलेले असतात. मुख्यतः मर्द हा शब्द पुरुषांना उद्देशून वापरतात. पण मग पुरुष आणि मर्द हे समान अर्थी शब्द समजले जातात का? तर नाही. त्यात थोडा फरक आहे. जन्मतः ज्यांना लिंग असते ते सर्व पुरुष…

लिंगभाव आणि लैंगिकता

लैंगिक नात्यांमध्ये आणि संबंधांमध्ये मुलीने काय करायचं आणि मुलाने काय करायचं याच्या काही अपेक्षा असतात. तुम्ही कसं राहता, तुमच्या आवडी निवडी, कपडे, वागणं या सगळ्यावरच या भूमिकांचा आणि अपेक्षांचा परिणाम होतो. प्रेमामध्ये आणि सेक्समध्येही,…

मुलगी म्हणजे? मुलगा म्हणजे?

मुलीने असंच वागायचं आणि मुलाने तसंच वागायचं किंवा मुलगी म्हणजे गोरी, सुंदर, लाजाळू, प्रेमळ तर मुलं म्हणजे उंच, शक्तीवान, कमावते, धाडसी... असंच का बरं मानलं जातं? मुलीच घर चांगलं सांभाळू शकतात आणि तांत्रिक कामं पुरुषांनीच करावीत असं तरी का?…

लिंगभावाची व्यवस्था

घडवलेले स्त्री पुरुष - स्त्रिया नाजूक तर पुरुष ताकदवान - स्त्री गृहिणी तर पुरुष कुटुंबप्रमुख - स्त्रिया हळव्या असतात तर पुरुष डोक्याने काम करतात असे अनेक समज, नियम, अपेक्षा आपण ऐकतो, अनुभवतो. पुरुष किंवा स्त्री म्हणून आपण काय करायचं, कसं…

सीडॉ करार – स्त्रियांच्या हक्काचा जाहीरनामा

स्त्रिया अजूनही समान का नाहीत? सीडॉ कराराची 20 वर्षे देशाला स्वातंत्र्य मिळालं पण समाजाचा अर्ध भाग म्हणजेच स्त्रिया अजूनही स्वतंत्र नाहीत. देशात लोकशाही आली पण घरात मात्र अजूनही हुकुमशाहीच आहे. स्त्रियांवरचे भेदभाव दूर करण्याचं वचन शासनाने…

जाहिरातींमधले स्त्री आणि पुरुष

आपण सतत जाहिराती पाहत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. ज्या प्रॉडक्टची किंंवा वस्तूची जाहिरात आहे त्याची माहिती देण्यासोबतच जाहिराती आपल्याला इतरही अनेक गोष्टी दाखवत, सांगत असतात. बाई आणि पुरुषाच्या ठराविक प्रतिमांमधून काही गोष्टी आपल्याही नकळत…

मेरी मर्जी

या देशात आजही मुली स्वतंत्र नाहीत म्हणून?

कोल्हापूरच्या १७ वर्षांच्या ऐश्वर्या लाडचा खून तिच्या भावानेच केला. ती फॅशनेबल राहायची म्हणून? ती व्हॉट्सॅप, फेसबुकवर मुलांशी चॅट करायची म्हणून? ती कॉलेजच्या कॅऩ्टीनमध्ये मुलांशी बोलायची म्हणून? ती त्याच्यापेक्षा जास्त हुशार होती म्हणून? ती…

नात्यांमधले दबाव व नियंत्रण

नात्यांमधले दबाव, नियंत्रण ओळखणे प्रेमाच्या किंवा कोणत्याही जवळच्या नात्यामध्ये हक्काच्या किंवा मालकीच्या भावनेचा शिरकाव फार बेमालूमपणे होत असतो. आपल्याला प्रिय असणारी व्यक्ती ही आपल्या हक्काची, मालकीची असते असं कळत नकळत आपल्या मनावर…

जोडीदाराची निवड आणि अपेक्षा

आपला जोडीदार कसा असावा, दिसायला आणि वागायला कसा असावा यासंबंधी आपल्या काही कल्पना असतात. काही वेळा कल्पना स्पष्ट असतात तर काही वेळा जराशा धूसर. आपल्या मनात असणारा किंवा असणारी व्यक्ती आपल्याला जोडीदार म्हणून मिळेल असंच नाही. अनेक वेळा…

संमती म्हणजे काय?

आपण काय करतोय ते पूर्ण माहित असताना, आपण जे काय करतोय त्याचे परिणाम काय होऊ शकतात ते माहित असताना दिलेली म्हणजे माहितीपूर्ण संमती (इन्फॉर्म्ड कन्सेन्ट). दबावाखाली, धमकी देऊन, इमोशनल ब्लॅकमेल करून (उदा. तू माझ्याबरोबर संबंध ठेवले नाहीस तर…

सेक्स बोले तो

गर्भधारणा नक्की कशी होते?

गर्भधारणा कशी आणि कधी होते हे फारच इंटरेस्टिंग आहे. स्त्री आणि पुरुष किंवा नर आणि मादीच्या मिलनातून नवा जीव जन्माला येतो. प्रत्येक प्रजातीमध्ये हे मिलन कसं होतं आणि गर्भधारणेची प्रक्रिया कशी होते यात फरक आहेत. बहुतेक स्त्रियांच्या शरीरात…

नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी

एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी, शारीरिक ओढ म्हणून किंवा कधी कधी जबरदस्तीनेही लैंगिक संबंध केले जातात. लैंगिक संबंधांमध्ये गर्भधारणेची शक्यता असते. ही गर्भधारणा नको असेल तर त्यासाठी काही साधनं किंवा पद्धती वापरता येतात. यांना…

सुरक्षित, सुखकर लैंगिक संबंध

लैंगिक संबंध सुखकर असायला पाहिजेत. तसंच ते सुरक्षित असणंही आवश्यक आहे. सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे असे संबंध ज्यात जबरदस्ती नाही ज्यामध्ये नको असलेल्या गर्भधारणेची भीती नाही ज्यामध्ये एकमेकांना लिंगसांसर्गिक आजाराची लागण होण्याचा धोका नाही…

सेक्ससाठी तुम्ही तयार आहात का?

सेक्ससाठी तुम्ही तयार आहात का हे कसं ओळखाल? काही प्रश्न दिले आहेत. त्याची उत्तरं होय असतील तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात, तुम्हाला मनापासून सेक्स करावंसं वाटत आहे का? तुमच्या भावनांवर विश्वास ठेवा. तुम्हाला आतून जे वाटत असतं त्याकडे…

सेक्स किंवा लैंगिक संबंध

दोन व्यक्तींमध्ये होणारे लैंगिक संबंध म्हणजे सेक्स. यामध्ये विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. शारीरिक जवळीक, स्पर्श, प्रणय आणि संभोग अशा विविध प्रकारे लैंगिक संबंध ठेवले जातात. संभोग म्हणजे पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनिमध्ये…

आह से आहा तक – लैंगिक पूर्ती किंवा ऑरगॅझम

आला तो क्षण आला किंवा छ्या... आजही तेव्हाइतकं छान वाटलं नाही... लैंगिक संबंधानंतर मनात असे विचार येतातच. कारण प्रत्येक वेळी लैंगिक पूर्तीचा किंवा ऑरगॅझमचा अनुभव येईलच असं नाही. लैंगिक सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना आणि जाणिवा वेगवेगळ्या…

लैंगिक आरोग्य

लैंगिक आरोग्य म्हणजे नक्की काय? - लैंगिक आरोग्य म्हणजे केवळ आजाराचा अभाव नाही तर एकूणच स्वस्थ आणि निरोगी असणे. - लैंगिक आरोग्यामध्ये आदर, सुरक्षितता, भेदभाव व हिंसेपासून मुक्ती या मूल्यांचाही समावेश होतो. - लैंगिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी…

धोकादायक गर्भनिरोधके

गर्भनिरोधक पद्धतींचा विचार करताना त्यांचा फायदा काय आणि त्यांचे धोके काय या दोन्ही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. ज्या गरभनिरोधक पद्धती मासिक पाळीच्या चक्रामध्ये किंवा स्त्री बीज तयार होणं आणि अंडोत्सर्जन या प्रक्रियांमध्ये अडथळा आणतात…

सेक्सबद्दलचे काही समज-गैरसमज

सेक्सबद्दलचे काही समज-गैरसमज कौमार्य आपल्याकडे लग्नाआधी मुलीचं कौमार्य अबाधित राहिलं पाहिजे यावर फार मोठा भर दिला जातो. एखाद्या मुलीने किंवा मुलाने एकदाही लैंगिक संबंध ठेवले नसतील तर तिचं किंवा त्याचं कौमार्य अबाधित आहे असं मानलं जातं.…

सेक्सः लग्नाआधी का केवळ लग्नानंतर?

सेक्स किंवा समागम ही एकमेकांवरील प्रेमाची, शारीरिक ओढीची अभिव्यक्ती असू शकते. शरीराची गरज म्हणूनदेखील शरीरसंबंध ठेवले जाऊ शकतात. ती एक आदिम, मानवी प्रेरणा आहे. काहींना ती तीव्रपणे वाटते तर काहींना ती अजिबात वाटत नाही. आदिम काळापासून स्त्री,…

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे कायदे

विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे कायदे

अनेक प्रसंगांमध्ये आपल्याला कायद्याची गरज भासते. अन्यायाविरुद्ध आणि गुन्हा, आरोप सिद्ध करण्यासाठी कायद्याची किमान माहिती आवश्यक आहे. त्याच सोबत आपल्यावर चुकीचे आरोप होत असल्यास त्याचं खंडन करण्यासाठी देखील कायद्याची माहिती उपयोगी ठरते.…