मुलासाठी ‘वर’ संशोधन! गे मुलाच्या लग्नसाठी मातेची धडपड

मासिक पाळीचा विषय चर्चेला आला असून या काळात महिलांना एक दिवसाची पगारी रजा देण्यात यावी अशी मागणी होत आहे

0 814

मुंबई: मुंबईत एक आई आपल्या मुलासाठी नवरा शोधतेय… होय, मुलासाठी या मातेचं वरसंशोधन सुरू आहे…

आईनं अशी दिलीय जाहीरात –
वर पाहिजे
वय – 25 ते 40 वर्ष
चांगली नोकरी किंवा व्यवसाय हवा
शाकाहारी असावा आणि प्राण्यांवर प्रेम हवं
जाती-धर्माचं बंधन नाही

मेट्रोमेनियल वेबसाइटवर किंवा वर्तमानपत्रात अशा जाहिराती आपण नेहमीच पाहतो. एखाद्या वधूसाठी अशाप्रकारचं वरसंशोधन नेहमीच सुरूच असतं. पण यावेळी ही जाहिरात दिलीय ती एका मुलाच्या आईनं… होय… पद्मा अय्यर नावाची ही महिला आपल्या 36 वर्षांच्या मुलासोबत लग्न करण्यासाठी मुलगा शोधतेय. तिचा मुलगा हरीश गे आहे. गे चळवळीतला सक्रीय कार्यकर्ता ही त्याची ओळख… हरीशसाठी ती गे पार्टनर शोधत असून, आपल्या मुलाचं लग्न व्हावं, ही या मातेची इच्छा आहे.

ती आता 58 वर्षांची झालीय. आपल्या मुलाचा संसार बघण्याची तिचीही इच्छा आहे. त्यासाठीच या मातेची धडपड सुरू होती. मात्र मुलाच्या लग्नासाठी मुलगा हवा, ही जाहीरात छापायलाच सुरूवातीला कुणी तयार नव्हतं. कारण भारतात गे लोकांना कायद्यानं एकमेकांशी अधिकृत लग्न करता येत नाही. महत्प्रयासानं अखेर एका मेट्रिमोनियल साइटनं ही जाहिरात छापली. त्यावरून सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगलीय…

या वरसंशोधन मोहीमेला चांगला प्रतिसादही मिळतोय. मात्र तिच्या मुलाच्या लग्नात काही कायदेशीर अडचणी तर येणार नाहीत ना..? अशी शंकाही घेतली जातेय. पण सध्या तरी ही आई आपल्या मुलासाठी योग्य नवऱ्याची वाट बघतेय.

बातमी साभार: http://zeenews.india.com/marathi/news/mumbai/mother-look-for-groom-for-her-boy-for-gay-marriage/274956

चित्र साभार:  http://www.jpost.com/Israel-News/Wide-support-for-gay-marriage-as-Israel-celebrates-Pride-496348

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.