राज्यातील पुणे, सोलापूर, ठाणे, नागपूर या जिल्ह्यांमध्ये एचआयव्ही/एड्सशी मुकाबला करणाऱ्या व्यक्तींची संख्या सर्वाधिक

0 206

आज १ डिसेंबर जागतिक एड्स दिन एचआयव्ही/एड्सशी मुकाबला करणाऱ्या व्यक्तींच्या अधिकार संरक्षणाच्या मागणीसाठी हा दिवस महत्वाचा आहे. महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेच्या आकडेवारीतून महाराष्ट्रातील एचआयव्ही/एड्सशी मुकाबला करणाऱ्या व्यक्तींच्या बाबत काही वास्तव सोबत देत आहोत.

सोलापूर – राज्यातील पुणे, सोलापूर, ठाणे, नागपूर या जिल्ह्यांमध्ये एचआयव्ही/एड्सशी मुकाबला करणाऱ्या व्यक्तींची संख्या सर्वाधिक असून, त्यात पुणे (१७,९१६) राज्यात आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर सोलापूर (८,४०४) आहे. दुसरीकडे जळगावचा मृत्युदर सर्वाधिक २८ टक्के इतका आहे. महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेच्या आकडेवारीतून हे वास्तव समोर आले आहे.
राज्यात एड्‌सचा पहिला रुग्ण १९८६ रोजी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात आढळला. त्यानंतर १९९० ते २००० च्या दशकात राज्यात एचआयव्ही/एड्सशी मुकाबला करणाऱ्या  व्यक्तींची संख्या वाढल्याचे पाहायला मिळाले. एड्‌सपासून नागरिकांनी दूर राहावे म्हणून सरकारने विविध माध्यमांतून जनजागृतीपर कार्यक्रम, उपक्रम राबविले. त्यामुळे मागील काही वर्षांपासून एचआयव्ही/एड्सशी मुकाबला करणाऱ्याचे प्रमाण थोडेसे कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, तरीही राज्यात दररोज ३४ रुग्णांची भर पडत असून, दुसरीकडे दिवसाला सात रुग्णांचा मृत्यू एड्‌समुळे होत असल्याचेही समोर आले आहे. राज्यात २०१० ते २०१८ या काळात एक लाख सहा हजार ९३ जणांना एड्‌स झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये पुण्यातील तब्बल १७ हजार ९१६ जणांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात एचआयव्ही/एड्सशी मुकाबला करणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी असली तरी मृत्युदर मात्र सर्वांत कमी ७.८८ टक्के आहे. जळगावमध्ये गेल्या साडेआठ वर्षांत चार हजार ६५ रुग्ण आढळले, तर दुसरीकडे मृत्यूचा दर सर्वाधिक २८ टक्के इतका असल्याचे समोर आले आहे. त्यापाठोपाठ उपराजधानी असलेल्या नागपुरात कालावधीत सात हजार ६० रुग्ण आढळले तर दुसरीकडे त्या ठिकाणचा मृत्युदर २६ टक्के इतका असल्याची माहिती राज्याच्या एड्‌स नियंत्रण विभागाकडून सांगण्यात आली.

१० वर्षांत ४५८ कोटींचा खर्च
राज्यातील एड्‌सचे प्रमाण कमी करून त्यावर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने राबविलेल्या विविध उपक्रमांसाठी २००९ ते २०१८ या कालावधीत तब्बल ४५७.८६ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. दुसरीकडे याच कालावधीत राज्यातील एक लाख सहा हजार ९३ जणांना एड्‌स असून, त्यापैकी २१ हजार १९ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.

एच आय व्ही – एड्स

बातमीचा स्त्रोत : https://www.esakal.com/paschim-maharashtra/pune-solapur-highest-number-aids-158014

चित्र साभार: https://goo.gl/images/A86VHY

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.