विटाळाचे अभंग

1 585

पाळीच्या काळात बाईने काय करावं, काय करू नये यावरचा वाद सनातन आहे. धर्म, परंपरा, चाली रितींचं नाव घेताना काही परंपरा मात्र आपण विसरतो आहोत का? आपण सर्व जण एका स्त्रीच्या उदरात जन्मलो आहोत, ज्या रक्ताने आपलं पोषण केलं ते रक्तच विटाळ ठरवायचं हा कोणता न्याय आहे?

संत सोयराबाई या संत चोखामेळा यांच्या पत्नी. त्यांनी लिहिलेले हे ‘विटाळाचे अभंग’. आजच्या काळातही अंतर्मुख व्हायला लावतील असे!
देहासी विटाळ म्हणती सकळ।
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध।।

देहींचा विटाळ देहींच जन्मला।
सोवळा तो झाला कवण धर्म।।

विटाळ वांचोनी उत्पत्तेचे स्थान।
कोणा देह निर्माण नाही जगी।।

म्हणुनी पांडुरंगा वानितसे थोरी।
विटाळ देहांतरी वसतसे।।

देहाचा विटाळ देहीच निर्धारी।
म्हणतसे महारी चोखियाची।।

You might also like More from author

1 Comment

  1. साधना says

    भारी आहे अभंग

Leave A Reply

Your email address will not be published.