स्तनपानाचा फोटो छापणाऱ्या मासिकावर व मॉडेलविरोधात याचिका…

0 626

केरळमधील गृहलक्ष्मी मासिकाच्या मुखपृष्ठावर बाळाला स्तनपान करतानाचा मॉडेलचा फोटो छापल्यावरून वाद निर्माण झालेला असतानाच आता केरळमधील कोल्लम येथे या मासिकाच्या व मॉडेलच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पहिली सुनावणी १६ मार्च रोजी होणार आहे. ज्या पद्धतीने या मासिकाने महिलेला दाखवलं आहे ते दाखवणं अयोग्य आहे, असं याचिकाकर्त्याने याचिकेत म्हटले आहे.

या मासिकाच्या १ मार्च रोजी प्रकाशित झालेल्या आवृत्तीवर मॉडेल गिलू जोसेफ हिचा बाळाला स्तनपान करतानाचा फोटो छापण्यात आला आहे. समाजात ब्रेस्टफिडींग विषयी समाजात जनजागृती करण्यासाठी विशेषांक काढला होता. या विशेषांकात साडी नेसलेली मॉडेल कोणताही आडपदर न घेता थेट बाळाला स्तनपान करतानाचा फोटो मुखपृष्ठावर छापण्यात आला आहे. त्यासोबत “कृपया नजर रोखून बघू नका आम्ही बाळाला दूध पाजत आहोत.” असा संदेश पुरुषांसाठी देण्यात आलेला आहे. हा अंक प्रकाशित झाल्यानंतर या मुखपृष्ठावरील मॉडेलचा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडीयावर व्हायरल झाला. त्या फोटोवर अनेकांनी टीका देखील केली असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.