#MeToo… You too?

#MeToo... You too?

0 329

 

मागील काही दिवसांपासून #MeToo हा हॅशटॅग बराच ट्रेंड होत आहे. #MeToo तुम्ही कदाचित ऐकलं असेल. हॉलिवुड अभिनेत्री अलिसा मिलानो हिनं लैंगिक छळाविरूद्ध आवाज उठवण्याचं महिलांना आवाहन केलं होतं. हॉलीवूड चित्रपट निर्माता हार्वे वाईनस्टीन याच्याविरोधात लैंगिक छळ आणि मारहाणीच्या आरोपांनंतर अनेक महिलांनी सोशल मीडियावर #MeToo हॅशटॅग वापरून स्वत:चे अनुभव मांडायला सुरुवात केली. “लैंगिक छळवणूक किंवा लैंगिक अत्याचार सहन केला असेल, अशा सगळ्या स्त्रियांनी MeToo हे दोन शब्द त्यांचं स्टेटस म्हणून लिहीले तर कदाचित हा प्रश्न किती गंभीर आहे हे लोकांना लक्षात येईल,” असं अलिसानं तिच्या स्टेटसमध्ये लिहीलं होतं.

हा  हॅशटॅग  वापरून जगभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील स्त्रिया घराबाहेरचेच काय तर घरातही आलेले वाईट अनुभव शेअर करत आहेत. काही पुरुषांनी देखील हा हॅशटॅग त्यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाविषयी लिहिले. शिवाय अनेक पुरुषांनी लैंगिक छेडछाड हे पॉप्युलर पॉप्युलर कल्चर अर्थात समाजात रूढ झालेली गोष्ट आहे हे मानल्यामुळे महिलांना त्रास दिला असं मान्य केलं आणि आपली चूक झाल्याचं कबूल केलं.

मित्र मैत्रिणींनो, या सोशल मिडियावर चालू असलेल्या मोहिमेच्या निमित्तानं आपणही लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवूयात. लैंगिक छळाविषयी मोकळेपणानं बोलणं ही लैंगिक शोषण थांबविण्याची पहिली पायरी आहे. इतरांशी बोलल्यानं समस्या काय आहे, समस्येचं अस्तित्व आणि गांभीर्य काय आहे हे समजायला आणि पर्यायानं उपाययोजना शोधायला मदत होते. आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील, घडत असतील तर गप्प राहू नका. आपण गप्प राहिलो, सहन करत राहिलो तर समोरच्या व्यक्तीचं जास्त फावतं आणि शोषण तसंच चालू राहतं. स्वतःला दोष देऊ नका आणि उशिर करू नका. एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोला. तुमच्या आयुष्यातील किंवा आजूबाजूला घडणाऱ्या लैंगिक छळाच्या घटना किंवा तुम्ही अशा प्रसंगांवर कशी मात केलीत याविषयी आम्हाला tathapi@gmail.com  यावर नक्की लिहा. तुमची ओळख कुठेही उघड होणार नाही.

तुम्हाला याविषयी काही प्रश्न, शंका, असतील तर http://letstalksexuality.com/ask-questions/ यावर विचारा.

 

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.