Browsing Category

लिंगभावाची व्यवस्था

स्त्रिया नाजूक तर पुरुष ताकदवान, स्त्री गृहिणी तर पुरुष कुटुंबप्रमुख, स्त्रिया हळव्या असतात तर पुरुष डोक्याने काम करतात…
असे अनेक समज, नियम, अपेक्षा आपण ऐकतो, अनुभवतो. पुरुष किंवा स्त्री म्हणून आपण काय करायचं, कसं रहायचं हे आपण शिकतो आणि त्यासोबतच काय करायचं नाही, कसं वागायचं नाही हेही आपण शिकू लागतो. काही गोष्टी मुलग्यांसाठी योग्य किंवा चागल्या समजल्या जातात तर काही गोष्टी फक्त मुलींसाठी योग्य मानल्या जातात. या सर्व भावना, अपेक्षा आणि भूमिकांमुळे आपली विभागणी स्त्री, पुरुष आणि इतर अशी होते. स्त्रियांना आणि पुरुषांना काही विशेष अधिकार देण्याच आले आहेत तसंच त्यांच्यावर काही बंधनंही घालण्यात आली आहेत. या सर्व नियम आणि व्यवस्थेतून स्त्री आणि पुरुष घडवले जातात.
पण ही विभागणी समान नाही. यातल्या स्त्री पुरुषांच्या भूमिका सारख्या किंवा समान नाहीत. तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात किंवा ट्रान्सजेण्डर आहात यावर तुम्हाला मिळणारे अधिकार अवलंबून असतात. तुम्हाला किती स्वातंत्र्य आहे, तुम्ही तुमचे निर्णय स्वतःचे स्वतः घेऊ शकता का, तुम्हाला विकासाच्या संधींचा पुरेपूर लाभ मिळतो का या गोष्टी तुम्ही कोण आहात यावर अवलंबून असतात. स्त्रियांचं क्षेत्र म्हणजे घर या धारणेमुळे स्त्रियांवर मर्यादा आल्या तसंच पुरुष म्हणजे कर्ता कमवता, धाडसी, भवनिक नसणारा अशा अपेक्षांमुळे पुरुषावरही काही प्रमाणात मर्यादा आल्या. अर्थात त्यातून येणारे अधिकार स्त्रीपेक्षा पुरुषाकडे जास्त आहेत.
आपल्यावर लिंगभावाच्या या व्यवस्थेचा कसा परिणाम होतो, आपल्यावर कोणत्या मर्यादा येतात आणि कोणते अधिकार आपल्याला मिळतात ते तपासून पाहू या. मुलगी किंवा मुलगा या पलिकडे जाऊन आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्या जास्तीत जास्त कशा वापरू शकू यासाठी प्रयत्न करू या.

ज्यांना ‘मित्र’ नाहीत अशा सर्व पुरुष मित्रांसाठी….

१. परवा फारच अपसेट झालो होतो. वैयक्तिक कारण. (आपण पुरुष, मनातलं न बोलण्यासाठी, शेअरिंग टाळण्यासाठी हे कारण देत असतो नाही का? स्त्रियांनी केव्हाच ‘पर्सनल इज पॉलिटीकल’ चा स्वीकार केला आहे.) एकटाच कुठेतरी बसलो होतो. काही तरी करायला पाहिजे असं…

माझ्या आयुष्यातील घाणेरडं गुपित_ स्वाती भट्टाचार्य

मी माझे ऑफिस ५.३० ला सोडते. खरंतर हे माझ्या आयुष्यातील एक घाणेरडं गुपित आहे. जाहिरात क्षेत्रातील माझ्या २२ वर्षाच्या करिअरमध्ये JWT ला मी माझ्या रात्री दिलेल्या नाहीत. कदाचित हे थोडं विचित्र वाटत असेल, नाही ? मला खूपदा उशिरापर्यंत काम…

पुरुष आणि आभासी समानता- आनंद पवार

स्त्री-पुरुष विषमतेबद्दल आणि समानतेबद्दल पुरुष कसा विचार करतात? काय वाटतं त्यांना या विषयी? मागील दशकभराच्या अनेक स्तरांतील पुरुषांसोबत समानतेविषयक आम्ही सात्यत्याने करीत असलेल्या कामातून निदर्शनास आलेली काही निरीक्षणे येथे नोंदवणे आवश्यक…

प्रिय, काळ्या रंगाची मुलगी _ अरुंधती गडाळे

अगं खरंच तू माझ्यासाठी प्रियच आहेस आणि हो जगाला तुझा जो काळा रंग आवडत नाही न त्याच रंगामुळे तू मला प्रिय आहेस. अगं, माझ्या घरातल्या छोटीने पण मला एकदा विचारलं, “दीदी मी लहान होती तेव्हा काळी होते का ग?” चार वर्ष वयाच्या मुलीचा हा प्रश्न.…

स्त्री-चारित्र्य आणि लैंगिकता_ अॅड. लक्ष्मी सुभाष यादव

स्त्रीचे चारित्र्य हीच लैंगिकता:         “मला समदी लय नावाजत्याती. वांजुटी बाय पर कवाबी कुटंबी डोकवून बगितलं न्हाई,” घरकाम करून पोट भरणारी चाळीशीची सगुणा. चेहर्‍यावर अभिमान. नवरा वारल्यानंतर पुनर्विवाह, लैंगिक संबंध, सौभाग्यालंकार, मनासारखे…

वाजदा– क्रांतीचं एक छोटं पाऊल उचलणाऱ्या मुलीची कथा_निहार सप्रे

बहुतेक समाज व्यवस्थांमध्ये स्त्रियांवर लादली गेलेली अनंत बंधनं आपल्यासाठी नवीन नाहीत. अनेकदा ही बंधनं जशी व्यवस्थेचा भाग असतात तशीच कधी-कधी त्यांना माता, भगिनी, देवी, जन्मदाती, काळजी घेणारी, सपोर्टर अशा नावांखाली ग्लोरिफायही केलं जातं. काही…

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हे व्रत देशभरात फार मोठ्या प्रमाणावर साजरं केलं जातं. सत्यवान आणि सावित्रीची कथा पतिव्रता स्त्रीची, आपल्या पतीचे प्राण परत मिळवणाऱ्या आदर्श स्त्रीची कहाणी म्हणून सांगितली जाते. आपल्या पतीच्या आणि लेकरांच्या कल्याणासाठी…

अशी साकारली ‘सैराट’मधील स्ट्राँग आर्ची – ले. नागराज मंजुळे

मला पूर्वीपासून वाटत आलंय की, हिंदी किंवा मराठी चित्रपटसृष्टीतल्या मुली आणि बायका वीक असतात. निर्बुद्ध असतात, बाहुलीसारख्या येतात, नाचतात. स्लिम ट्रिम असतात. त्यांच्यात जिवंतपणा वाटत नाही. पण ‘सैराट’मधली आर्ची स्ट्राँग आहे, तिच्यात माझ्या…

तोडूया साचेबध्द प्रतिमा – “की अँड का” च्या निमित्ताने – निहार सप्रे

“स्त्री जन्माला येत नाही, तर ती घडवली जाते” – द सेकंड सेक्स, सिमोन द बोव्हुआर सिमोन द बोव्हुआर यांच्या या वाक्यात खूप मोठा अर्थ दडलाय जो आपल्याला एका क्षणात लिंगभाव व्यवस्थेमागील चाणाक्ष राजकारण दाखवतो. कोणत्याही व्यक्तीचे लिंग…

एकदा हातात झाडू घेऊन…

मुलगा म्हणजे शूरवीर, कर्तबगार, घराबाहेरची कामं करणारा आणि मुलगी म्हणजे दुबळी, नाजूक घरातली कामं करणारी असं जवळपास सगळ्याच मुला-मुलींच्या डोक्यात ‘फिट’ झालेलं असतं. पण खरंच असं आहे का हो? खरं तर लहानपणापासून मुला-मुलींना कसं वाढवलं जातं,…