Home / I Soch

I Soch

सध्या कॉलेजमध्ये आणि बाहेरही घडत असणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनी हिंसक व शोषण करणाऱ्या नातेसंबंधात अडकत आहेत तसंच मुली, छेडछाड वं लैंगिक हिंसाचाराला बळी पडत आहेत. त्यामुळे तातडीने या वयोगटातील मुला-मुलींशी संवाद वाढवण्याची गरज आहे. त्यांच्या स्वतःच्या व इतरांविषयी असणाऱ्या लैंगिकतेविषयी समजुती व दृष्टीकोण समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे व कोणावरती दोषारोप नं करता लैंगिकतेबद्दल सकारात्मक आणि निकोप संदेश पसरवणे गरजेचे आहे. गेल्या वर्षभरापासून, पुणे आणि परिसरातील ३० महाविद्यालयांमधून १६ ते २४ वयोगटातील मुला-मुलींबरोबर “आय सोच” हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाला National Foundation for India या संस्थेचे अर्थसहाय्य लाभले आहे. “आय सोच” प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे तरुण, कॉलेज वयीन मुलामुलींशी लैंगिकता या विषयासंबंधात एकत्र येऊन चर्चा करणे, त्यांचा दृष्टीकोण समजून घेणे, त्यांच्या शंका-कुशंकांना वाट मोकळी करून देणे व लैंगिकतेविषयी सकारात्मक संदेश पसरवून एक निकोप समाजाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणे. हे सर्व करताना एक मुख्य गोष्ट ध्यानात घेतली गेली आहे आणि ती म्हणजे लैंगिकते संबंधात चर्चेत येणारे सर्व मुद्दे जरी गंभीर असले तरी ते मूळ मुद्द्यापासून दूर नं जाता रंजक व गमतीशीर पद्धतीने मांडले जातात. मोबाईल व इंटरनेट या माध्यमांचा वापर करणे हा या प्रकल्पाचा एक मुख्य भाग आहे. प्रत्येक महाविद्यालयात तयार केलेल्या ४-५ मुला-मुलींच्या मुख्य गटांमार्फत मोबाईल व इंटरनेट च्या माध्यमातून सतत लैंगिकतेसंबंधित विविध विषयांवर चर्चा केली जाते उदाहरणार्थ लिंगभाव, सकारात्मक लैंगिक दृष्टीकोण, निकोप परस्पर संबंध, हिंसा इत्यादी. मुला-मुलींसोबत केल्या जाणाऱ्या चर्चांसोबत, लैंगिकतेविशयी सकारात्मक संदेश पोचवण्याकरीता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध ध्वनीचित्र फितींची निर्मिती करणे हा देखील या प्रकल्पाचा मुख्य भाग आहे.

‘आयकॉल’ हेल्पलाईन-०२२ २५५२११११

नाते संबंधातील ताणतणाव, नैराश्य, शोषण, हिंसा, घरगुती हिंसा, लैंगिकतेविषयीचे प्रश्न, कामाच्या ठिकाणच्या अडचणी, दुर्धर आजार, व्यसनाधिनता आणि करिअरविषयीचे प्रश्न यांसारख्या अनेक प्रश्नांचा सामना करत असताना आपल्याला ताणतणाव येऊ शकतो. भावनिक आणि मानसिक आधाराची गरज भासू शकते. टाटा समाजविज्ञान संस्थेची iCALL ...

Read More »

कनेक्टिंग हेल्पलाईन

नैराश्य, एकाकीपण, दुःख, ताण-तणाव आणि जीवनात येणा-या अडचणींचा सामना करताना अनेक जण नैराश्याच्या गर्तेत सापडतात आणि आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. आत्महत्या करून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘कनेक्टिंग’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे मानसिक आणि भावनिक आधार दिला जातो. आत्महत्या प्रतिबंध, आत्महत्येची घटना ...

Read More »

‘दंगल’ची उडी उंच पण सुवर्ण पदक दूरच…

नाट्य आणि वास्तव यांतील उत्तमाचा वेध घेऊ इच्छिणारा दंगल चित्रपट शेवटी अधांतरी लोंबकळत राहतो – तनूल ठाकूर. द वायर मधून साभार… बॉलीवूड चित्रपटांच्या सुरुवातीला येणाऱ्या नामावलीवर नजर टाकली असता, बरं वाटण्याचे प्रसंग क्वचितच येतात. दंगल आपल्याला हा अनुभव देतो. अगदी ...

Read More »

सूर जुळताना…

‘आम्ही जात-पात आजिबात मानत नाही’ असे आपण अनेक व्यक्तींकडून ऐकत असतो. स्वतःच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाचा विषय येतो, तेव्हा मात्र अनेकजण माघार घेताना दिसतात. जाती-पातीच्या भिंती तोडून, सामाजिक बंधन झुगारुन आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना आजही ...

Read More »

पिंकच्या निमित्ताने …

सध्या सुरु असलेल्या छेडछाड प्रतिबंध, बलात्कारांच्या घटना, मॉरल पोलिसिंग आणि  महिला सक्षमीकरण यावरील चर्चांच्या पार्श्वभूमीवर शुजित सरकार निर्मित ‘पिंक’ हा चित्रपट आला. याआधीही ‘फुल बने अंगारे (१९९१)’ ‘दामिनी (१९९३)’ या चित्रपटांमध्ये देखील बालात्काराविषयी चर्चा झाली. मात्र पिंक चित्रपटामध्ये स्त्रीचा निवडीचा अधिकार, ...

Read More »

‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग ३) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे

आंतरजातीय/धर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’ या लेखाचे पहिले दोन भाग तुम्हाला आवडले असतीलच. युवक-युवतींनी त्यांच्या मनातील या विषयाबद्दलच्या प्रश्न आणि डॉ. मेघा पानसरे यांनी दिलेली उत्तरे दुसऱ्या लेखात वाचली असतील. युवकांनी या विषयाबद्दलचे इतरही काही प्रश्न अगदी मनमोकळेपणाने विचारले होते, ते प्रश्न आणि ...

Read More »

वेबसाईटबद्दल तुम्हाला काय वाटते ?

मागच्या वर्षी तथापि संस्थेनं  लैंगिकतेबद्दल बोलण्यासाठी मनमोकळ्या संवादाची, विश्वासाची एक जागा (स्पेस) letstalksexuality.com  ही वेबसाईट खुली करून निर्माण केली. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावेत, लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं आणि प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील ...

Read More »

‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग २) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे

‘आंतरजातीय/धर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’ या लेखाचा पहिला भाग तुम्हाला आवडला असेलच.  या विषयावर ‘आयसोच’ ने एक कार्यशाळा आयोजित केली होती. यासाठी ‘भारतीय महिला फेडरेशनच्या कोल्हापूर’ च्या जिल्हाध्यक्ष तसेच, ‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्र, कोल्हापूर’ च्या सचिव, प्रा. डॉ. मेघा पानसरे यांना ...

Read More »

‘कॉलेज कट्टा, कट्यावरच्या गप्पा’- गौरी सुनंदा

कॉलेज कट्टा. शबनम, डॉली आणि राहुल रोजच भेटतात या कट्ट्यावर. कधी कॉलेज संपल्यावर तर कधी लेक्चर बंक करून. हा कट्टा म्हणजे सेकंड होमच आहे यांच्यासाठी. करमतच नाही यांना कट्ट्यावर आल्याशिवाय. इथे येऊन हे तिघे जण जगातल्या सगळ्या विषयांवर गप्पा मारतात. ...

Read More »

कॅश कमिटी- स्थापना आणि कार्य

पुरुषसत्ताक व्यवस्थेला छेद देऊन नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या. कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराला आळा घालण्यासाठी ‘कॅश कमिटी’ म्हणजेच ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ची  स्थापना करण्याचा नियम सरकारने केला. दोन वर्षापूर्वी ...

Read More »