Browsing Category

सगळं नॉर्मल आहे

आपण सगळे मानव आहोत. आपण सगळे एक आहोत तरी आपल्यातला प्रत्येक जण वेगळा आहे. माझा रंग काळा आहे पण माझी मैत्रीण गोरी आहे. मी जाड आहे तर माझा भाऊ लुकडा. काही जणांच्या शरीरात लिंग आणि वृषणं असतात तर काहींच्या शरीरात गर्भाशय आणि योनिमार्ग. काहींना दिसतं, ऐकू येतं तर काहींना नाही. काही जण प्रेमात पडतात तर काहींना प्रेमाशी काहीच देणं घेणं नसतं. काहींच्या शरीरावर केस असतात तर काहींच्या नसतात. तरीसुद्धा आपण सगळे मानव आहोत. आपली शरीरं जशी वेगळी आहेत तशाच आपल्या भावना आणि कल्पनादेखील भिन्न आहेत. आपल्या आवडी निवडी वेगवेगळ्या असल्या तरी आपला उगम एकच आहे.

काही मुलींना 10 व्या वर्षीच पाळी येते तर काहींना येतच नाही. काही मुलांना झोपेत वीर्य बाहेर येण्याचा अनुभव आला असेल तर काहींना नाही. काही स्त्रिया आई होतात तर काही ठरवून मुलं जन्माला घालत नाहीत. काहींना पुरुष आवडतात तर काहींना स्त्रिया. काहींना संग करायला, सेक्स करायला आवडतं तर काहींना त्यात काडीचा रस नाहीये.

या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. आपण जसे आहोत तसं असणं नॉर्मल आहे. आणि आपण इतरांपेक्षा वेगळे असलो तरी त्यात वावगं काही नाही.

थोडं समजून घेऊयात : भाग ३ – लिंगबदल शस्त्रक्रिया एक पुनर्जन्म

आपण आत्तापर्यंत ट्रान्सजेंडर  व लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याच्या आधी येणारे महत्वाचे टप्पे पाहिले. या लेखात लिंगबदल शस्त्रक्रिया  तसेच  पुरुषाचं स्त्रीत रुपांतर करताना व स्त्रीचं पुरुषात रुपांतर करताना काय काय पर्याय असू शकतात  व…

थोडं समजून घेऊयात : भाग २ – लिंगबदल शस्त्रक्रिया

मागील भागात आपण ‘ट्रान्सजेंडर’ म्हणजे काय? ट्रान्सजेंडरचं शारीरिकदृष्ट्या  व मानसिकदृष्ट्या भावविश्व काय असतं याबाबत माहिती घेतली, प्रत्येकाचा लिंगभाव नैसर्गिक आहे. तो शिकून- शिकवून घडत नाही हे ही पाहिलं या भागात आपण लिंगबदल शस्त्रक्रिया…

थोडं समजून घेऊयात : भाग १- ट्रान्सजेंडर

“मी संतोष चव्हाण (संती). मी ट्रान्सजेंडर आहे. मी नेहमी पँट आणि टॉपवर असते. मी अधूनमधून क्रॉसड्रेस (साडी, पंजाबी ड्रेस) करते. मी लहान असताना मुलींमध्ये खेळायचे. मुलांबरोबर खेळताना मला दडपण यायचं. मुलींमध्ये खेळताना खूप मजा यायची व मी…

मूकनायक : समलिंगी उभयलिंगी तृतीयपंथी द्विलिंगी मराठी साहित्य संमेलन

समाजाच्या मुख्य प्रवाहापासून आजवर नेहमीच दूर असलेल्या समलिंगी, उभयलिंगी, तृतीयपंथी, द्विलिंगी नागरिकांनाही त्यांच्या अभिव्यक्तीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने यंदा पहिल्यांदाच समलिंगी उभयलिंगी तृतीयपंथी द्विलिंगी…

माझा स्वत:ला शोधण्याचा प्रवास

काही वर्षांपूर्वी एका गोंधळलेल्या मन:स्थितीत मी ‘समपथिक ट्रस्ट' मध्ये पाऊल टाकले होते.  कामाच्या निमित्ताने पुण्यात राहत होतो, त्यावेळी तिथल्या सायकिअॅट्रिस्ट मॅडमना जेव्हा सगळं सांगितलं तेव्हा त्यांचे उत्तर फार गमतीशीर आणि सहज…

समलैंगिकता गुन्हा नाही: सुप्रीम कोर्ट !

समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड…

‘शब्दवेडी दिशा’ ची मुलाखत- भाग २

मागच्या भागात आपण  लैंगिक विविधता, स्वतःची लैंगिक ओळख आणि पुरुषसत्ताक समाजामध्ये लैंगिक वेगळेपण स्वीकारताना करावा लागणारा संघर्ष याविषयी दिशाची मुलाखत वाचलीत. आता मुलाखतीचा दुसरा  भाग वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे. हिजडा समाजातील नाती,…