Browsing Category

सगळं नॉर्मल आहे

आपण सगळे मानव आहोत. आपण सगळे एक आहोत तरी आपल्यातला प्रत्येक जण वेगळा आहे. माझा रंग काळा आहे पण माझी मैत्रीण गोरी आहे. मी जाड आहे तर माझा भाऊ लुकडा. काही जणांच्या शरीरात लिंग आणि वृषणं असतात तर काहींच्या शरीरात गर्भाशय आणि योनिमार्ग. काहींना दिसतं, ऐकू येतं तर काहींना नाही. काही जण प्रेमात पडतात तर काहींना प्रेमाशी काहीच देणं घेणं नसतं. काहींच्या शरीरावर केस असतात तर काहींच्या नसतात. तरीसुद्धा आपण सगळे मानव आहोत. आपली शरीरं जशी वेगळी आहेत तशाच आपल्या भावना आणि कल्पनादेखील भिन्न आहेत. आपल्या आवडी निवडी वेगवेगळ्या असल्या तरी आपला उगम एकच आहे.

काही मुलींना 10 व्या वर्षीच पाळी येते तर काहींना येतच नाही. काही मुलांना झोपेत वीर्य बाहेर येण्याचा अनुभव आला असेल तर काहींना नाही. काही स्त्रिया आई होतात तर काही ठरवून मुलं जन्माला घालत नाहीत. काहींना पुरुष आवडतात तर काहींना स्त्रिया. काहींना संग करायला, सेक्स करायला आवडतं तर काहींना त्यात काडीचा रस नाहीये.

या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. आपण जसे आहोत तसं असणं नॉर्मल आहे. आणि आपण इतरांपेक्षा वेगळे असलो तरी त्यात वावगं काही नाही.

मनाचिये गुंती- एका समलिंगी मुलाच्या आईची आत्मकथा…

मुलाने तो ‘गे’ आहे हे सांगताच लहानपणापासूनचे सर्व दिवस माझ्यासमोर आले. त्याचे ते सौम्य मृदुमुलायम वागणे, स्त्रीत्वाकडे झुकणारी त्याची मनोवस्था, कामाचा आढावा घेण्याची पद्धत आणि समज, इतरांच्या विशेषतः स्त्रियांच्या मनातील आचारविचार, त्यांच्या…

खऱ्या ‘आयडेण्टिटी’च्या शोधात – निहार सप्रे

My soul is from elsewhere, I’m sure of that, and I intend to end up there. - Rumi, From ‘The Essential Rumi’ खूपदा आपल्याला स्वतःबद्दल वेगळंच काहीतरी जाणवत असतं जे आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आयुष्यभर आपण काहीतरी वेगळे आहोत आणि…

लैंगिक कल बदलता येत नाही! – डॉ. भूषण शुक्ल

डॉ. भूषण शुक्ल हे नामवंत मानसोपचारतज्ञ आहेत. लैंगिकतेच्या विषयावर त्यांनी गेली पंधरा वर्षे काम केलं आहे. चार वर्षे त्यांनी इंग्लंडमध्ये एन.एच.एस (नॅशनल हेल्थ सर्व्हिस)मध्ये कामं  केलं. २००८पासून ते पुण्यात प्रॅक्टीस करत आहेत. त्यांच्याशी…

‘अलिगढ’च्या निमित्ताने – निहार सप्रे

सध्या मनोज वाजपेयीच्या 'अलिगढ' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. जोरदार अशा अर्थाने की हंसल मेहता दिग्दर्शित या सिनेमाचं ट्रेलर ए सर्टिफ़िकेट देउन युट्युबवर रिलीज करावं असा फतवा निघाल्यामुळे या सिनेमातल्या विषयाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झालीय. त्या…

‘वन लिटिल फिंगर’ – अपंगत्वाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन

मालिनी चिब यांचं 'वन लिटिल फिंगर' हे आत्मचरित्र अनेक कारणांसाठी महत्त्वाचं आहे. मालिनी चिब स्वत: बहुविकलांग आहेत. एक बहुविकलांग स्त्री म्हणून आलेले अनुभव अतिशय निडरतेने आणि पारदर्शकपणे त्यांनी या आत्मचरित्रात नोंदवले आहेत. अपंग व्यक्ती; आणि…

वेगळे आहोत विकृत नाही – भाग ४ – इंटरसेक्स बाळाचं संगोपन

बाळ जन्माला आलं की पहिला प्रश्न विचारला जातो, मुलगा आहे का मुलगी. पण जेव्हा जन्माल्या आलेल्या बाळाचं लिंग नक्की काय ते स्पष्ट होत नाही तेव्हा पालक, डॉक्टर संभ्रमात पडतात. इंटरसेक्स बाळांचं संगोपन कसं करायचं, ती मोठी होत असताना त्यांना कसा…

वेगळे आहोत, विकृत नाही – भाग ३ : वैशालीची गोष्ट

वैशाली सुरुवातीला संकोचत इंटरसेक्सविषयी माहिती करून घ्यायला आली होती. तिच्या बोलण्यातून तिची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा जाणवायची. ती सरकारी नोकरीत आहे आणि तिला बढतीही मिळाली आहे. तिची ही आत्मकथा - ले. बिंदुमाधव खिरे वैशालीची गोष्ट माझा…

वेगळे आहोत, विकृत नाही – भाग २

इंटरसेक्स व्यक्तींना समाजात वावरताना सर्वांत मोठी अडचण येते ती म्हणजे समाज फक्त दोनच लिंगात विभागलेला आहे - पुरुष व स्त्री. पुरुष-स्त्रीच्या वैद्यकीय व्याख्येत एखादी व्यक्ती बसत नसेल तर  समाजात वावरताना समाजातील असहिष्णुतेमुळे त्या…

वेगळे आहोत, विकृत नाही – भाग १

इंटर सेक्स - सामाजिक दृष्टी - ले. बिंदुमाधव खिरे खरं पाहता शरीरातूल वेगळेपण आपल्याला काही नवीन नाही. काहींचे केस कुरळे असतात, तर काहींचे डोळे वेगळ्या रंगाचे असतात. काहींच्या हाताला किंवा पायाला पाचाच्या ऐवजी सहा बोटं असतात. हे वेगळेपण…

It just takes two to tango

नृत्य करण्यासाठी काय लागतं - लय, ताल, सूर, आणि एक नाचात मग्न झालेलं जोडपं. बाकी काहीही नाही. शरीर कसंय, शरीरात काही कमी आहे, नाही हे सगळं आपल्या नजरेत असतं. प्रत्येकाकडे जर आपण एक व्यक्ती म्हणून पाहू शकलो तर सगळेच जण सुंदर आणि पूर्ण…