Browsing Category

प्रेम Frame

प्रेमात पडलं तर चालतं ना? कोणत्या वयात प्रेमात पडावं? एखाद्याबद्दल प्रेम वाटतंय हे कसं कळतं? मला एक मुलगा खूप आवडतो पण त्याला मी नाही आवडत. मला कुणीच आवडत नाही. काही प्रॉब्लेम नाहीये ना? मला नात्यांची झंझट नकोय. मला फक्त सेक्समध्ये इंटरेस्ट आहे.
आपल्या सगळ्यांच्याच मनात प्रेम, सेक्स अशा विषयांबद्दल किती तरी प्रश्न असतात. या सदरामध्ये आपण प्रेम भावना, प्रेम कसं करायचं, प्रेम करण्याचे विविध प्रकार आणि लैंगिकतेचा आणि प्रेमाचा काय संबंध आहे हे शोधणार आहोत. प्रेमात पडणं, एखाद्याबद्दल ओढ वाटणं, प्रणय, शरीर संबंध अशा अनेक गोष्टींचा आपण विचार करत असतो. या भावना आणि कृती काय आहेत हे समजून घेऊ या.
कोणत्याही प्रेम संबंधांमध्ये एकमेकांबद्दलचा आदर आणि एकमेकांचा स्वीकार महत्त्वाचा असतो.

बालपण आणि ‘प्रेम’ पण! – ले. ञिशूल द. नि.

‘शाळा’ आणि ‘टाईमपास’ या चिञपटांमध्ये मुख्यतः किशोरवयीन प्रेम कथा रंगवण्यात आल्या होत्या. परंतु त्यामध्ये आक्षेपार्ह असं कोणालाही वाटलं नाही. माञ नुकताच आलेला ‘सैराट’ आणि त्यातील अल्पवयीन प्रेमाविषयी झालेल्या कच्च्या पक्क्या चर्चेमुळं…

क्षण एक पुरे प्रेमाचा – डॉ. माधव गाडगीळ

निसर्गाच्या लीला चित्र-विचित्र असतात. वास्तव केवळ कल्पनेहून विलक्षण असते असे नाही, तर आपण कधी कल्पनाही करू शकणार नाही इतके अफलातून असते. व्हॅलेंटाइनचा शृंगारसोहळा साजरा करताना आपल्याला कल्पनाही नसते, की धरणीच्या रंगमंचावर वैविध्याने…

फुले… बाण मदनाचे! – डॉ. माधव गाडगीळ

नुकतेच आपण दोन सोहळे साजरे केले, एक शृंगाराचा- व्हेलेण्टाइन्स डे (१४ फेब्रुवारी) आणि दुसरा विज्ञानाचा- राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी). या दोन्ही दिवसांशी फ़ुलांचं अन्योन्य नातं आहे. म्हणूनच त्यानिमित्ताने या फुलांच्या मनमोहक गोष्टी. …

आता तुम्हीच सांगा काय करायचे?

आयुष्यात अनेकदा असं होतं की लैंगिकता आणि त्या सोबतीने येणारे नातेसंबंध कुणाकुणाला वेगळ्याच अनपेक्षित वळणावर आणून सोडतात आणि त्यामुळे उभा राहतो एक कळीचा प्रश्न- आता काय करायचं? इथे दिलेली गोष्ट नेमकं कुठलं वळण घेईल याचा अंदाज करत 'आता काय…

प्रेमाला वय नसतं!!!

कोण म्हणतं प्रेम फक्त तरुणपणीच करता येतं? प्रेम ही अशी गोष्ट आहे की जी मुरल्यावर अधिक गोड होते. वयाप्रमाणे बहरत जाणाऱ्या प्रेमाची ही अतिशय गोड कविता खास या प्रेमाच्या दिवसाची आठवण म्हणून तुमच्यासाठी... छे गं, आता कशी रहावी स्मृती मला…

व्हॅलेंटाईन डे – व्यक्त होण्याची पाऊलवाट – ले. मंगला सामंत

“नैतिकतेच्या माणसाने बनवलेल्या मनमानी कल्पना जर निसर्गविरोधी असतील तर माणसाच्या शरीर-मनोव्यापाराला त्या हानिकारक असतात. कामपूर्तीचे हार्मोन ज्याला टेस्टास्टेरॉन म्हणलं जातं, ते माणसाला एकूणच जगण्याची उर्जा देणारं हार्मोन आहे. हे हार्मोन…

लग्नाची पहिली रात्र – हळुवार आणि सुंदर

सुहाग रात, लग्नाची पहिली रात्र - नक्की काय होणार, काय करायचं, कसं करायचं अशी धडधड, त्याचं टेन्शन. गोष्टी, कथा कांदबऱ्या आणि सिनेमाने मनात कोरून ठेवलेले पहिल्या रात्रीचे प्रसंग. लग्नाच्या याच पहिल्या रात्रीचं सुंदर आणि हळुवार चित्रण करणारी…

दोस्तांनो, प्रेम म्हणजे काय असतं?

जसजसं आपण वयात येतो तसतसं आपल्या मनात कुणाबद्दल तरी आकर्षण निर्माण व्हायला लागतं. कुणी तरी आवडू लागतं, कुणी तरी भेटावं असं वाटायला लागतं. कुणाची तरी स्वप्नं पडायला लागतात. होतं का नाही हे? या वयात बहुतेक सगळ्याच मुला-मुलींना हे होतं. आता…

जातीबाहेर …

आंतरजातीय प्रेमविवाह करणार्‍या किंवा प्रेमात पडणार्‍या ‘बंडखोर’ मुला-मुलींच्या मनात-आयुष्यात काय धुमसत असतं? माझी पिढी, चहापोह्याचे पारंपरिक कार्यक्रम नाकारत हवा तसा जोडीदार शोधणारी. विवाहसंस्थेला ‘आउटडेटेड’ ठरवत कॉण्ट्रॅक्ट मॅरेज, ‘लिव्ह…