Browsing Category

आपली शरीरे

आपण सतत वाढत असतो आणि आपण सतत बदलत असतो. जन्मापासून आपल्या शरीराच्या आकारात किती तरी बदल झाले आहेत. आपली कौशल्यं वाढली आहेत. आपल्या शरीराचा आकार, रंग, क्षमता अनेक गोष्टींवर अवलंबून असते. वय, लिंग, कामाचा प्रकार, जनुकं, आपण जिथे राहतो तिथलं वातावरण आणि समाजाच्या चाली रिती या सगळ्याचा आपण कसं दिसतो यावर खूप खोल परिणाम होत असतो. रस्त्यात उन्हात काम करणाऱ्या कष्टकऱ्याचं शरीर ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या माणसापेक्षा वेगळं दिसणारच. आपली शरीरं वेगळी आहेत तरीही नॉर्मल आहेत.

आपल्या शरीराच्या आत काय चालू असतं हे आपल्याला समजत असतं. शरीर आपल्याला ते सांगत असतं. एखादा आजार असो किंवा काही तरी बदलत असो. शरीराची भाषा समजू लागली तर आपल्याला या गोष्टी कळू शकतात. आणि त्या ऐकल्या, त्यानुसार आपल्या राहणीत काही बदल केले तर आपली आपल्या शरीराशी मैत्री होऊ शकते. अधिक माहितीसाठी शरीर साक्षरता वाचा.

काय आहे मेन्स्ट्रुअल कप?

भारतात स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान सुती  कपडे अथवा सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. यासाठी आता आणखी एक पर्याय समोर येतो आहे तो म्हणजे मेनस्ट्रअल कप अर्थात मासिक पाळी दरम्यान वापरायचा कप. त्याविषयी माहिती देणारा गौरी दाभोळकर यांच्या लेखातील…

शरीर साक्षरता मुलांसाठी!

शरीराबद्दलचा मोकळा व निकोप दृष्टीकोन मुलांमध्ये तयार करू पाहणारा पुस्तक संच 'शरीर साक्षरता मुलांसाठी' ह्या पुस्तकाचे ३ संच 'तथापि' ट्रस्टने प्रकाशित केले आहेत. लैंगिक शिक्षण हा कायमच वादाचा ठरलेला विषय, मुलांना ही माहिती द्यावी की नाही,…

चर्चा ‘त्या’ चार दिवसांची – ले. अमृता वाळिंबे

‘यूझ अॅण्ड डिस्पोजल ऑफ सॅनिटरी नॅपकिन्स इन गोवा’ या सर्वेक्षणाच्या निमित्ताने मुली-महिला बोलत्या झाल्या; तेव्हा काय अधोरेखित झालं? ............. अडचण... शीऽऽ किती इरिटेटिंग... त्रास... बाजूला बसणं... कंटाळा, मासिक कटकट... सोऽऽ…

विटाळाचे अभंग

पाळीच्या काळात बाईने काय करावं, काय करू नये यावरचा वाद सनातन आहे. धर्म, परंपरा, चाली रितींचं नाव घेताना काही परंपरा मात्र आपण विसरतो आहोत का? आपण सर्व जण एका स्त्रीच्या उदरात जन्मलो आहोत, ज्या रक्ताने आपलं पोषण केलं ते रक्तच विटाळ ठरवायचं…

जननचक्राची ओळख – भाग ५ : पाळीचक्रातील बदल कसे नोंदवून ठेवायचे

मागील लेखांमध्ये आपण पाळी चक्रादरम्यान गर्भाशय आणि संपूर्ण शरीरात काय काय बदल होतात ते पाहिलं. या लेखात आपण हे बदल कसे नोंदवून ठेवायचे ते पाहणार आहोत. गर्भाशय, ग्रीवा, योनीमार्गातील स्राव आणि संवेदना नोंदवून ठेवल्याने पाळीचक्रामध्ये…

इटाळाचा कटृाळा

मासिक पाळीत बाई पवित्र असती का विटाळशी...लई वाद चाललाय. पारगावात कमळी आन् मंजुळी बी त्येच बोलाया लागल्यात. (कमळी - क, मंजुळी - मं) मं - कमळे परवा का आली नाहीस? क - परवा काय व्हतं माय? मं - आगं पार्वताच्या घरी पुजा व्हती की. त्याचं…

जननचक्राची ओळख – भाग ४ : शरीरात होणारे इतर बदल

पाळीचक्रामध्ये गर्भाशयातील स्राव आणि ग्रीवेमध्ये होणारे बदल आपण पाहिले. यासोबतच शरीरातही अनेक छोटेमोठे बदल होत असतात. शरीराच्या आणि मनाच्या संवेदनांकडे बारकाईने लक्ष दिल्यास हे बदल आपल्याला नक्कीच जाणवतील. पाळी चक्रामध्ये…

जननचक्राची ओळख – भाग ३ : ग्रीवेतील बदल

गर्भाशयाच्या मुखामध्ये म्हणजेच ग्रीवेमध्ये होणारे बदल बहुतेक स्त्रियांच्या ओटीपोटात गर्भाशय असते. त्याला खाली योनीमार्ग जोडलेला असतो आणि दोन्ही बाजूला बीजकोष असतात. काही स्त्रियांमध्ये गर्भाशय नसते किंवा उलटे किंवा तिरपे असते. गर्भाशयाचं…

जननचक्राची ओळख – भाग २ : स्राव

पाळीचक्रातले काही काळ जननक्षम असतात, म्हणजेच त्या काळाच गर्भधारणेला पोषक असं वातावरण तयार होत असतं. त्यातली एक महत्त्वाची खूण म्हणजे योनी व गर्भाशयाच्या मुखातून पाझरणारा स्राव आणि त्यातले बदल. गर्भाशय मुखातील म्हणजेच ग्रीवेतील श्लेष्मा…

जननचक्राची ओळख – भाग १

बहुतेक स्त्रियांना मासिक पाळी येते. मुलगी वयात आली की पाळी सुरू होते आणि त्यासोबतच शरीरात अनेक बदल होऊ लागतात. माणसाची प्रजाती पुढे चालू रहावी यासाठी नवा जीव तयार करण्याचं काम स्त्रीच्या शरीरात होऊ शकतं. त्यासाठी स्त्रीच्या शरीरामध्ये…