Browsing Category

लैंगिक आरोग्य

लैंगिक आरोग्य म्हणजे केवळ आजाराचा अभाव नाही तर एकूणच स्वस्थ आणि निरोगी असणे. लैंगिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मानवी हक्कांचं संरक्षण होणं आवश्यक आहे. आयुष्याच्या सर्वच टप्प्यांवर लैंगिक आरोग्याचा विचार होणं गरजेचं आहे. लहान मुलं आणि वृद्धांसंदर्भातही लैंगिक आरोग्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. विविध प्रकारच्या लैंगिक वर्तनाचा लैंगिक आरोग्याशी संबंध आहे. सामाजिक आणि जीवशास्त्रीय घटकांचा एकत्रित परिणाम लैंगिक आरोग्यावर होत असतो.

लैंगिक आरोग्याचा विचार करण्यासाठी आधी लैंगिकतेचा सकारात्मक पद्धतीने विचार करायला पाहिजे. लैंगिकता, लैंगिक नाती तसंच सुरक्षित आणि सुखकर लैंगिक संबंध, ज्यामध्ये जबरदस्ती किंवा हिंसा नाही असे लैंगिक संबंध या सर्वांचाच विचार लैंगिक आरोग्यामध्ये आवश्यक आहे.

काही नेहमी आढळणारे लैंगिक आजार, त्यांची लक्षणं, रोगनिदान आणि त्यासंबंधीची प्राथमिक माहिती आपण या सदरात घेणार आहोत. स्वतःच्या शरीरावर प्रेम करण्यासाठी त्याची काळजी घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये आपल्या लैंगिक अवयवांचाही समावेश होतो.

तुमच्या मनात लैंगिक आरोग्याबद्दल काही शंका असल्यास त्या मोकळेपणाने इथे विचारा.

अंग बाहेर येणे/ गर्भाशय खाली येणे

अनेकदा बायकांना बाळंतपणाच्या पुरेशा सेवा मिळत नाहीत किंवा त्याची योग्य माहितीदेखील मिळत नाही. बाळंतपणाच्या वेळी त्रास झाल्यास व त्यावर उपचार न झाल्यास नंतर काही आजार उद्भवू शकतात. बाळंतपणानंतर बाईला विश्रांतीची गरज असते पण तीही अनेकींना…

एड्स दिनानिमित्त मोफत तपासणी

एड्सची साथ आटोक्यात आणण्यासाठी गेली अनेक वर्षे निकराचे प्रयत्न सुरु आहेत. त्या प्रयत्नांना यश देखील मिळते आहे. एड्सची साथ, सामाजिक आरोग्याचा एक प्रश्न आहे. ही साथ २०३० पर्यंत पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी जे धोरण आखण्यात आले आहे त्याला…

शीघ्रपतन : स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट

माझ्या पुरुष मित्रांनो, आमची ही वेबसाईट सुरु झाल्यापासून जे काही ४०० एक प्रश्न आम्हाला आले त्यातील अंदाजे २०%, म्हणजे एक पंचमांश प्रश्न, हे दोन गोष्टींशी संबंधित होते. एक म्हणजे हस्तमैथुन आणि दुसरे म्हणजे शीघ्रपतन. अर्थात यातील बहुतेक…

ना मुंह छुपा के जियो…

जान्हवी गोस्वामी गेली काही वर्षं आसाममधल्या सर्वसामान्य लोकात एड्सविषयीच्या जागृतीचं काम करतेय. एड्सच्या संदर्भात लोकांच्या मनात रुतून बसलेले गैरसमज दूर करणं, एड्सबाधित व्यक्तींना मानसिक आधार देणं, त्यांना वैद्यकीय मदत पुरवणं अशा कामांमध्ये…

शीघ्रपतनाविषयी जाणून घ्या…

शीघ्रपतन म्हणजे नक्की काय? संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत…

एच आय व्ही – एड्स

एच आय व्ही - एड्स एच आय व्ही म्हणजेच ह्यूमन इम्युनो डेफिशिअन्सी व्हायरस (HIV - Human Immune-Deficiency Virus). शरीराची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू. एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिण्ड्रोम (AIDS - Acquired…

मृदू व्रण (शांक्रॉईड)

मृदू व्रण (शांक्रॉईड) या रोगात जननेंद्रियावर दुखणारा पण मऊ व्रण तयार होतो म्हणून त्याला 'दुखरा व्रण' किंवा मृदू व्रण असे म्हणतात. हा आजार जीवाणूंमुळे होतो. हा व्रण पुरुषांमध्ये शिश्नाच्या टोकावर किंवा त्वचेखाली, तर स्त्रियांमध्ये…

गरमी (सिफिलिस)

सामान्य भाषेत याला गरमी (उष्णता) असे नाव आहे. हा निरनिराळया स्वरुपात उमटतो आणि नाहीसा होतो. परत येतो परत दिसेनासा होतो. पण शरीराच्या आत याचे दुष्परिणाम चालूच असतात. या आजाराचे मुख्य प्राथमिक स्वरुप जननेंद्रियावर व्रण (अल्सर) आणि अवधाण असे…

‘ब’ प्रकारची कावीळ – Hepatitis B

'अ' प्रकारची कावीळ अन्नमार्गातून पसरते. तर ब आणि क प्रकारची कावीळ रक्तावाटे (दूषित इंजेक्शने, दूषित रक्त, इ.) आणि लैंगिक संबंधातूनही पसरते असे सिध्द झाले आहे. या प्रकारच्या काविळीचे स्वरूप सौम्य पण यकृताच्या दृष्टीने घातक असते. यापासून काही…

जनायटल हर्पिस – जननेंद्रियांवरची नागीण

जनायटल हर्पिस – जननेंद्रियांवरची नागीण हर्पिस हा आजार दोन प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. हर्पिस सिंप्लेक्स 1 आणि हर्पिस सिंप्लेक्स टाइप 2.  या आजारात रोगाच्या विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे शिश्नावर, योनिमुखाभोवती किंवा योनिमार्गात पुरळ…