Browsing Category

हिंसा आणि छळ

आपल्या समाजात पुरुषांचे अपघात रस्त्यांवर होतात तर महिलांचे त्यांच्या स्वत:च्या घरामध्ये. आज हिंसेची व्याख्या तपासून पहाण्याची वेळ आली आहे. हिंसा ही फक्त शारीरिक नसून त्यामध्ये आता तंत्रज्ञानाचा वापर मोठ्याप्रमाणात होत आहे. लहान मुलींपासून म्हातार्‍या बायकांपर्यंत बलात्कार होताना दिसत आहे. हिंसेची आकडेवारी पाहिली असता, आपल्याला लक्षात येईल की समाजातील अर्धा हिस्सा आपण फक्त पितृसत्ताकतेमुळे दुर्लक्षित ठेवतोय. ही पितृसत्तताकतेची बंधने तोडून काहीप्रमाणात महिला पुढे येताना दिसत आहे. त्यांना साथ देउन हा लढा बळकट करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. ही लढाई फक्त महिलांची नसून, ती स्त्री आणि पुरुष दोघांचीही आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

स्वतंत्र व्यक्तिमत्व, पहिली भारतीय शिक्षिका, मुख्याध्यापिका, प्रतिभावंत शिक्षणतज्ञ, नामवंत कवयित्री, उत्तम संघटक, नेता, प्रभावी वक्त्या, विचारवंत, समाज सुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्ताने डॉ. आशिष तांबे…

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायदा

पुरुषप्रधान भारतीय समाजात वर्षानुवर्षे स्त्रियांचं स्थान हे दुय्यम राहिलं आहे. याचा स्त्रियांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या, नोकरीच्या, इतर विकासाच्या संधी, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, अशा अनेक मुलभूत गोष्टींवर विपरीत परिणाम झालेले आपण आपल्या…

पुरुषी मानसिकता आणि बलात्कार_गौरी सुनंदा

लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. दररोज किमान एकदातरी आपण बलात्काराच्या घटनेबद्दल ऐकत असतो. दिल्लीच्या निर्भया बलात्काराच्या घटनेनंतर देशभर वादळ उठले. देशभरातून मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवला गेला. मात्र…

हिंसामुक्त जीवन हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार…

आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिवसाच्या निमित्ताने...   आज २५ नोव्हेंबर, आंतरराष्ट्रीय हिंसाचार विरोधी दिवस. १९६० मध्ये याच दिवशी ‘डोमिनिकन रिपब्लीक’ या कॅरिबियन देशातील ‘मिराबल’ या मध्यमवर्गीय कुटुंबातील तीन बहिणींची राफेल…

‘खतना- स्त्रियांच्या लैंगिक अधिकारांचं उल्लंघन’_ गौरी सुनंदा

“मला एवढंच आठवतंय की, माझी आई आणि आजी आपापसांत काहीतरी कुजबुजल्या... माझ्या वडिलांना काहीतरी विचारलं. ते आईला म्हणाले, ‘जे आवश्यक आहे ते कर’. ‘बाहुली आणायला जाऊयात’ असं सांगून आईनं मला बोहरा समुदायाच्याच एका बाईच्या घरी नेलं. आमच्याच शेजारी…

‘लैंगिक छळविरुद्ध समिती’ स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका आणि व्हिडीओ

तथापिची नवीन निर्मिती: कामाच्या ठिकाणी होणाऱ्या ‘महिलांच्या लैंगिक छळविरुद्ध समिती’ स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका आणि व्हिडीओ लैंगिक छळाची कोणतीही घटना जगण्याचा, समानतेचा, स्वातंत्र्याचा किंवा कोणताही व्यवसाय करण्याच्या हक्कांचं…

झीरो टॉलरन्स- अर्चना मोरे

स्त्रीच्या ‘नाही’ म्हणण्याचा अर्थ अजूनही आपल्या सोयीनेच लावला जातो आहे. एखादी मुलगी ‘नाही’ म्हणते तेव्हा खरे तर तिला ‘हो’च म्हणायचे असते, बायका कायद्याचा गैरवापर करतात, कामावर चेष्टामस्करी तर होणारच, छोटय़ाशा गोष्टीचा उगीच मोठा इश्यू बनवतात…

‘सहियो’: ‘खतना’ या अन्यायकारक प्रथेविरुद्ध काम करणारी संस्था

“मुली कोणासोबत पळून जाऊ नयेत, त्यांनी लग्नाआधी सेक्स करू नये, नवऱ्याव्यतिरिक्त इतर कोणासोबत सेक्स करू नये. मुलीला शिस्त लागावी तसेच तिला कंट्रोलमध्ये ठेवावे यासाठी मुलींची ‘खतना’ केली जाते .” एक भोरी समुदायातील महिला. ‘खतना’ (Female…

कोपर्डी : आपण कमावलेल्या सामंजस्याची परीक्षा_ शर्मिष्ठा भोसले

एक सर्वसाधारण गृहिणी मला म्हणाली, ‘ताई, आता माझा तिसरीतला मुलगा मला विचारतो, आई बलात्कार म्हणजे काय असतंय?’ एक आजीबाई म्हणाल्या, ‘पोरी शिकत्यात, पुढं जात्यात हे बघवतच न्हाय गडीमाणसांला. पण एक सांगते पोरी, अशे तर लई तरास व्हतेत बायांना रोज.…

आज त्यानं मला फुलं दिली

आज त्यानं मला फुलं दिली, खरंतर आज माझा वाढदिवस किंवा इतर कोणताही विशेष दिवस नव्हता. काल रात्री आमच्यात पहिल्यांदा वाद झाला, तो माझ्याशी खूप क्रूरतेने बोलला, मला खरंच खूप वाईट वाटलं. त्याला पश्चाताप झाला असावा, त्याला मला…