Browsing Category

लैंगिकता म्हणजे?

लैंगिकता लैंगिक असण्याशी संबंधित आहे. पण लैंगिकता म्हणजे फक्त लैंगिक संबंध नाही. लैंगिकता त्याहून खूप जास्त आहे. स्वतःच्या आवडी निवडी, इच्छा विचार, बंधनं अशा सगळ्या गोष्टी लैंगिकतेशी संबंधित असतात. काही जणांसाठी लैंगिक कल म्हणजे लैंगिकता असेल तर काही जणांना मनाप्रमाणे राहणं, कपडे घालणं, व्यक्त होणं म्हणजे लैंगिकता असू शकेल. असे सर्व अनुभव, विचार, अपेक्षा आणि मान्यतांचा आपल्या आयुष्यावर खोल परिणाम होत असतो.

लैंगिक शिक्षण – र. धों. कर्वे

लैंगिक शिक्षण – र. धों. कर्वे प्रत्येक गोष्टीला कट्टर विरोध करणारे लोक प्रत्येक क्षेत्रात असतातच आणि ज्यांना लैंगिक शिक्षणच  मिळालेले नसते, त्यांना लैंगिक गोष्टी गलिच्छ वाटणारच. हे विचारात घेतले, तर अशा लोकांना मुलांना लैंगिक शिक्षण…

समाजस्वास्थ्य: र. धों. कर्वे यांच्या कार्याचा वेध घेणारं नाटक

जुनाट रूढी, चालीरिती, परंपरांचं दुकान भावनेच्या जोरावर चालतं. तिथं बुद्धीचा वापर करणाऱ्यांना प्रवेश नाही. अशाच लोकांची सत्ता असेल तर 'ज्याची सत्ता त्याचा न्याय' हा नियम असतो. -र. धों. कर्वे या (वारंवार दुखावल्या जाणाऱ्या लोकांच्या)…

काम आणि क्षुधा

कामविषयक भावना आणि क्षुधा (भूक) यांची तुलना केली तर त्याचा काय परिणाम होईल, याचे विश्लेषण करत लैंगिकतेबद्दलचे गूढ किंवा गुप्तपणा आड आल्यामुळे काय अडचणी तयार होतात, हे र. धों. कर्वे या लेखामध्ये लिहितात. कामविषयक गोष्टी गुप्तच राखल्या…

लैंगिकतेविषयी र.धों. कर्वेंची विचारधारा

आज १४ जानेवारी,  र. धों. कर्वे म्हणजेच रघुनाथ कर्वे यांचा जन्मदिवस. संततिनियमनाचा प्रसार- प्रचार आणि समाजाचे लैंगिक शिक्षणाद्वारे प्रबोधन हे त्यांनी आपले जीवनकार्य म्हणून स्वीकारले. र.धों.ची विचारधारा केवळ संततिनियमन आणि लैंगिक आरोग्य किंवा…

‘सेक्स चॅट विथ पप्पू अॅण्ड पापा’ या वेबसिरीज विषयी_ त्रिशूल द.नि.

“आई बलात्कार म्हणजे काय गं?” हा प्रश्न संपायच्या आतच आईची एक संतप्त प्रतिक्रिया आली, “गप्प बस रे असलं ’काहीही’ विचारू नकोस”. मी चौथीला असताना, दूरदर्शनवर चालणाऱ्या दामिनी मालिकेतील कोणतातरी प्रसंग पाहून विचारलेला प्रश्न होता तो. ज्याप्रकारे…

आडवळणावर सापडलेली लैंगिकता…_अच्युत बोरगावकर

तसं पहायला गेलं तर प्रिय श्रावणाला अजून सुरुवात व्हायची होती. पण त्याच्या अगोदरच आषाढाची भलत्याच रोमँटिक अंदाजात जमिनीशी सलगी करूनही झाली होती. मागच्या तीन चार वर्षाची विरहीणी माती या आठवड्या दोन आठवड्याच्या धसमुसळ्या मिलनाने तृप्त दिसत…

लैंगिकतेवर बोलू सारे… नेहा महाजन

लैंगिकतेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन रुजवण्यासाठी त्याविषयी मनमोकळेपणाने बोलणे ही पहिली पायरी आहे. पण लैंगिकता म्हणजे फक्त सेक्स किंवा लैंगिक संबंध नाही. लैंगिकतेबद्दल बोलणं म्हणजे आपल्या मनातील शंका, विचार, भीती, उत्सुकता व्यक्त करणं.…

लैंगिकता शिक्षणाचा प्रवास – मुलाखत : डॉ. अनंत साठे, डॉ. शांता साठे

‘शालेय विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण द्यावे की नाही’, अशी चर्चा सर्वत्र होताना दिसते. या विषयाचे निर्विवाद महत्त्व ओळखले ते फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन-इंडियाच्या पुणे शाखेने, विशेषतः डॉ. सुमती कानिटकर, डॉ. अनंत साठे व डॉ. शांता साठे यांनी. …

उमलत्या शरीराची धुम्मस – मुक्ता चैतन्य

शरीराचे सोहळे साजरे करण्यासाठी उत्सुक असणार्‍या तारुण्याच्या लैंगिक वर्तनाबद्दल तरुणांशी बोलण्याची जबाबदारी आपण स्वीकारणार का? ''आमचं गेल्या तीन वर्षांपासून अफेअर होतं. पहिल्यांदा आम्ही एकत्र आलो तेव्हा मी जरा संकोचले होते. यातून काही…

मर्जी, मस्ती की आणखी काही…

गेल्या आठवड्यात अमेरिकेतल्या कोलोरॅडोमधल्या कॅनन सिटी इथल्या मिडल स्कूल आणि हाय स्कूलमध्ये मोठाच गहजब उडाला. जवळ पास 100 विद्यार्थ्यांनी आपले नग्न फोटो ट्रेड केले. या विद्यार्थ्यांनी आपल्या फोनवरून सुमारे 300 ते 400 नग्न फोटो एकमेकांसोबत…