बालकांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला जरब!

0 110

पोस्को कायद्यात सुधारणा; कठोर शिक्षेची तरतूद

बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमधील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची तरतूद बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यात (पोस्को)  करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने या कायद्यात कठोर शिक्षेची  तरतूद केली आहे. पोस्को कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आल्याने बालकांवर अत्याचार करणाऱ्यांवर जरब बसणार आहे.

बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा २०१२ (पोस्को), भारतीय पुरावा कायदा १८७२, भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ या कायद्यांमध्ये तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदींचे परिपत्रक राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकतेच पाठविण्यात आले असून त्या आधारे पोलिसांनी तपास करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. पोस्को कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून बालकांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी पोस्को कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कठोर शिक्षेच्या तरतुदींमुळे विकृत मनोवृत्तीचे आरोपी  बालकांवर अत्याचार करायला धजावणार नाहीत.

सोळा वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कमीत कमी वीस वर्ष शिक्षा तसेच जास्तीत जास्त जन्मठेप (आरोपीच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत) तसेच दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. बारा वर्षांखालील मुलीवर अत्याचार करणाऱ्यास कमीत कमी वीस वर्ष सक्तमजुरी आणि जास्तीत जास्त जन्मठेप अशा शिक्षेची तरतूद नवीन कायद्यात करण्यात आली आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणात कमीत कमी वीस वर्ष सक्तमजुरी, जास्तीत जास्त जन्मठेप किंवा मृत्युदंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

बातमी साभार : https://www.loksatta.com/pune-news/loksatta-crime-news-104-1711325/

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.