कनेक्टिंग हेल्पलाईन

0 234

नैराश्य, एकाकीपण, दुःख, ताण-तणाव आणि जीवनात येणा-या अडचणींचा सामना करताना अनेक जण नैराश्याच्या गर्तेत सापडतात आणि आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. आत्महत्या करून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘कनेक्टिंग’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे मानसिक आणि भावनिक आधार दिला जातो. आत्महत्या प्रतिबंध, आत्महत्येची घटना घडलेल्या कुटुंबांना भावनिक आधार आणि भावनिक स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘कनेक्टिंग’ ही स्वयंसेवी संस्था काम करत आहे.

कनेक्टिंग हेल्पलाईन- ९९२२००११२२, टोल फ्री क्रमांक १८००२०९४३५३

वेळ-  दुपारी दोन ते रात्री आठ

आत्महत्येचा विचार मनात आलेल्या आणि भावनिक ताण-तणावातून जाणाऱ्या व्यक्ती संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून बोलून आपले दु:ख हलके करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.