लिहिते व्हा ….

0 732

मिळून साऱ्याजणी मासिक गेली तीस वर्ष स्त्रीपुरुष समतेसाठी काम करत आहे, परंतु “स्त्री – पुरुष समता”  म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न फार दिवसांपासून अनेकांना पडला आहे, असं मिळून साऱ्याजणीच्या लक्षात आलं आहे. जरा विचार करून या प्रश्नाचं उत्तर शोधले तर अनेक पैलू समोर येतील. आज समाजात स्त्रिया आणि पुरुष हे वेगवेगळ्या भूमिकांत वावरत असतात. पण बदलत्या जगामध्ये स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या देखील भूमिका बदलत आहेत. पूर्वी कौटुंबिक जबाबदाऱ्या पुरती सीमित असणारी स्त्री आता प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आहे, प्रत्येक क्षेत्रात पुरुषांप्रमाणे स्वतःचेही स्थान निर्माण करत आहे किंबहुना वरचढ ही ठरत आहे, तरी सुद्धा  नागरिकांना देऊ केलेले समानहक्क व अधिकारांचा वापर मात्र स्त्रीला करता येत नाही.  यासर्वांमागचे मुख्य कारण म्हणजे समाजातील पुरुषसत्ताक व्यवस्थेची संकुचित मानसिकता!

तर मग मित्र-मैत्रिणींनो खालील काही प्रश्न समजून घेऊन, स्वतःच्या मनाला विचारून तुम्हाला जे काही वाटतं ते प्रामाणिकपणे लिहून मिळून साऱ्याजणीला पाठवाल का? तुमचं हे मनोगत 200 ते  250 शब्दांपेक्षा मोठं नसावं आणि 30 जुलैपर्यंत मिळून साऱ्याजणीकडे पोहचवावं ही विनंती. निवडक प्रतिक्रिया मिळून साऱ्याजणीच्या वर्षारंभ विशेषांकात छापण्याचा मानस आहे तेंव्हा लगेच लिहायला घ्या.

 

संपर्क –

  • मोहिनी : 8308688927,
  • प्रीती : 9422517129,
  • गीताली : 9822746663

काही मुद्दे जे तुम्हाला लिहायला मदत करतील.

  •  स्त्री – पुरुषसमता म्हणजे काय व या विचारानुसार तुम्ही वागता  का?  व तसे वागताना तुम्हाला काही अडचणी येतात का?
  • स्त्री – पुरुष समता म्हणजे स्त्रियांनी पुरुषांसारखं वागणं किंवा पुरुषांनी स्त्रियांसारखं वागणं, असं तुम्हाला वाटतं का?
  • आपल्या नावात फक्त बाबाचं  नाव असतं आणि आईच मात्र नसतं याविषयी तुम्हाला काय वाटतं?
  • तसेच लग्नानंतर मुलींचच नाव बदलतं आणि नवऱ्याच्या घरी जावं लागतं, मात्र मुलगा घरजावई असणं हे मात्र क्वचितच दिसते,  यात तुम्हाला स्त्रीपुरुषसमानता दिसते का?
  • सिगारेट, दारू पिणारे, शिव्या देणारे जसे पुरुष असतात तसेच स्त्रियाही असतात. याकडे तुम्ही कसे बघता?
  • नाटक,सिनेमा,वेबसिरीज,सोशल मीडिया या माध्यमामध्ये स्त्रियांवर होणारे विनोद समतेला धरून असतात का?

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.