फर्टिलिटी अवेअरनेस – ओळख आपल्या पाळीचक्राची

1 1,937

मासिक पाळी कधी येणार किंवा अन्डोत्सर्जन कधी होणार हे आपलं आपल्याला समजू शकतं असं तुम्हाला जर कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? किंवा मासिक पाळीच्या चक्रामध्ये गर्भधारणा नेमकी कधी होऊ शकते हे कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय समजू शकतं हे तुम्हाला खरं वाटेल का?

हे पूर्ण खरं आहे. आपल्या मासिक पाळीच्या चक्रात काय होतंय, गर्भधारणा कधी होणार असं सगळं आपल्याला समजू शकतं.  फर्टिलिटी अवेअरनेस म्हणजेच जनन जागरुकता हे स्वतःचं शरीर, संवेदना आणि शरीराच्या प्रतिक्रिया समजून घेण्याचं एक कौशल्य आहे. स्वतःच्या शरीरातले सूक्ष्म बदल आणि खुणा, जाणिवा, भावना आणि संवेदना समजून घेणं, स्वतःची लैंगिकता आणि जननक्षमता याबाबत जागरुक असणं म्हणजे फर्टिलिटी अवेअरनेस किंवा लैंगिकता व जनन जागरुकता.

मासिक पाळी चक्रामध्ये होणारे विविध बदल आणि जाणिवांमधून कोणत्या काळात गर्भ धारणा होऊ शकते म्हणजेच दिवस जाऊ शकतात आणि कोणत्या काळात नाही हे समजून घेता येतं. तसंच शरीरात, पाळी चक्रात, संप्रेरकांच्या चक्रात काही वेगळं घडत आहे का तेही या जागरुकतेमुळे समजत असतं. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन झालं का नाही, पुढची पाळी कधी येणार आणि दिवस गेले आहेत का हेही लवकर समजू शकतं.

या ज्ञानातून आपण आपल्या शरीराबद्दलचे आणि आपल्या लैंगिकतेसंबंधीचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. शरीराबद्दलची अनेक मिथकंही यातून दूर करता येतील. आपली लैंगिकता समजून घेऊन इतरांबरोबरची आपली नाती आपण मोकळेपणाने जोडू शकतो. गर्भनिरोधनामध्ये आणि गर्भधारणेमध्ये पुरुषांचाही महत्वाचा वाटा आहे आणि याबद्दलची त्यांची जबाबदारी पुरुष घेऊ शकतील.

आपल्या शरीराची, पाळीचक्राची आणि जननचक्राची ओळख कशी करायची ते पुढच्या लेखात.

 

You might also like More from author

1 Comment

  1. sidhdartha dadaji ghutke says

    ‘मासिक पाळीचक्रात नेमकं काय घडतं?’ हे समजून घेण्यासाठी तथापिची निर्मिती

Leave A Reply

Your email address will not be published.