Home / FAQ - शंका समाधान / FAQ – शंका समाधान

FAQ – शंका समाधान

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

लैंगिक क्रिया म्हणजे काय? माणसं लैंगिक क्रिया का करतात? लैंगिक क्रिया केल्यावर कसं वाटतं?

लैंगिक क्रिया म्हणजे काय? माणसं लैंगिक क्रिया का करतात? लैंगिक क्रिया केल्यावर कसं वाटतं?

लैंगिक क्रिया लैंगिक भावनेशी संबंधित आहे. आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा काही जणांकडे आकर्षित होतो. या भावना आपल्याला व्यक्त कराव्याशा वाटतात. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आकर्षण वाटत असतं, त्या व्यक्तीबरोबर असताना किंवा तिचा/त्याचा विचार करत असताना आपल्या शरीरात काही तरी होतं. ही भावना इतर व्यक्तींवरील प्रेमापेक्षा वेगळी असते. माणसं हातात हात घेऊन, चुंबन घेऊन किंवा चांगलं वाटेल अशा इतरही अनेक पद्धतीने ही भावना व्यक्त करतात. आपल्या घरच्या/कुटुंबातील व्यक्तींना किंवा मित्र मैत्रिणींना मिठी मारणं किंवा त्यांचं चुंबन  घेणं वेगळं. पण जी व्यक्ती आपल्याला आवडू लागली असेल अशा व्यक्तीला मिठी मारणं किंवा चुंबन घेणं हा लैंगिक क्रियेचा भाग आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर तुमची तयारी असताना जर लैंगिक क्रिया केली तर बरं वाटतं. पण एखाद्याबद्दल भीती किंवा दडपण असेल किंवा तुमची मनाची तयारी नसेल तर मात्र हा अनुभव त्रासदायक ठरू शकतो. आपण काय करतोय याची पूर्ण जाणीव असेल तेव्हाच लैंगिक क्रिया करणं हिताचं असतं. त्याचे पुढे काय परिणाम होणार आहेत हे कळण्याइतके आणि त्याची जबाबदारी घेण्याइतके आपण जेव्हा मोठे होऊ तेव्हाच असे संबंध ठेवणं योग्य आहे. लैंगिक क्रियेमध्ये शरीर आणि मन दोन्ही गुंतलेले असतात. स्त्री आणि पुरुषाच्या लैंगिक क्रियेतून गर्भ राहू शकतो त्यामुळे त्याचा गंभीरपणे विचार करायला हवा.

लैंगिक भावना म्हणजे काय?

लैंगिक भावना म्हणजे काय?

एखाद्या आवडत्या व्यक्तीबद्दलच्या आकर्षणाच्या सर्व भावना ज्या आपल्याला स्पर्शातून, जवळिकीतून, हातात हात घेऊन किंवा चुंबन घेऊन किंवा इतर मार्गाने व्यक्त कराव्याशा वाटतात त्या सर्व भावनांना लैंगिक भावना म्हणतात.

*लैंगिक आकर्षण म्हणजे काय?

*लैंगिक आकर्षण म्हणजे काय?

वयात आल्यावर किंवा वयात येत असताना आपल्यात लैंगिक इच्छा निर्माण होऊ लागतात. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटायला लागतं. त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांच्याबरोबर लैंगिक क्रिया करावी अशी इच्छा निर्माण व्हायला लागते.

हे आकर्षण तीन प्रकारचं असू शकतं. भिन्नलिंगी (Heterosexual), समलिंगी (Homosexual) किंवा उभयलिंगी (Bisexual).

लैंगिक कल म्हणजे काय?

लैंगिक कल म्हणजे काय?

अनेक मुलांना भावनिक आणि लैंगिक आकर्षण फक्त मुलींबद्दल वाटतं. अनेक मुलींना लैंगिक व भावनिक आकर्षण फक्त मुलांबद्दल वाटतं. याचा अर्थ या मुलांचा किंवा मुलींचा लैंगिक किंवा भावनिक आकर्षणाचा कल विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीकडे असतो. अशा विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे असणाऱ्या लैंगिक किंवा भावनिक कलाला भिन्नलिंगी लैंगिक कल म्हणतात. इंग्रजीत याला हेटरोसेक्शुअल म्हणतात.

काही मुला-मुलींना दोन्ही लिंगाच्या व्यक्तींबद्दल भावनिक व शारीरिक आकर्षण वाटतं. मुलींना मुलं आणि मुली दोघांबद्दल लैगिक आकर्षण वाटतं आणि मुलांना देखील मुलं आणि मुली दोघांबद्दल लैंगिक आणि भावनिक आकर्षण निर्माण होतं. अशा आकर्षणाला उभयलिंगी लैंगिक कल असं म्हणतात. उभयलिंगी कल असणाऱ्या म्हणजे बायसेक्शुअल व्यक्ती गोंधळलेल्या असतात असा मात्र याचा अर्थ होत नाही. एका व्यक्तीला एकाच लिंगाच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटलं पाहिजे असा काही निसर्गाचा नियम नाही.

काही मुला-मुलींना केवळ त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं. म्हणजेच मुलांना फक्त मुलांबद्दल आणि मुलींना फक्त मुलींबद्दल लैंगिक आणि भावनिक आकर्षण वाटतं. याचा अर्थ या मुला-मुलींचा लैंगिक-भावनिक आकर्षणाचा कल समलिंगी असतो. अशा व्यक्तींना समलिंगी कलाच्या किंवा समलिंगी व्यक्ती म्हणतात. इंग्रजीत समलिंगी मुलांना किंवा पुरुषांना गे म्हणतात तर समलिंगी मुली किंवा स्त्रियांना लेस्बियन म्हणतात.

कोणत्याही व्यक्तीबाबत निर्माण होणारं लैंगिक आकर्षण नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. त्यात चुकीचं असं काहीही नाही. 

एखाद्याचा लैंगिक कल बदलू शकतो का?

एखाद्याचा लैंगिक कल बदलू शकतो का?

लैंगिक कलाबद्दल समजून घेताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वयात येताना कधी कधी काही भिन्नलिंगी मुला-मुलींना समलिंगी आकर्षण निर्माण होऊ शकतं. कालांतराने दोन तीन वर्षात असं आकर्षण नाहिसं होतं आणि त्यांना परत भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू लागतं. त्यामुळे वयात आल्यावर लगेचच आपला लैंगिक कल स्पष्ट होतो असं नाही. मात्र 18 वर्षाचे होईपर्यंत आपल्याला आपला कल काय आहे आणि आपल्या मनात कोणाविषयी, कोणत्या लिंगाच्या व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण होतं हे स्पष्ट होतं.

यापेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की सर्व प्रकारचे लैंगिक कल स्वाभाविक किंवा नैसर्गिक आहेत. भिन्नलिंगी कल हा नॉर्मल आणि बाकीचे अबनॉर्मल, विकृत हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. समलैंगिकता किंवा उभयलैंगिकता काही आजार नाही. त्यामुळे त्यावर कसले उपाय करण्याची गरज नाही किंबहुना कोणत्याच उपायाने (समुपदेशन, औषध गोळ्या, गंडे दोरे, सक्तीने केलेलं लग्न) लैंगिक कल बदलता येत नाही. तसंच हेही लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्याही व्यक्तीला आपला लैंगिक कल ठरवता येत नाही. लैंगिक कल हा काही चॉइसचा किंवा निवडीचा प्रश्न नाही. एखाद्या व्यक्तीचा लैंगिक कल काय आहे यावर त्या व्यक्तीचं नियंत्रण नसतं. ज्याला त्याला आपलं आयुष्य आपल्या इच्छेप्रमाणे आणि मर्जीप्रमाणे जगता आलं पाहिजे. त्यामुळे आपणही सर्व प्रकारच्या लैंगिक कल असणाऱ्या व्यक्तींचा स्वीकार करायला शिकलं पाहिजे. त्यांच्यावर होणाऱ्या भेदभावाला विरोध केला पाहिजे.

हस्तमैथुन म्हणजे काय?

हस्तमैथुन म्हणजे काय?

स्वतःच्या शरीराला स्पर्श करून लैंगिक सुख मिळवण्याच्या क्रियांना हस्तमैथुन म्हणतात. हस्तमैथुनामध्ये लैंगिक अवयवांना स्पर्श करणे, कुरवाळणे किंवा घासणे या क्रियांचा समावेश होतो. या स्वाभाविक क्रिया आहेत. मुलं-मुली, स्त्री-पुरुषही हस्तमैथुन करतात. जोपर्यंत स्वतःला दुखापत होत नाही किंवा रोजच्या कामात अडथळा येत नाही तोपर्यंत हस्तमैथुनात काही धोका नाही.

हस्तमैथुन केल्याने लिंग वाकडं होतं का?

हस्तमैथुन केल्याने लिंग वाकडं होतं का?

मुलांनी हस्तमैथुन करू नये यासाठी पसरवलेला हा मोठा गैरसमज आहे. हस्तमैथुन केल्याने लिंग वाकडं होत नाही. मात्र हस्तमैथुन करताना कोणत्या धातूच्या, काचेच्या टोकदार वस्तू वापरल्या तर मात्र लिंगाला इजा होऊ शकते. ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.

हस्तमैथुन केल्याने वीर्य वाया जातं. हे अयोग्य नाही का?

हस्तमैथुन केल्याने वीर्य वाया जातं. हे अयोग्य नाही का?

पुरुषाच्या शरीरात हृदयाच्या एका ठोक्याला किमान 1000 पुरुष बीजं तयार होत असतात. ती बाहेर पडण्यासाठी वीर्यकोषांमध्ये वीर्य तयार होतं. लैंगिक भावना निर्माण झाल्या किंवा लैंगिक क्रिया केल्यावर ते लिंगातून बाहेर पडतं आणि नव्याने वीर्य तयार होतं. वीर्य सतत तयार होत असतं आणि ते साठवून ठेवता येत नाही.

स्वप्नदोष म्हणजे काय?

स्वप्नदोष म्हणजे काय?

स्वप्नदोष हा शब्दच मुळात वापरणं थांबवलं पाहिजे. किशोरवयामध्ये किंवा मुलं वयात येत असतानाच्या काळात कधी कधी झोपेत असताना लिंग ताठर होतं आणि वीर्य बाहेर येतं. जननेंद्रियांचं काम नीट चालू असल्याचं ते लक्षण आहे. मात्र अशा सामान्य घटनेला स्वप्नदोष असं नाव दिल्यामुळे त्यात काही तरी गैर आहे अशी भावना तयार होते. झोपेत वीर्य बाहेर येणे असा याचा साधा सरळ अर्थ आहे.

मुली हस्तमैथुन करतात का?

मुली हस्तमैथुन करतात का?

हो. मुली आणि स्त्रिया हस्तमैथुन करतात. मुलींच्या लैंगिक अवयवांमध्ये क्लिटोरिस नावाचा एक अवयव असतो. लघवीच्या किंवा शूच्या जागेच्या थोडा वर या अवयवाचं टोक असतं. याला हात लावला, इतर वस्तूंनी त्याला स्पर्श केला किंवा क्लिटोरिस घासलं गेलं तर लैंगिक उत्तेजना निर्माण होते. मुलींमध्ये स्तनाग्रंदेखील अतिशय संवेदनशील असतात. स्तनाग्रांना स्पर्श करणं, ती ओढणं किंवा घासणं यातूनही उत्तेजना निर्माण होते.

मुलं जन्माला कशी येतात? लग्नाशिवायही मुलं जन्माला येऊ शकतात का?

मुलं जन्माला कशी येतात? लग्नाशिवायही मुलं जन्माला येऊ शकतात का?

मुलं जन्माला येण्यासाठी स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचा संयोग होऊन गर्भधारणा व्हावी लागते. जेव्हा स्त्री आणि पुरुष लैंगिक संबंध ठेवतात तेव्हाच हे शक्य होतं. जेव्हा पुरुषाचे लिंग किंवा शिश्न स्त्रीच्या योनीमार्गातून आत शिरते त्यानंतर काही काळाने वीर्य शिश्नातून बाहेर पडते. यामध्ये खूप पुरुषबीजं असतात. ती अतिशय सूक्ष्म असतात. पुरुषबीजं पोहत-पोहत गर्भाशयाला जोडलेल्या स्त्री बीजवाहिनीपर्यंत प्रवास करतात. त्यातील एका पुरुष बीजाचा स्त्रीबीजाशी संयोग होतो. फलित बीज गर्भाशयाच्या भिंतीमध्ये रुजते आणि नऊ महिने गर्भ तिथे वाढतो. गर्भाशयातील नाळेद्वारे रक्त आणि इतर पोषक घटकांचा पुरवठा होतो. बाळाची वाढ पूर्ण झाल्यानंतर योनिमार्गावाटे बाळ बाहेर येते.

मूल होणे ही एक शारीरिक घटना आहे. तर लग्न ही सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक घटना आहे. लग्नाशिवायही मुलं जन्माला येऊ शकतात. कारण मूल लग्नामुळे नाही तर लैंगिक क्रियेतून किंवा संभोगातून जन्माला येतं.

जुळी मुलं कशी जन्मतात?

जुळी मुलं कशी जन्मतात?

स्त्री बीज आणि पुरूषबीजाचा संयोग होऊन फलित बीज तयार होतं. त्याची वाढ होत असताना जर ते दोन भागात विभागलं गेलं तर अगदी एकसारखी जुळी मुलं तयार होतात. यांना आयडेण्टिकल ट्विन्स म्हणतात. काही वेळा स्त्रीच्या शरीरात चुकून दोन स्त्रीबीजं अंडकोषातून बाहेर येतात. या दोन बीजांचा दोन पुरुष बीजांबरोबर संयोग झाला तर दोन फलित बीजं तयार होतात. अशा वेळी जुळी पण वेगवेगळे गुणधर्म असणारी मुलं तयार होतात. ती दिसायला एकसारखी नसतात. यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगीदेखील असू शकते. यांना फ्रॅटर्नल ट्विन्स म्हणतात.

हातात हात घेतल्याने, मिठी मारल्याने दिवस जाऊ शकतात का?

हातात हात घेतल्याने, मिठी मारल्याने दिवस जाऊ शकतात का?

नाही. केवळ हातात हात घेतले, मिठी मारली, चुंबन घेतलं तर दिवस जात नाहीत. पुरुषाच्या शरीरातील पुरुषबीज स्त्रीच्या शरीरातील स्त्रीबीजापर्यंत जावं लागतं आणि तिथे त्यांचा संयोग होऊन फलित बीज तयार झालं तरच दिवस जातात, किंवा गर्भ राहतो. मात्र हे होण्यासाठी पुरुषाच्या लिंगाचा आणि स्त्रीच्या योनीचा संपर्क यावा लागतो. त्याशिवाय मुलगी किंवा स्त्री गरोदर राहू शकत नाही.

एकदाच संबंध आले तरी दिवस जाऊ शकतात का?

एकदाच संबंध आले तरी दिवस जाऊ शकतात का?

यासाठी आपल्याला स्त्रीच्या शरीरातलं पाळी चक्र समजून घ्यावं लागेल. स्त्रीच्या शरीरात साधारणपणे महिन्यातून एक स्त्रीबीज तयार होतं आणि बीजकोषातून बाहेर येतं. स्त्रीबीज बीजनलिकेमध्ये केवळ १२ ते २४ तास इतका काळ जिवंत राहू शकतं. बीज बाहेर येण्याच्या आधीचे चार दिवस आणि नंतरचे दोन दिवस हा काळ ‘गर्भधारणेचा काळ’ मनाला जातो. या काळात पुरुषबीजाचा संपर्क झाला तर फलित गर्भ तयार होतो. मात्र या काळाच्या व्यतिरिक्त इतर दिवशी संबंध आले तर दिवस रहात नाहीत. मात्र गर्भधारणेच्या काळामध्ये वीर्याचा एक थेंबही पुरेसा असतो. कारण एका थेंबामध्येसुद्धा हजारो पुरुषबीजं असतात. पुरुषबीजांना शुक्राणू असंही म्हणतात. म्हणूनच एकदा संबंध आले तरीही गर्भधारणेची शक्यता असते.

गर्भाशयाचा आकार लहान असतो तरीही त्याच्यात बाळ कसं काय मावतं?

गर्भाशयाचा आकार लहान असतो तरीही त्याच्यात बाळ कसं काय मावतं?

गर्भाशय अतिशय लवचिक व मजबूत अश्या स्नायूंनी बनलेले असते. जसजसा बाळाचा आकार वाढतो तसतसा गर्भाशयाचा आकारही वाढतो. बाळाला सामावून घेण्यासाठी गर्भाशय मोठ्या प्रमाणात ताणलं जाऊ शकतं. बाळाचा जन्म झाल्यानंतर काही महिन्यांनी गर्भाशयाचा आकार परत पूर्वीप्रमाणे होतो.

पोटातलं मूल बाहेर कसं येतं?

पोटातलं मूल बाहेर कसं येतं?

स्त्रीच्या शरीरात गर्भाशय असतं, ज्यामध्ये गर्भ वाढतो. साधारणपणे नऊ महीने पूर्ण वाढ झाल्यावर गर्भाशयाचे स्नायू आकुंचन-प्रसरण पावायला लागतात. वाढ झालेल्या गर्भाला योनिमार्गाच्या दिशेने ढकलायला सुरूवात होते. योनीमार्ग हळू हळू उघडतो आणि डोक्याच्या दिशेने बाळ बाहेर येतं. कधी कधी बाळ पोटात आडवं असतं. अशा वेळी शस्त्रक्रिया करून बाळ बाहेर काढावं लागतं. त्याला ‘सिझेरियन’ असं म्हणतात.

शरीर संबंधांच्या वेळी स्त्रियांना दुखतं का?

शरीर संबंधांच्या वेळी स्त्रियांना दुखतं का?

शरीर संबंधांच्या वेळी स्त्रियांना दुखतंच असं काही नाही. हे संबंध जर एकमेकांच्या संमतीने, एकमेकांच्या विश्वासाच्या आधारावर आणि एकमेकांना समजून घेऊन होत असतील तर त्यामध्ये वेदना होण्याची शक्यता कमी असते. मात्र जर असे संबंध जबरदस्तीने होत असतील, त्यामध्ये त्या मुलीची किंवा स्त्रीची मंजुरी नसेल तर मात्र शरीर विरोध करतं आणि संबंध वेदनादायी होऊ शकतात.

लैंगिक उतेतजना निर्माण झाल्यानंतर स्त्रीच्या योनिमार्गामध्ये एक स्त्राव तयार होत असतो. हा स्त्राव योनिमार्ग ओला ठेवतो. मात्र त्यासाठी थोडा काळ जावा लागतो. योनिमार्ग जर कोरडा असेल आणि घाईने त्यामध्ये पुरुषाचे लिंग शिरले तर ते स्त्रीसाठी वेदनादायी ठरू शकतं. म्हणून शरीर संबंधांच्या वेळी स्त्रीची संमती आणि प्रत्यक्ष संभोगाआधी थोडा काळ प्रणय आवश्यक असतो.

मूल नको असेल तर काही उपाय करता येतात का?

मूल नको असेल तर काही उपाय करता येतात का?

मूल नको असेल तर काही साधनं वापरता येतात. यातील काही पद्धती स्त्रियांसाठी तर काही पुरुषांसाठी असतात. गर्भधारणा होऊ नये व गर्भ रुजू नये म्हणून केल्या जाणाऱ्या उपायांना ‘गर्भनिरोधन’ असं म्हणतात. 1. स्त्रीबीज किंवा पुरुषबीज तयार न होऊ देणे, 2. स्त्री आणि पुरुषबीजाचं मिलन रोखणे किंवा 3. फलित गर्भ गर्भाशयामध्ये रुजू न देणे अशा विविध पद्धतींनी आपण गरोदरपण रोखू शकतो. पुरुषांसाठी निरोध किंवा कंडोम हे साधन वापरले जाते. निरोध ही एक विशिष्ट प्रकारच्या रबरापासून (लॅटेक्स) तयार केलेली पिशवी असते. त्याला वंगण लावलेलं असतं, ज्यामुळे निरोध सहजपणे लिंगावर चढवता येतो. शरीर संबंधांच्या वेळी लिंग ताठर झाल्यावर वीर्य बाहेर येण्याच्या आधी निरोध लिंगावर चढवावा लागतो. यामुळे जेव्हा लिंगातून वीर्य बाहेर येतं तेव्हा ते निरोधमध्ये साठतं आणि योनीमध्ये जात नाही. वीर्याचा योनिमार्गाला स्पर्श न झाल्याने त्यातील पुरुषबीजं देखील योनीमार्गात पोचत नाहीत. अशा रीतीने निरोध वापरून पुरुषबीज आणि स्त्रीबीजाचं मिलन रोकता येतं.

स्त्रियांसाठी असणाऱ्या पद्धती मात्र वेगळ्या रीतीने काम करतात. स्त्रीबीज तयार होऊ नये म्हणून काही कृत्रिम संप्रेरकं गोळ्यांवाटे रोज घेता येतात. या कृत्रिम संप्रेरकांमुळे स्त्रीबीज बीजकोषांतून बाहेर येत नाही आणि गर्भाधारणेची शक्यता टळते.

गर्भधारणेनंतर गर्भाशयाच्या भिंतीवर फलित गर्भ रुजतो आणि तिथेच त्याची वाढ होते. हे होऊ नये म्हणून गर्भाशयामध्ये तांब्याची एक इंग्रजी टी आकाराची तार बसवतात. या साधनाला कॉपर टी किंवा तांबी म्हणतात. या साधनामुळे गर्भाशयाच्या भिंतीवर गर्भ रुजू शकत नाही.

स्त्रियांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेत नक्की काय करतात?

स्त्रियांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेत नक्की काय करतात?

कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेत बीजकोष (ओव्हरी) व गर्भाशय यांच्यामधील बीजनलिकेला छेद दिला जातो. जेणेकरून शुक्राणू व स्त्रीबीज यांचा संयोग होत नाही. यासाठी बीजवाहकनलिका कापून किंवा मुडपून त्याची टोकं बांधली जातात.

कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतर पाळी जाते का?

कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतर पाळी जाते का?

नाही. कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतरही शरीरातील ग्रंथी तसंच बीजकोष काम करतात व गर्भाशयात अस्तरही बनते. त्यामुळे कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतरही पाळी येतच राहते. काही कारणाने जर स्त्रीचे गर्भाशय काढावे लागले तरच तिची पाळी येणे बंद होते.

गर्भनिरोधकं वापरणं चांगलं का वाईट?

गर्भनिरोधकं वापरणं चांगलं का वाईट?

आपल्याला मूल हवं का नको हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक जोडप्याला आहे. खास करून स्त्रियांना हा अधिकार आहे कारण पोटात मूल वाढवून ते जन्माला घालण्याचं काम स्त्री करते. त्यामुळे मूल हवं का नको हे ठरवण्याचा अधिकार स्त्रीला असायला हवा. गर्भनिरोधकांचे आपल्या शरीरावर काही परिणाम होतात. त्यामुळे त्याचा विचार करून आणि त्याची माहिती घेऊन गर्भनिरोधकांचा वापर करायला हवा. पुरुषांसाठीचा निरोध ही सर्वात सुरक्षित पद्धत मानली जाते. निरोध कसा वापरायचा हे नीट शिकून घेतलं तर नको असलेल्या गर्भधारणेपासून आणि लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांपासून आपण आपले संरक्षण करू शकतो. निरोध वापरल्याने लैंगिक सुखामध्ये बाधा येत नाही. उलट संसर्गाची किंवा गर्भधारणेची भीती नसल्याने संबंध जास्त सुखकर होऊ शकतात.

पाळीच्या काळात माझ्या पोटात खूप दुखतं. ते का?

पाळीच्या काळात माझ्या पोटात खूप दुखतं. ते का?

पाळीच्या काळाच गर्भाशयाचे स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावत असतात. तसंच प्रोस्टाग्लँडिन नावाचं संप्रेरकही रक्तात सोडलं जात असतं. याचा प्रभाव म्हणून स्नायूंमध्ये वेदना होणं, हाता पायात गोळे येणं, पोटात दुखणं, मळमळणं असे त्रास होतात. काही जणींना गरम पाण्याचा शेक घेतल्याने बरं वाटतं. वेदनाशामक गोळी घेऊन वेदना कमी करता येतात.

पाळीच्या काळात संभोग केला तर चालतं का?

पाळीच्या काळात संभोग केला तर चालतं का?

पाळीच्या काळात जर दोघा जोडीदारांची संमती असेल तर संभोग करण्यास काही हरकत नाही. या काळात गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असल्याने निर्धोकपणे संबंध ठेवता येतात. त्यात काही विटाळ अथवा अपवित्र नाही.

मुखमैथुन आणि गुदमैथुन म्हणजे काय?

मुखमैथुन आणि गुदमैथुन म्हणजे काय?

मैथुनाच्या अनेक प्रकारांपैकी मुखमैथुन आणि गुदमैथुन हे दोन प्रकार आहेत. मुखमैथुनामध्ये स्त्री किंवा पुरुष जोडीदाराच्या लैंगिक अवयवांना मुखाने म्हणजेच तोंडाने स्पर्श करून सुख देतात. पुरुषाचे लिंग जोडीदार तोंडात धरते किंवा स्त्रीच्या योनिला, क्लिटोरिसला तोंडाने, जिभेने स्पर्श करून उत्तजना निर्माण केली जाते. मुखमैथुनामध्ये लैंगिक अवयव स्वच्छ असणं आवश्यक आहे. तसंच जर तोंडामध्ये जखमा असतील, हिरड्या किंवा दातातून रक्तस्राव होत असेल तर एच आय व्ही, एच पी व्ही किंवा एड्ससारख्या लिंगसांसर्गिक आजारांचा धोका असतो.

गुदामैथुन म्हणजे गुदद्वारामार्गे लिंगप्रवेश करणे. पुरुष स्त्री किंवा पुरुष जोडीदाराच्या गुदद्वारामध्ये आपले लिंग सरकवतो. गुदामैथुनामध्ये कधी कधी गुदद्वाराला आतमध्ये जखमा होण्याची शक्यता असते. योनिमार्गासारखे गुदद्वाराचे स्नायू लवचिक नसल्याने तिथे इजा होऊ शकतात. यासाठी चांगल्या प्रकारचे वंगणयुक्त जेलसारखे पदार्थ वापरणं उपयोगी ठरतं.

पुरुषांना स्त्रियांपेक्षा जास्त कामेच्छा असते का?

पुरुषांना स्त्रियांपेक्षा जास्त कामेच्छा असते का?

हा एक प्रचलित समज आहे. आपल्या समाजात पुरुषांच्या वागण्यासंबंधी जे काही ठोकताळे आहेत त्यामध्ये त्याच्या लैंगिक भावना जास्त तीव्र असतात असा समज प्रचलित आहे. या समजाला शास्त्रीय आधार नाही. पुरुषांनी लैंगिक भावना व्यक्त करणं काही अयोग्य मानलं जात नाही. तसंच त्याने लैंगिक इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण करण्यासाठी त्याने काहीही करणं हेही मर्दानगीचं लक्षण मानण्यात आल्याने हे मिथक तयार झालं आहे. पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही लैंगिक भावना असतात आणि त्यादेखील तीव्र असू शकतात. मात्र त्या व्यक्त करण्याची संधी त्यांना मिळत नाही. स्त्रियांना कामुक विषयांबाबत बोलणं किंवा तशा इच्छा व्यक्त करण्याची परवानगी नसल्याने असा समज तयार झाला आहे.

लग्नाआधी सेक्स करणं योग्य आहे का?

लग्नाआधी सेक्स करणं योग्य आहे का?

सेक्स किंवा समागम ही एकमेकांवरील प्रेमाची, शारीरिक ओढीची अभिव्यक्ती असू शकते. शरीराची गरज म्हणूनदेखील शरीरसंबंध ठेवले जाऊ शकतात. ती एक आदिम, मानवी प्रेरणा आहे. काहींना ती तीव्रपणे वाटते तर काहींना ती अजिबात वाटत नाही. आदिम काळापासून स्त्री, पुरुष एकमेकांकडे आकर्षित होऊन समागम करत आले आहेत. लग्न किंवा विवाह हा समागम करण्यासाठीचा, शरीर संबंध ठेवण्यासाठीचा समाजमान्य मार्ग समजला जातो. सेक्स करण्यात चांगलं किंवा वाईट काही नाही. मात्र दोघा जोडीदारांची संमती आणि एकमेकांवर विश्वास मात्र हवा. सेक्स ही एक जबाबदार क्रिया आहे. त्यामध्ये दिवस जाण्याची शक्यता आहे. त्याच्या परिणामांची माहिती आधीच असणं आवश्यक आहे. या जबाबदारीची जाणीव दोघाही जोडीदारांना असणं गरजेचं आहे.

निरोध वापरल्यामुळे लैंगिक सुखात बाधा येते का?

निरोध वापरल्यामुळे लैंगिक सुखात बाधा येते का?

निरोधचा वापर गर्भधारणा टाळण्यासाठी तसंच इतर लिंगसांसर्गिक आजार टाळण्यासाठी केला जातो. लैंगिक संबंधांमध्ये पुरुषाचं लिंग ताठर झाल्यावर निरोध लिंगावर चढवला जातो. निरोध चांगल्या प्रतीचा आणि लवचिक असेल तर त्याने लैंगिक सुखामध्ये बाधा येत नाही. उलट गर्भधारणेची भीती नसल्यामुळे संबंध निर्धोक होऊ शकतात.

माझं एका मुलावर प्रेम आहे आणि मला त्याच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा आहे. मी काय करू?

माझं एका मुलावर प्रेम आहे आणि मला त्याच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा आहे. मी काय करू?

प्रेमामध्ये शारीरिक जवळीक आणि सेक्स या दोन गोष्टी दोन्ही जोडीदारांच्या इच्छेने आणि संमतीने व्हाव्यात. तुमच्या मनात लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तुमचा जोडीदार तयार आहे का, त्याची इच्छा आहे का याचा अंदाज घ्या. तुमच्या मनातली इच्छा त्याच्याशी मोकळेपणाने बोला आणि त्याची इच्छा असेल तर दोघांच्या संमतीने लैंगिक संबंध ठेवा. एकाची इच्छा नसताना दुसऱ्याने त्याच्यावर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकणं योग्य नाही.

माझा एक काका मला जवळ घेतो आणि अंगावरून हात फिरवतो. मला ते आवडत नाही, मी काय करू?

माझा एक काका मला जवळ घेतो आणि अंगावरून हात फिरवतो. मला ते आवडत नाही, मी काय करू?

तुम्हाला न आवडणारा कोणताही स्पर्श नाकारण्याचा आणि तसं स्पष्टपणे सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुमच्या मर्जीविरोधात कुणीही तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. मग ती व्यक्ती नात्यातली असेल, ओळखीची असेल किंवा परकी असेल. तुमच्या काकाच्या वागण्याविषयी तुमच्या विश्वासातील एखाद्या व्यक्तीशी बोला आणि कशा प्रकारे काकाला असं वागणं थांबवायला सांगता येईल याचा विचार करा. तुमची यात काही चूक नाही हे मनाशी पक्कं करा. स्पष्टपणे तुमच्या काकाला त्याचं असं वागणं थांबवायला सांगा. जर तुम्ही एकत्र राहत असाल आणि तुम्हाला त्याच्यापासून वेगळं राहणं शक्य नसेल तर त्याच्यासोबत शक्यतो एकटं राहू नका. 1098 या क्रमांकावर चाइल्ड लाइन या संस्थेची तुम्ही मदत घेऊ शकता.

आमच्या समोरच्या बागेबाहेर एक माणूस त्याचे कपडे काढून लिंग बाहेर काढतो आणि मुलींना दाखवतो. तो असं का करतो?

आमच्या समोरच्या बागेबाहेर एक माणूस त्याचे कपडे काढून लिंग बाहेर काढतो आणि मुलींना दाखवतो. तो असं का करतो?

स्वतःच्या लैंगिक अवयवांचं सार्वजनिक ठिकाणी  प्रदर्शन करणं हा लैंगिक विकृतीचा एक प्रकार आहे. समोरच्याला आपलं लिंग दाखवून आनंद मिळवण्याचा हा प्रकार आहे.  कुणाच्याही मर्जीशिवाय अशा प्रकारे लैंगिक अवयव मुद्दामहून दाखवणं अयोग्य आहे.

ब्लू फिल्म पाहणं चांगलं का वाईट?

ब्लू फिल्म पाहणं चांगलं का वाईट?

ब्लू फिल्म किंवा पोर्नोग्राफी पाहणं हा आपापल्या निवडीचा भाग असू शकतो. अनेकदा अनेकांसाठी लैंगिक संबंधांबद्दल माहिती मिळवण्याचं ते एकमेव साधन असू शकतं. लैंगिकतेबद्दल, लैंगिक संबंधांबद्दल अजूनही आपल्याकडे मोकळेपणाने बोललं जात नाही. मनातल्या शंका मोकळेपणाने कुणाला विचारता येत नाही. अशा वेळी अनेक मुलंमुली पोर्नोग्राफी, ब्लू फिल्म पाहून त्यातून माहिती मिळवतात.

मात्र आपण जे पाहतो त्याचा अर्थ समजून घेता आला पाहिजे. अनेकदा अशा चित्रपटांमध्ये लैंगिक संबंध हिंसक पद्धतीने चित्रित केलेले असतात. अनेकदा त्यामध्ये लैंगिक संबंधांबद्दल अवास्तव अशा कृती दाखवलेल्या असतात. त्यातून बऱ्याचदा लैंगिक संबंधांबद्दल, सेक्सबद्दल विकृत स्वरुपाची किंवा अवाजवी अशा कल्पना तयार होऊ शकतात आणि प्रत्यक्षात आपल्या जोडीदाराकडून तशा संबंधांची मागणी होऊ लागते. अशी जबरदस्ती मात्र गैर आहे. ब्लू फिल्म पाहणं गैर नाही मात्र त्याचा अर्थ लावणं आणि त्यातली विकृती किंवा भडकपणा मात्र टाळता यायला हवा.

ब्लू फिल्ममध्ये दाखवतात तसे एका वेळी अनेकांशी संबंध ठेवता येतात का?

ब्लू फिल्ममध्ये दाखवतात तसे एका वेळी अनेकांशी संबंध ठेवता येतात का?

लैंगिक संबंध विविध तऱ्हेचे असतात. एकाच वेळी अनेकांशी लैंगिक क्रिया करण्याची उदाहरणं आहेत. कधी कधी अशा प्रकारे एका वेळी अनेक जण एकमेकांबरोबर लैंगिक क्रिया करतात. मात्र यामध्ये देखील सहभागी व्यक्तींची सहमती आवश्यक आहे. कोणाच्याही शरीराचा गैरवापर केला जाणार नाही, कुणाच्याही मर्जीविरोधात अशा क्रिया होणार नाहीत, कुणाला त्यातून शारीरिक, मानसिक इजा होणार नाही याची हमी आवश्यक आहे.

मी आणि माझ्या मित्राने आमची एक सेक्स क्लिप केली आहे. ती त्याच्या फोनमध्ये आहे. त्याने ती अपलोड केली तर?

मी आणि माझ्या मित्राने आमची एक सेक्स क्लिप केली आहे. ती त्याच्या फोनमध्ये आहे. त्याने ती अपलोड केली तर?

तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे लैंगिक संबंध असणं आणि त्याची तुम्ही क्लिप बनवणं वा न बनवणं हा तुम्हा दोघांमधला प्रश्न आहे. मात्र अशा पद्धतीने तयार केलेली क्लिप केवळ तुमच्यापुरतीच राहील याची खात्री तुम्ही देऊ शकता का? तुमच्या लैंगिक क्रिया हा अतिशय व्यक्तिगत आणि नाजूक प्रश्न आहे. त्यामध्ये इतर कुणीही ढवळाढवळ करू शकत नाही. तसंच तुमच्या दोघांच्या मर्जीविरोधात त्या संबंधांचं चित्रण इतर कुणापर्यंत पोचणं हादेखील खाजगीपणाच्या अधिकाराचा भंग आहे. तुमचा जोडीदार ती क्लिप अपलोड करेल अशी भीती तुम्हाला वाटत असेल तर तसं त्याला स्पष्टपणे सांगा आणि तसं करणं हा विश्वासाचा भंग असेल. तसंच कायद्यानेदेखील हा गुन्हा ठरेल याची त्याला पूर्वकल्पना द्या. (इन्फर्मेशन टेक्नोलॉजी कायदा, 2000 च्या कलम 66 ई नुसार कोणत्याही व्यक्तीबद्दल तिच्या मर्जीशिवाय तिच्या खाजगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन होईल असं काहीही प्रसारित करणे हा गुन्हा आहे.)

अशा क्लिप्स खरंच बनवणं गरजेचं आहे का? अशा गोष्टींचा गैरवापर होण्याची शक्यता कायमच असते.  ब्लॅकमेलिंगसाठी, बदला घेण्यासाठी किंवा बदनामी करण्यासाठी असा गैरवापर झाला तर त्यातून होणारा अपमान, दबाव पुढे आयुष्यभर आपल्या सोबत राहतात.

माझे स्तन खूप मोठे आहेत. मला त्याची लाज वाटते.

माझे स्तन खूप मोठे आहेत. मला त्याची लाज वाटते.

शरीराबद्दल काही प्रतिमा समाजात तयार झालेल्या असतात. त्या काळाप्रमाणे आणि संस्कृतीप्रमाणे बदलतात. प्रत्येक समाजामध्ये, संस्कृतीमध्ये स्त्रीच्या आणि पुरुषाच्या शरीराची एक विशिष्ट प्रतिमा तयार झालेली असते. फॅशनजगत आणि सिनेमा, जाहिरातींमधून आपल्यासमोर ही प्रतिमा सतत येत असते. बारीक, सुडौल आणि प्रमाणबद्ध शरीर अशी ही प्रतिमा असते. त्या प्रतिमेशी आपण आपल्या शरीराची तुलना करू लागलो तर बहुतेक जण त्या प्रतिमेमध्ये बसणार नाहीत. तुमचे स्तन मोठे असतील तर त्यामध्ये लाजण्याचं किंवा वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. आजूबाजूच्या मुलींच्या शरीराशी तुलना करू नका. तुमचं शरीर तुमचं स्वतःचं आहे. त्यातल्या काही गोष्टी बदलता येतात तर काही नाही. स्तनांचा आकार लहान आहे का मोठा यापेक्षा तुम्ही स्वतःला कसं कॅरी करता, कशा वावरता हे जास्त महत्त्वाचं आहे.

झीरो फिगर म्हणजे काय?

झीरो फिगर म्हणजे काय?

साइझ 0 आणि 00 हा अमेरिकन कपड्यांमधला सर्वात लहान साइझ आहे. छाती-कंबर-नितंबाचं प्रमाण – 30-22-32 असं धरण्यात येतं. साइझ 00 हा त्याहून अर्धा ते 2 इंचाने कमी असतो. या साइझच्या कपड्यांची चलती सुरू झाल्यावर त्या प्रकारची फिगर असण्याची मॉडेल्सवर आणि सिने अभिनेत्रींवर सक्ती करण्यात येऊ लागली. भारतामध्ये करीना कपूरने झीरो फिगर मिळवण्यासाठी आपलं वजन 65 किलोवरून 48 किलोपर्यंत कमी केलं. अतिशय बारीक होण्याच्या आणि झीरो फिगर मिळवण्याच्या दबावामुळे अनोरक्झियासारखे अनेक गंभीर आजार मॉडेल्समध्ये आणि किशोरवयीन मुलींमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसू लागल्यानंतर झीरो फिगर असणाऱ्या मॉडेल्सना मोठमोठी फॅशन हाउसेस नकार देऊ लागली. पूर्वी साइझ झीरो असणाऱ्या अनेक मॉडेल्सनीही तरुण मुलींना या प्रकारच्या अतिरेकापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

मला गुदमैथुन आवडतं. त्यात काही धोका नाही ना?

मला गुदमैथुन आवडतं. त्यात काही धोका नाही ना?

गुदामैथुनामध्ये पुरुषाचं लिंग गुदद्वारातून आत जातं. गुदद्वाराचे स्नायू योनिमार्गाप्रमाणे लवचिक नसतात. त्यामुळे लिंग पुढे मागे करताना त्या स्नायूंना इजा पोचू शकते. हे टाळण्यासाठी गुदद्वारामध्ये चांगल्या प्रकारचे वंगण असणारे पदार्थ वापरले पाहिजेत. तसंच निरोध वापरतानाही तो फाटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पाण्याचा अंश असणारे वंगण किंवा थुंकीचा वापरही करता येतो.

समलिंगी संबंध विकृत असतात का?

समलिंगी संबंध विकृत असतात का?

कुठल्याही लैंगिक संबंधांप्रमाणे समलिंगी संबंध नैसर्गिक, स्वाभाविक आहेत. एखाद्या व्यक्तीला कोणाबद्दल लैंगिक आकर्षण वाटेल हे नैसर्गिक आहे. त्यामध्ये विकृत किंवा घाणेरडं असं काही नाही. स्त्रीला स्त्रीबद्दल आणि पुरुषाला पुरुषाबद्दल लैंगिक आकर्षण वाटणं आणि त्यांनी समलिंगी व्यक्तींबरोबर लैंगिक क्रिया करणं नॉर्मल आहे. हे संबंध परस्पर संमतीने होणं आणि त्यामध्ये कसलीही जबरदस्ती नसणं हे आवश्यक आहेच.

हिजडा म्हणजे काय?

हिजडा म्हणजे काय?

हिजडा हा जन्माने पुरुष असतो. काही समाजांमध्ये मुलगा किंवा मुलगी देवाला वाहण्याची प्रथा आहे. अशा मुली देवदासी किंवा जोगतिणी बनतात. तर मुलं हिजडा किंवा जोगते बनतात. लहानपणापासून मुलींचे कपडे घालावेसे वाटणं, तसंच राहणं-वागणं, हावभाव अशामुळे त्यांचं वागणं स्त्रियांसारखं होतं. काही वेळा उपजीविकेसाठी काही हिजडे लैंगिक व्यवहार करतात. सेक्ससाठी सोपं जावं म्हणूनही कधी कधी लिंग आणि वृषण काढून टाकले जातात. मात्र आपलं शरीर स्त्रीसारखं दिसावं अशी तीव्र ओढ हीच अशा प्रकारच्या शारीरिक बदलांमागचं खरं कारण आहे. अगदी आतून स्त्रीसारखं व्हायचा ध्यास असल्यामुळे स्तन वाढवण्यासाठी स्त्री संप्रेरकांची औषधं किंवा इंजेक्शन वापरणं, सिलिकॉन इम्प्लांट्स करून घेणं हेही उपाय केले जातात.

मला कुणाबद्दल प्रेमच वाटत नाही. माझ्यामध्ये काही बिघाड आहे का?

मला कुणाबद्दल प्रेमच वाटत नाही. माझ्यामध्ये काही बिघाड आहे का?

कुणाबद्दल प्रेम न वाटणं किंवा आकर्षण न वाटणं यात गैर किंवा चुकीचं काही नाही. प्रत्येक व्यक्तीला शारीरिक किंवा लैंगिक आकर्षण वाटेलच असा काही नियम नाही.

मी कोणत्याही मुलीशी बोललेलं माझ्या गर्लफ्रेंडला आवडत नाही. मी काय करू?

मी कोणत्याही मुलीशी बोललेलं माझ्या गर्लफ्रेंडला आवडत नाही. मी काय करू?

प्रेमाच्या नात्यांमध्ये असा हक्क गाजवण्याचा किंवा मालकी दाखवण्याचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतो. आपल्या सिनेमा आणि साहित्यामधूनही अशा प्रकारची नाती रंगवली जातात. तुझ्यावर केवळ माझा हक्क आहे किंवा माझ्याशिवाय इतरांकडे तू पहायचं पण नाही अशा प्रकारची नाती अनेक नाटक-सिनेमा-गाणी-सिरियलमधून आजही दाखवली जातात. पण असं दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर आणि इतरांशी असणाऱ्या नात्यांवर बंधन आणणं योग्य नाही. प्रेमाच्या नात्याबरोबर आपली इतरांशी मैत्री असते, नातं असतं, जबाबदाऱ्या असतात त्याचा स्वीकार प्रेमामध्ये आवश्यक आहे. आणि हे स्त्री आणि पुरुष दोघांना लागू आहे. मुलीनी कोणाशीही संबंध ठेवायचे नाहीत आणि मुलं मात्र कसंही वागली तरी चालेल असा दुटप्पीपणा नात्यामध्ये असू नये. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना मदत करणं या गोष्टी तुमच्या प्रेमाच्या आड येऊ शकत नाहीत किंवा त्यामुळे तुमचं तुमच्या जोडीदारावरचं प्रेम कमी होत नाही हे तुमच्या मैत्रिणीला समजावून सांगा. तसंच इतर मुलींशी बोलणं हे केवळ लैंगिक स्वरुपाचंच आहे असंही नाही हे स्पष्ट करा. तुमची गर्लफ्रेंड तिच्या मित्र मैत्रिणींशी मोकळेपणाने बोलते का, त्याबद्दल तुम्ही काही आक्षेप घेत नाही ना हेही तपासून पहा.

गेल्या महिन्यात माझे आणि माझ्या मित्राचे संबंध आले होते. या महिन्यात माझी पाळी आलेली नाही. मला दिवस गेले असतील का?

गेल्या महिन्यात माझे आणि माझ्या मित्राचे संबंध आले होते. या महिन्यात माझी पाळी आलेली नाही. मला दिवस गेले असतील का?

दिवस जाण्यासाठी स्त्री बीजाचा आणि पुरुष बीजाचा संयोग होणं गरजेचं असतं. लैंगिक संबंधांमध्ये जेव्हा पुरुषाचं लिंग स्त्रीच्या योनिमार्गातून आत जातं तेव्हा काही काळानंतर त्यातून वीर्य सोडलं जातं. वीर्यामध्ये लाखो पुरुष बीजं असतात. तुमचे मित्राबरोबर संबंध आले तेव्हा त्याचं लिंग योनिमार्गामध्ये गेलं होतं का आणि त्यातून वीर्य बाहेर आलं होतं का हे आठवा. तसंच पाळी चक्राच्या साधारणपणे कोणत्या काळात संबंध आले हेही पहा. पाळी येण्याच्या साधारण दोन आठवडे (12-16 दिवस) आधी अंडोत्सर्जन होतं. तुमच्या पाळीचक्राच्या साधारण कितव्या दिवशी तुमचे संबंध आले ते तपासून पहा. अंडोत्सर्जनाच्या आधीचे चार आणि नंतरचे चार दिवस जननक्षम मानले जातात. म्हणजेच या काळात गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जनाच्या आसपास तुमचे संबंध आले असतील आणि त्यानंतर 17 दिवसाहून अधिक काळ उलटून गेला असेल तर गरोदरपणाची तपासणी करून घ्या.

गर्भपात कसा करतात? गर्भपात करणं योग्य आहे का?

गर्भपात कसा करतात? गर्भपात करणं योग्य आहे का?

भारतामध्ये गर्भपात कायद्याने मान्य आहे. काही विशिष्ट परिस्थितीत गर्भपात करण्यास वैद्यकीय गर्भपात कायदा परवानगी देतो. भारतामध्ये 20 व्या आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याची परवानगी आहे. 12 आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित असतो. गर्भधारणा, मूल पोटात वाढवणं आणि ते जन्माला घालणं ही सर्व स्त्रीला करावं लागतं. त्यामुळे तिची त्यासाठी तयारी असणं आवश्यक असतं. जर तिच्या मर्जीविरोधात तिला दिवस गेले असतील तर होणारा गर्भ पोटात वाढवायचा का नाही आणि मूल जन्माला घालायचं का नाही हे ठरवण्याचा अधिकार स्त्रीकडे असणं आवश्यक आहे.

गर्भपात करण्याच्या विविध पद्धती आहेत. लवकरात लवकर आणि 12 आठवड्याच्या आत केलेला गर्भपात सुरक्षित असतो. मॅन्युअल व्हॅक्युम अॅस्पिरेशन ही गर्भपाताची सर्वात सुरक्षित पद्धत आहे. त्यामध्ये एका सिरिंजच्या मदतीने गर्भाशयाच्या भिंतीवरील आवरण ओढून घेतले जाते. क्युरेटिंग ही गर्भपाताची मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी पद्धत आहे. यामध्ये एका चमच्यासारख्या उपकरणाने गर्भाशयाचं आवरण खरवडून काढून घेतलं जातं. काही प्रकारच्या गोळ्यांचा वापर करूनही गर्भपात केला जातो. या सर्व पद्धती तज्ञ व प्रशिक्षित व्यक्तीने करणं आणि त्यासाठी दवाखाना सुसज्ज असणं आवश्यक असतं.

गर्भाशयामध्ये काड्या घालून, पोटावर दाब देऊन किंवा उड्या मारून गर्भपात होत नाही. उलट या उपायांमुळे गर्भाशयाला आणि इतर अवयवांना गंभीर इजा होऊ शकते.

गर्भपाताचा अधिकार स्त्रियांच्या आरोग्याचा आणि लैंगिक व प्रजनन अधिकारांचा महत्त्वाचा भाग आहे.

एका तरी मुलीला पटव अशी चॅलेंज माझ्या मित्रांनी दिली आहे. त्यासाठी मी काय करू?

एका तरी मुलीला पटव अशी चॅलेंज माझ्या मित्रांनी दिली आहे. त्यासाठी मी काय करू?

वाढत्या वयात, तरुणपणी आपण मर्द असल्याचं किंवा आपण इतर कुणापेक्षाही कमी नाही हे दाखवण्याचं एक वेड प्रत्येकामध्ये असतं. मुलींना प्रेमात पडायला भाग पाडणं किंवा पटवणं हा त्यातलाच एक भाग आहे. पण प्रेम ही दोन व्यक्तींच्या संमतीने होणारी गोष्ट असायला हवी. तुमचं एखाद्या मुलीवर खरंच प्रेम असेल तर तिच्यापाशी ते जरूर व्यक्त करा. मात्र मित्रांनी पैज लावली म्हणून एखाद्या मुलीला प्रेमात पाडणं आणि तुम्हीही तुमची इच्छा नसताना प्रेमात पडणं सिनेमात ठीक आहे. प्रत्यक्षात त्यातून पुढे काय होईल ते तुम्हाला निभवायला लागणार आहे.

 

About I सोच

I Soch encourages Pune youth to SPEAK OUT on equality, safety, diversity within the discussions of sexuality. It is a platform to learn, argue and clarify.

191 comments

 1. one of the best useful sites

  • Dear Manoj,
   Thank you for visiting the site. Do send your ideas and views on the site as well as topics linked to sexuality.

   • मी माझ्या gf सोबत पाळी नंतर 5 व्या दिवशी सेक्स केला आहे कंडोम शिवाय ….पण जेव्हा वीर्य बाहेर येतय असं वाटलं तेव्हा मी लिंग बाहेर काढलं पण असं वाटतय की 20% वीर्य आत गेल आणि 80% बाहेर पडलं …..तर मला सांगा गर्भधारणा होण्यासाठी किती वीर्य आत जावं लागतं? आणि माझं लिंग योनीत जास्त आत पण गेलं नव्हतं

    • मित्रा, कमी वीर्य आत गेले याचा अर्थ गर्भधारणा होणार नाही असे नाही. एक वीर्याच्या थेंबात अनेक शुक्राणू असतात आणि गर्भधारणेसाठी एक शुक्राणू पुरेसा देखील पुरेसा असतो. आता राहिला प्रश्न गर्भधारणा होण्याचा. पाळीच्या पाचव्या दिवशी संबंध आले म्हणजे गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते पण नाकारता येत नाही. मासिक पाळीच्या कोणत्या काळात गर्भधारणा होते हे प्रत्येक स्त्रीचं पाळीचक्र किती दिवसांचं आहे यावर अवलंबून असतं. पाळीचक्र खूप लहान असेल (२८ किंवा २५ दिवसांपेक्षा कमी) तर लवकर अंडोत्सर्जन होते. पाळीचक्र खूप लहान असेल आणि ५ व्या दिवशी संबंध आले तर गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

     नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य ते गर्भनिरोधक वापरणे गरजेचे आहे. तसेच जोडीदाराबरोबर याविषयी चर्चा करून दोघांच्या संगनमताने कोणते गर्भनिरोधक वापरायचे हे ठरवले पाहिजे. शिवाय आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे. ‘नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी’ या वेबसाईटवरील लेखातून तुम्हाला अधिक माहिती मिळेल. खाली लिंक दिली आहे. http://letstalksexuality.com/contraception/

     • तिची पाळी दोन महिन्याची आहे ….

     • काळजी करण्याची कारण नाही. माझी पाळी फार लवकर येते किंवा माझी पाळी फार उशीराने येते अशी वाक्यं आपण नेहमी ऐकत असतो. काही मुलींची पाळी 21-22 दिवसांनी येते तर काहींना दोन दोन महिने पाळी येत नाही. कधी कधी आजारपणात पाळी पुढे ढकलली जाते तर कधी प्रवासामुळे दगदग होऊन पाळी अपेक्षेपेक्षा लवकर येते. प्रत्येकीचं पाळीचं चक्र जसं वेगळं असतं तसंच दोन पाळी चक्रांमध्ये पण फरक पडू शकतो. यासाठी पाळीची लांबी कशी ठरते ते समजून घेऊ या.डॉक्टर सांगतात बरोबर 14व्या दिवशी अंडोत्सर्जन होतं आणि 28 व्या दिवशी पाळी येते. पण खरं तर हे पूर्ण सत्य नाही. प्रत्येकीच्या शरीराची आणि पाळीच्या चक्राची गती वेगळी असते.पाळीचक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्वाची घटना असते. एकदा का बीज बीजकोषातून बाहेर आलं आणि गर्भधारणा झाली नाही तर त्यानंतर साधारणपणे 12-16 दिवसांनी पाळी सुरू होते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधीचा काळ मात्र निश्चित असतोच असं नाही. तो बदलू शकतो. प्रवास, मानसिक ताण, औषधोपचार अशा विविध कारणांमुळे हा काळ कमी किंवा जास्त होऊ शकतो. मात्र अंडोत्सर्जन झाल्यानंतर मात्र 16 दिवसात पाळी येते.त्यामुळे लवकर का उशीरा यापेक्षाही आपलं स्वतःचं पाळीचं चक्र कसं आहे ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं.

      अधिक माहितीसाठी – http://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि http://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.

 2. कंडोम च्या वापरामुळे शरीरसंबंधाची भावना कमी होते का ?

  • कंडोमबद्दलचा हा मोठा गैरसमज आहे. शरीर संबंधांची भावना कंडोममुळे कमी होत नाही. तसंच लैंगिक संबंधांमध्येही कंडोम वापरल्यामुळे काही अडथळा येत नाही.
   आणि खरं तर कंडोमच्या वापरामुळे लैंगिक आजारांचा धोका कमी होतो आणि गर्भधारणा होण्याची भीतीही राहत नाही. यामुळे लैंगिक संबंध निश्चिंतपणे होऊ शकतात.

   • तुषार चौगले

    जर मुलीला मासिक पाळी असेल आणि kiss केलेत तर मूल होण्याची शक्यता असते का

 3. 11वर्षाच्या मुलीला प्रेम होते का

  • याचं उत्तर हो आणि नाही असं द्यावं लागेल. कोणत्या वयात प्रेम जडेल याचे काही नियम नाहीत त्यामुळे 11 वर्षाच्या वयातही प्रेम वाटू शकतं. मात्र प्रेम आणि आकर्षण यातला फरक मात्र या वयात कळतोच असं नाही. तसंच 11 वर्षाच्या वयात कुणावर प्रेम जडलंय का एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटतंय हे समजण्याइतकी समज असतेच असं नाही. समवयस्क मुला-मुलीवर प्रम जडलं असेल तर त्यात काही वावगं नाही. मात्र आपल्यापेक्षा खूप मोठ्या माणसावर प्रेम जडलं असेल आणि त्याच्याकडूनही तसा रिस्पॉन्स येत असेल तर मात्र ते धोक्याचं ठरू शकतं. त्याला प्रेम म्हणता येणार नाही. कारण संमती देण्याची क्षमता या वयात नसते.

   • माझ्या लिंगा ला वेदना होत आहेत काय करू प्लिज सांगा

    • यासाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

 4. Maze ling Lahan ahe tasech shighra patan hote upay sanga

  • लिंग लहान असणे ही समस्या असू शकत नाही. लिंगाचा आकार, लांबी आणि लैंगिक समाधान याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. सेक्स मध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा असतो. लिंगाचा आकार आणि लैंगिक समाधान हा विषय प्रश्न उत्तरांमध्ये अनेकदा चर्चिला आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आधीच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे अवश्य वाचा. शीघ्रपतनावर मात्र तुम्हाला उपाय शोधता येईल. संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. शीघ्रपतनाची अनेक कारणे आहेत. सेक्सविषयी भीती, अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही शीघ्रपतन होऊ शकतं. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. कधी कधी तर जोडीदाराविषयी आकर्षण आणि प्रेम नसेल तरी शीघ्रपतन होऊ शकतं. शीघ्रपतन होऊ नये म्हणून सेक्सबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे. वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल. अधिक माहितीसाठी या वेबसाईटवरील ‘शीघ्रपतनाविषयी जाणून घ्या…’ हा लेख जरूर वाचा. या लेखासाठी लिंक http://letstalksexuality.com/premature-ejaculation/

   • माझ्या लिंगा ला वेदना होतायत

    • यासाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

 5. मला माइा stamina वाङवाचा आहे काय कर

  • इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे सेक्स stamina वाढवून तुम्हाला कोणत्या परीक्षेत किंवा स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे का? जर का सेक्स stamina वाढवण्याबद्दल तुमच्या मनात काही गैरसमज असेल किंवा न्यूनगंड असेल तर तो काढून टाका. सेक्स ही एक आनंद देणारी प्रक्रिया आहे. यामध्ये जोडीदाराबरोबर योग्य तो संवाद होणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांची शरीरं, एकमेकांच्या लैंगिक इच्छा, अपेक्षा समजून घेणं खूप महत्वाचं असतं.
   बाजारात सेक्स stamina किंवा पॉवर वाढवण्याच्या नावावर अनेक औषधं उपलब्ध आहेत. परंतु योग्य त्या वैद्यकीय सल्ल्याशिवाय अशी औषधे घेणं धोकादायक ठरू शकतं. व्यायम, योग्य आहार आणि मन आनंदी राहील अशा कृतींमुळे तुम्ही निरोगी राहू शकता. आणि तुमची तब्येत चांगली असेल तर सेक्समध्येही तुम्हाला जास्त आनंद मिळू शकेल. शरीरातलं रक्ताभिसरण सुरळित असेल तर लिंगाचा ताठरपणा आणि इतर क्रिया सुलभपणे होतात.
   सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठीची औषधं आजारावर उपाय म्हणून वापरली जातात. ज्यांना लिंगामध्ये ताठरपणा येत नाही त्यांच्यासाठी अशा औषधांचा उपयोग होतो. तशी काही समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि सांगितलेल्या प्रमाणातच औषधं घ्या. काही समस्या नसेल तर औषधं घेण्याची गरज नाही.

 6. तुषार चौगले

  जर मुलीला मासिक पाळी असेल आणि kiss केलेत तर मूल होण्याची शक्यता असते का?

  • मासिक पाळी असताना अथवा नसताना कधीही किस किंवा चुंबन घेतल्याने गर्भधारणा होत नाही म्हणजेच मुलही होत नाही.

   गर्भधारणा कशी होते हे जाणून घेण्यासाठी ” गर्भधारणा नक्की कशी होते” हा लेख वाचा.
   लिंक :- http://letstalksexuality.com/conception/

 7. लोकेश माशेलकर

  मला वाटते की तुम्ही या वेबसाईट वर मी वाचले क़ी लग्ना आधी सेक्स करन वाइट नाही त्यामुळे अनेकांना वाटते की आपण मजा करण्यासाठी कितीही सम्बन्ध ठेवले तरी काहीही फरक पडणार नाही त्यामुळे त्या मुला मुलींचे लक्ष फक्त सेक्स वर राहील करिअर कड़े किंवा अन्य बाबींकडे त्यांचे दुर्लक्ष होईल ते वाइट मार्गाला लागतील आणि आपल्या भारतीय संस्कृतिला हे मान्य नाही
  तरी या वेबसाईट च्या माध्यमातून मुला मुलींना यासम्बन्धी योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती।

  • धन्यवाद लोकेश,

   आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आणि तुमच्या सूचनेबद्दल आभारी आहोत.

   तुम्ही सांगीतल्याप्रमाणे आम्ही वेबसाईटवर लैंगिक अधिकारांबरोबरच जबाबदारीचीही जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न करतो.
   तरुणांना लैंगिकता म्हणजे काय, लैंगिक संबंध म्हणजे काय, त्यातील वैविध्य आणि त्यासंबंधीची मूल्यं समजावीत हा या वेबसाइटचा उद्देश आहे. निवडीचा अधिकार, प्रतिष्ठा, वैविध्य, समानता आणि आदर हे मानवी अधिकार लैंगिकतेची मूलभूत तत्वं युवकांपर्यंत पोहोचावीत यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.

   आम्हाला आपल्याला नम्रपणे सांगावेसे वाटते की, एखादी गोष्ट भारतीय संस्कृतीला किंवा कोणत्याही संस्कृतीला मान्य आहे किंवा नाही हे आपण कोणत्या आधारावर ठरवतो? याचा मात्र विचार केला पाहिजे.

   शास्त्रीय लैंगिक शिक्षण ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि त्यामुळे तरुण अधिक जबाबदार लैंगिक वर्तन करतील हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. संस्कृतीच्या नावाखाली या विषयांवर बोलणं टाळून आपण प्रश्न अधिक किचकट तर करत नाही ना ? हाही प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे.

   प्रतिक्रियेबद्दल पुन्हा एकदा आभार

   तरुणांशी लैंगिकतेविषयी बोलणे अत्यंत गरजेचे आहे.
   भारतीय संस्कृतीला

 8. तुम्ही बनवलेल्या ह्या वेबसाईटला भरभरून शुभेच्छा अतिशय उत्तम माहिती तुम्ही तुमच्या ह्या माध्यमातून प्रसिद्ध केलीत त्या बदल खरच शतशः तुमचे आभार. खूप काही शंकाच निर्सारण ह्या माध्यमातून केलेलं आहे आणि पुढेही होत राहील ,निदान तुमच्या ह्या माहिती मुळे हिंसक गोष्टींना नक्कीच आळा बसेल ह्याचा मला विश्वास आहे……… पुनः एकदा मनपुर्वक आभार

  • धन्यवाद दीपक, तुमच्या शुभेच्छा आणि प्रतिक्रिये बद्दल खूप खूप आभारी आहे. वाचकांच्या प्रतिक्रिया या आमच्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन आणि प्रेरणा आहे. वेबसाईटवर नियमित भेट देत चला आणि तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियांचे स्वागत.

 9. Muth marlyane Kay hote nehmi

  • बोलीभाषेमध्ये काहीजण हस्तमैथुनाला मुठ मारणे असे म्हणतात. तुम्हालाही कदाचित तेच म्हणायचे असावे असे समजून उत्तर देत आहे. याशिवाय तुम्हाला दुसरे काही विच्रायचे असेल तर सविस्तर विचारू शकता.

   हस्तमैथुन केल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. उलटपक्षी हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत मिळेल. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक निरोगी नसतो हे लक्षात घेऊ यात. सतत हस्तमैथुन करण्याची इच्छा निर्माण होणे हे देखील योग्य नाही. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे तसे जर का होत असेल तर आपले लक्ष दुसऱ्या क्रियाशील कामांमध्ये घालण्याचा प्रयत्न करा. वाचन करा, जर आपण विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करा, खेळांमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करा. असं दिसून आलं आहे की ज्या व्यक्ती एकाकी आणि दुःखी असतात त्या जास्त प्रमाणावर हस्तमैथुन करतात. तुमच्या बाबत असं काही होत आहे का याकडे लक्ष द्या. एकाकीपणा घालवण्यासाठी बाहेर पडणं, इतरांना भेटणं, गरजेचं आहे. दुःखाचं कारण शोधायचा प्रयत्न केलात तर त्यावरही काही मार्ग काढता येतील. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. त्यामुळे अपराधी वाटून घेऊ नका. मात्र मात्र हस्तमैथुन केल्याशिवाय किंवा दुसऱ्या कशानेच आनंद मिळत नाही अशी स्थिती येऊ देऊ नका.

 10. मासिक पाळी आली असताना पतीने पत्नी पासून दूर का रहावे ? तिला किस केल्याने जी लाळ आपसांत जाते त्याने आतील काही शारीरिक फरक पडतो का ?

  • मासिक पाळीच्या काळात दूर रहावे हा गैरसमज आहे. तसेच किस केल्याने लाळ आपसांत जाऊन काहीही शारीरिक बदल होत नाहीत. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. या दिवसांत संबंध आले तर गर्भधारणेची भीतीही नसते. मासिक पाळी च्या दरम्यान सेक्स करू नये असा काहीही नियम नाही. हा एक प्रचलित गैरसमज आहे की मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीर संबंध येऊ देऊ नयेत. ह्या गैर समाजाचा संबंध पाळीच्या काळात स्त्री अपवित्र असते, तिला स्पर्श वर्ज असतो, पाळीतील रक्त अपवित्र असतं म्हणून तिला ‘बाजूला’ बसवलं गेलं पाहिजे ई अशास्त्रीय बाबी ज्या आपण अनेक पिढ्या सांभाळत आलो आहोत त्यांच्याशी आहे. ह्या पितृप्रधान परंपरा आणि गैरसमजुतीनाच प्रश्न विचारणं गरजेचं आहे.
   पण या सोबतच एक गोष्ट लक्षात ठेवू या की पाळी दरम्यान रक्त स्त्राव होत असतो. काही जणींना या काळात ओटी पोटात दुखणे, पाठ दुखणे किंवा चीड चीड होणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. अशा काळात शरीर संबंधांची इच्छा नसणं, नको वाटणं सहज आहे. तसं असेल तर त्याचा आदर कारण गरजेचं आहे. लक्षात घ्या शरीर संबंधांसाठी त्यात सामील व्यक्तींनी एकमेकांची संमती, इच्छा, एकमेकांप्रती किमान आदर आणि सर्वांचा आनंद ह्या गोष्टीना महत्व देणं फार गरजेचं आहे.
   पाळीच्यावेळी स्त्रीच्या योनीच्या आतल्या भागाला संरक्षण करणाऱ्या जिवाणूंचे संतुलन बिघडलेलं असतं. अशा वेळी जर निरोध न वापरता संभोग झाला व जर पुरुषाला एड्स किंवा इतर लैंगिक आजार असेल तर स्त्रीला लैंगिक आजारांची लागण होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. काहींना मासिक पाळीच्या वेळी योनीतून रक्त जात असताना त्यात लिंग घालून संभोग करायला घाण वाटतं, असं वाटत असेल तर या कळत संभोग करू नये. काही स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होतो. या त्रासामुळे तिला विश्रांतीची गरज वाटू शकते. त्रासामुळे तिचा मूड नसेल तर संभोग करू नये.

   मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीराची अगदी नैसर्गिक क्रिया असूनही पाळीच्या काळात बाईला अपवित्र मानलं जातं.
   किती तरी मुली आणि बायकांना पाळीच्या काळात बंधनं सहन करावी लागतात. स्वयंपाक करायचा नाही, देवळात जायचं नाही, देवपूजा करायची नाही, तुळशीला पाणी घालायचं नाही, लोणच्याला हात लावायचा नाही, पापड करायचे नाहीत… एक ना अनेक. आणि सर्वच जाती-धर्मामध्ये काही ना काही प्रमाणात ही बंधनं घातलेलीच आहेत. गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित असा फारसा फरकही दिसत नाही. खरं तर सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे की पाळीचं रक्त स्त्रीच्या शरीरातच तयार होतं आणि जर गर्भ राहिला तर त्या रक्तावरच त्याचं पोषण होतं. मग हे रक्त खराब, विटाळ कसं बरं असेल? बाईला पाळी येणं ही श्वसन, पचन किंवा रक्ताभिसरणासारखीच एक अत्यंत नैसर्गिक अशी क्रिया आहे. ती घाण नाही, अपवित्र नाही आणि तिचा इतरांवर कसलाही परिणाम होत नाही. पाळीच्या काळात जी शिवताशिवत केली जाते त्यामुळे मुलींच्या मनात स्वतःच्या शरीराविषयी नकोशी भावना तयार होते.

   ही भावना संपवू या. पाळीमध्ये अपवित्र काहीही नाही, पाळीच्या काळात मुली-बाया नॉर्मल असतात.

 11. सर लग्ना नंतर प्रेम प्रकरण चालू ठेवू शकतो का?

  • खरंतर कोणी कोणासोबत नाते किंवा प्रेम (प्रकरण ?) सुरु ठेवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र मात्र समोरच्या व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक तयारी, आदर, संमती, इच्छा याही गोष्टी महत्वाच्या आहेत. शिवाय अशा नात्यांमध्ये अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते.

   अशा संबंधाना सामाजिक मान्यता नसल्याने ज्या व्यक्तीसोबत लग्न झाले आहे त्या व्यक्तीला अंधारात ठेवण्याची शक्यता असते. नात्यामध्ये पारदर्शकता असणे कोणत्याही नात्यासाठी चांगले असते. यामध्ये तुम्ही कोणाची फसवणूक तर करत नाही ना ? याचाही विचार करावा असे वाटते.

   या नात्यामध्ये लैंगिक संबंधही सुरु असतील तर पुढील काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
   जर कोणी खोटी आश्वासने, लग्नाचे आमिष, भीती, दबाव आणून कोणत्याही स्त्रीसोबत लैंगिक संबंध ठेवत असेल तरीही तो कायद्याने बलात्कार मानला जातो. सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजेच योग्य ते गर्भ निरोधक वापरून संबंध ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या लैंगिक संबंधांमध्ये नको असणारी गर्भधारणा टाळणं, लैंगिक आजारांपासून संरक्षण आणि एचआयव्ही/ एड्सपासून बचाव करणं यासाठी कंडोमचा वापर करणे आवश्यक आहे. विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवत असताना काही महत्वाच्या मुद्द्यांवर विचार करावा असे वाटते.

   अशा संबंधांमध्ये भावनिक गुंतवणूक होण्याची शक्यता असते ज्यामुळे लग्नामध्ये (पती पत्नीमध्ये) वाद विवाद होण्याची शक्यता असते.
   ब्लॅकमेलिंग ची शक्यता असते.
   दुसऱ्याच्या पत्नीसोबत सेक्स करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
   जर कोणी खोटी आश्वासने, आमिष, भीती, दबाव आणून कोणत्याही स्त्रीसोबत लैंगिक संबंध ठेवत असेल तरीही तो कायद्याने बलात्कार मानला जातो.
   संबंधांमध्ये नको असणारी गर्भधारणा टाळणं, लैंगिक आजारांपासून संरक्षण आणि एचआयव्ही/ एड्सपासून बचाव करणं यासाठी कंडोमचा वापर करणे आवश्यक आहे.

 12. hastmaithul kelyan shukra dhatu ch praman kami hot ka? tyamule pregnancy hot nahi ka upay Santa please

  • हस्तमैथुन केल्याने शुक्राणूंचे प्रमाण कमी होत नाही किंवा गर्भधारणेसाठी काहीही अडचण येत नाही. हस्तमैथुन केल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. उलटपक्षी हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे (बिनधास्त वाचा…) जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे. ‘FAQ – शंका समाधान’: http://letstalksexuality.com/frequently-asked-questions/ प्रश्नोत्तरे (बिनधास्त वाचा…) :- http://letstalksexuality.com/question/

 13. मुल झल्यानंतर कीती दिवसानी सेक्स करावा

  • सामान्यतः प्रसूतीनंतर चार ते सहा आठवड्याच्या कालावधीनंतर लैंगिक संबंध पूर्ववत चालू करण्यात काहीही अडचण नसते. प्रसुतीनंतर सेक्स करताना प्रसूती कोणत्या प्रकारची होती नॉर्मल की सिझेरिअन, प्रसुतीदरम्यान किती टाके पडले, काही अडचणी किंवा धोके होते का इ. गोष्टींचा विचार करावा. प्रसुतीदरम्यान काही अडचणी आल्या असतील तर मात्र सेक्स सुरु करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
   निरोगी लैंगिक संबंधांमध्ये दोघांच्या सहमतीची आवश्यकता असते. विशेषतः बाळंतपणातून नुकतीच गेलेल्या स्त्रीची शारीरिक आणि मानसिक तयारी आणि इच्छा महत्वाची. मात्र लगेचची गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य गर्भ निरोधक वापरणं गरजेचं आहे. दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवणं स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसंच कुटुंब नियोजनाच्या दृष्टीनेही गर्भ निरोधन फायद्याचं आहे.

 14. Hiii…sir must webside ahe…mla ek vichrych hoth mala ani mzhi gf la sex kru vathto hyt khi chukich nhi ahe ka? Kru ka sex amhi? Plz yogh margdarshan kra.

  • धन्यावाद !हा निर्णय तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मदतीने घ्या. आपल्या वेबसाईटवरील ‘सेक्ससाठी तुम्ही तयार आहात का?’ http://letstalksexuality.com/are-you-ready-for-sex/ तसेच सेक्स बोले तो http://letstalksexuality.com/category/talking-about-sex/ हा सेक्शन जरूर वाचा. याची तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला निर्णय घेताना नक्की मदत होईल

 15. Plese sir mla madat kra sir…plese

 16. Maja Lund kadi kadi uthath nahi ani tahech virya baher yete mag mala sex nahi karts yet me Kay karu

  • इथे एका गोष्टींवर तुमचे लक्ष वेधावे वाटते. पुरुषांच्या जनन अंगाला लिंग आणि वृषण असे अधिक योग्य आणि सोपे, सुटसुटीत शब्द उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे त्यांचा शिव्यांमध्ये किंवा हीन अर्थी वापर सहसा केला जात नाही.

   सेक्स करताना/संभोगादरम्यान वेळेआधीच वीर्य बाहेर येणे याला शीघ्रपतन असेही म्हणतात. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. शीघ्रपतनाची अनेक कारणे आहेत. सेक्सविषयी भीती, अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही शीघ्रपतन होऊ शकतं. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. कधी कधी तर जोडीदाराविषयी आकर्षण आणि प्रेम नसेल तरी शीघ्रपतन होऊ शकतं. शीघ्रपतन होऊ नये म्हणून सेक्सबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे. वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल. अधिक माहितीसाठी या वेबसाईटवरील ‘शीघ्रपतनाविषयी जाणून घ्या…’ हा लेख जरूर वाचा. या लेखासाठी लिंक http://letstalksexuality.com/premature-ejaculation/

 17. माझ्या गलफड ची छाती खुप कमी आहे काही ऊपाय सागा

 18. प्रत्येक व्यक्तीनुरुप शरीररचना वेगवेगळी असू शकते. अगदी जुळी मुलं देखील स्वभाव आणि शरीराने एकसारखी नसतात. त्याचप्रमाणे, प्रत्येक मुलीचे, स्त्रीचे स्तन देखील वेगवेगळ्या आकाराचे असतात. प्रत्येकाच्या प्रकृती आणि वयानुसार लहान, मोठे, सैल अथवा घट्ट असू शकतात . महत्वाचं म्हणजे स्तन मोठे असावेत की छोटे, सैल असावेत की घट्ट असा काहीही मापदंड नाही. समाजामध्ये स्तनांच्या आकाराविषयी अनेक गैरसमज आढळतात. स्तनांचा आकार आणि सौंदर्य किंवा लैंगिक समाधान याच्याशी लावला जातो. पण यात काहीही तथ्य नाही. हे जाणीवपूर्वक पसरवले गेलेले गैरसमज आहेत. स्तनांच्या आकारावर लैंगिक क्रियेतील आपली रुची, आवड किंवा लैंगिक सुख देण्या-घेण्याची क्षमता अवलंबून नसते. स्तन फार संवेदनशील असतात, हलक्या स्वरूपाच्या स्पर्शानेही ते उत्तेजित होतात. चिञपट किंवा मालिकांमधून देखील स्त्रिया या उपभोगाच्या वस्तू आहेत त्यांनी आकर्षक दिसलंच पाहिेजे असा आभास निर्माण केला जातो. तसेच काही मार्केट धार्जिणे लोक स्तन सुडौल करण्यासाठी उपाय आहेत असा दावा करून त्यांची उत्पादने खपवत असतात. माध्यमांनी दिलेल्या साईजमध्ये जे बसत नाही त्यांना न्यूनगंड आणि जे बसतात त्यांना अहंकार येतो. खरतरं वयानुसार स्तनांचा आकार बदलत राहतो. अनेकवेळा दोन्ही स्तन देखील एकसारखे नसतात. त्यात फिकीर करण्याचं काही कारण नाही. स्तन सुडौल करणारी कोणतीही वैद्यकीय औषधं उपलब्ध नाहीत. चुकीच्या सौंदर्याच्या कल्पनांना नक्कीच छेद देता येवू शकतो. स्तनांच्या आकाराच्या संदर्भातील व्हिडीओची लिंक देत आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. https://www.youtube.com/watch?v=OJSTDekZ4YE

 19. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. या दिवसांत संबंध आले तर गर्भधारणेची भीतीही नसते. मासिक पाळी च्या दरम्यान सेक्स करू नये असा काहीही नियम नाही. हा एक प्रचलित गैरसमज आहे की मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीर संबंध येऊ देऊ नयेत. ह्या गैर समाजाचा संबंध पाळीच्या काळात स्त्री अपवित्र असते, तिला स्पर्श वर्ज असतो, पाळीतील रक्त अपवित्र असतं म्हणून तिला ‘बाजूला’ बसवलं गेलं पाहिजे ई अशास्त्रीय बाबी ज्या आपण अनेक पिढ्या सांभाळत आलो आहोत त्यांच्याशी आहे. ह्या पितृप्रधान परंपरा आणि गैरसमजुतीनाच प्रश्न विचारणं गरजेचं आहे.
  पण या सोबतच एक गोष्ट लक्षात ठेवू या की पाळी दरम्यान रक्त स्त्राव होत असतो. काही जणींना या काळात ओटी पोटात दुखणे, पाठ दुखणे किंवा चीड चीड होणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. अशा काळात शरीर संबंधांची इच्छा नसणं, नको वाटणं सहज आहे. तसं असेल तर त्याचा आदर कारण गरजेचं आहे. लक्षात घ्या शरीर संबंधांसाठी त्यात सामील व्यक्तींनी एकमेकांची संमती, इच्छा, एकमेकांप्रती किमान आदर आणि सर्वांचा आनंद ह्या गोष्टीना महत्व देणं फार गरजेचं आहे.
  पाळीच्यावेळी स्त्रीच्या योनीच्या आतल्या भागाला संरक्षण करणाऱ्या जिवाणूंचे संतुलन बिघडलेलं असतं. अशा वेळी जर निरोध न वापरता संभोग झाला व जर पुरुषाला एड्स किंवा इतर लैंगिक आजार असेल तर स्त्रीला लैंगिक आजारांची लागण होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. काहींना मासिक पाळीच्या वेळी योनीतून रक्त जात असताना त्यात लिंग घालून संभोग करायला घाण वाटतं, असं वाटत असेल तर या कळत संभोग करू नये. काही स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होतो. या त्रासामुळे तिला विश्रांतीची गरज वाटू शकते. त्रासामुळे तिचा मूड नसेल तर संभोग करू नये.

 20. गुदद्वारामधे संभोग करताना लिन्ग ताठर होते इतर वेळी नाही पण बायको गुदात लिन्ग घालू देत नाही काय करावे?

  • लैंगिक संबंधांमध्ये समोरच्या व्यक्ती इच्छा आणि संमती असेल तरच ते अधिक सुखकर होऊ शकतात. काहीजणांना गुदमैथुन आवडत नाही. तुम्ही जोडीदाराच्या इच्छेचा आदर ठेवला पाहिजे.

   राहिला प्रश्न लिंगाला ताठरता येण्याचा. त्यावर नक्कीच उपाय शोधता येईल. लैंगिक प्रश्नांमध्ये सर्वात मोठा प्रश्न जो अनेक पुरुषांना भेडसावतो, तो म्हणजे शीघ्र वीर्यपतन. काहींना याची इतकी लाज वाटते की ते संभोग करायचं टाळतात. या प्रश्नामुळे पुरुषांचा आत्मविश्वास खूप कमी होतो. खालील शिघ्रपातानाविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या लिंक दिल्या आहेत.
   http://letstalksexuality.com/premature-ejaculation/
   http://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

 21. गुदद्वारामधे संभोग करताना लिन्ग ताठर होते इतर वेळी नाही पण बायको गुदात लिन्ग घालू देत नाही काय करावे?

  • लैंगिक संबंधांमध्ये समोरच्या व्यक्ती इच्छा आणि संमती असेल तरच ते अधिक सुखकर होऊ शकतात. काहीजणांना गुदमैथुन आवडत नाही. तुम्ही जोडीदाराच्या इच्छेचा आदर ठेवला पाहिजे.

   राहिला प्रश्न लिंगाला ताठरता येण्याचा. त्यावर नक्कीच उपाय शोधता येईल. लैंगिक प्रश्नांमध्ये सर्वात मोठा प्रश्न जो अनेक पुरुषांना भेडसावतो, तो म्हणजे शीघ्र वीर्यपतन. काहींना याची इतकी लाज वाटते की ते संभोग करायचं टाळतात. या प्रश्नामुळे पुरुषांचा आत्मविश्वास खूप कमी होतो. खालील शिघ्रपातानाविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या लिंक दिल्या आहेत.
   http://letstalksexuality.com/premature-ejaculation/
   http://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

 22. रोज दिवसातून दोन वेळा हस्तमैथून करणे हे अयोग्य आहे का?
  म्हणजे यामूळे भविष्यात काय दुष्परिणाम होतात काय?
  अतिहस्तमैथूनामूळे पूढे मूल होत नाय हे खरंय का?

  • सेक्स Toys वापरणं योग्यकी अयोग्य. त्याचे शरीरावर काही परीणाम होतात का?

   • लग्न न झालेल्या प्रौढ व्यक्तीला, विधवा व्यक्तीला, अपंग व्यक्तींना किंवा इतर व्यक्ती ज्यांना लैंगिक जोडीदार मिळणं कठीण असतं. अशा वेळी जोडीदाराशिवाय लैंगिक आनंद मिळवण्यासाठी काहीजण लैंगिक उपकरणे किंवा खेळणी वापरतात. दुसऱ्या कोणाला धोका न पोहचवता किंवा त्रास न देता लैंगिक खेळणी (sex toys) वापरून लैंगिक आनंद अनुभवण्यास काहीच हरकत नाही. जर योग्य ती स्वच्छता राखून आणि लैंगिक अवयवांना इजा होणार नाही यांची काळजी घेऊन लैंगिक खेळणी (sex toys) वापरली तर काहीही धोका नाही. जर एकापेक्षा अनेक व्यक्तींनी एकच लैंगिक खेळणी किंवा साधने वापरली तर मात्र लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार होण्याची शक्यता असते.

  • हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनामुळे लग्नानंतर सेक्स करण्यासाठी कोणतीही समस्या येत नाही तसचं मूल होण्यातही काहीही अडचण येत नाही. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. त्यामुळे अपराधी वाटून घेऊ नका. मात्र मात्र हस्तमैथुन केल्याशिवाय किंवा दुसऱ्या कशानेच आनंद मिळत नाही अशी स्थिती येऊ देऊ नका
   आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक निरोगी नसतो. सतत हस्तमैथुन करण्याची इच्छा निर्माण होणे हे देखील योग्य नाही. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे तसे जर का होत असेल तर आपले लक्ष दुसऱ्या क्रियाशील कामांमध्ये घालण्याचा प्रयत्न करा. वाचन करा, जर आपण विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करा, खेळांमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करा. असं दिसून आलं आहे की ज्या व्यक्ती एकाकी आणि दुःखी असतात त्या जास्त प्रमाणावर हस्तमैथुन करतात. तुमच्या बाबत असं काही होत आहे का याकडे लक्ष द्या. एकाकीपणा घालवण्यासाठी बाहेर पडणं, इतरांना भेटणं, गरजेचं आहे. दुःखाचं कारण शोधायचा प्रयत्न केलात तर त्यावरही काही मार्ग काढता येतील.
   वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत अधिक माहितीसाठी ते लेख नक्की वाचा.

   • रोज हालवल्याने ने काही प्रॉब्लेम होईल का

    • हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिरेक निरोगी नसतो. सतत हस्तमैथुन करण्याची इच्छा निर्माण होणे देखील योग्य नाही हेही आपण हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे तसे जर का होत असेल तर आपले लक्ष दुसऱ्या क्रियाशील कामांमध्ये घालण्याचा प्रयत्न करा. वाचन करा, जर आपण विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करा, खेळांमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करा. असं दिसून आलं आहे की ज्या व्यक्ती एकाकी आणि दुःखी असतात त्या जास्त प्रमाणावर हस्तमैथुन करतात. तुमच्या बाबत असं काही होत आहे का याकडे लक्ष द्या. एकाकीपणा घालवण्यासाठी बाहेर पडणं, इतरांना भेटणं, गरजेचं आहे. दुःखाचं कारण शोधायचा प्रयत्न केलात तर त्यावरही काही मार्ग काढता येतील. वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा.
     http://letstalksexuality.com/question/

  • हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनामुळे लग्नानंतर सेक्स करण्यासाठी कोणतीही समस्या येत नाही तसचं मूल होण्यातही काहीही अडचण येत नाही. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. त्यामुळे अपराधी वाटून घेऊ नका. मात्र मात्र हस्तमैथुन केल्याशिवाय किंवा दुसऱ्या कशानेच आनंद मिळत नाही अशी स्थिती येऊ देऊ नका
   आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक निरोगी नसतो. सतत हस्तमैथुन करण्याची इच्छा निर्माण होणे हे देखील योग्य नाही. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे तसे जर का होत असेल तर आपले लक्ष दुसऱ्या क्रियाशील कामांमध्ये घालण्याचा प्रयत्न करा. वाचन करा, जर आपण विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करा, खेळांमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करा. असं दिसून आलं आहे की ज्या व्यक्ती एकाकी आणि दुःखी असतात त्या जास्त प्रमाणावर हस्तमैथुन करतात. तुमच्या बाबत असं काही होत आहे का याकडे लक्ष द्या. एकाकीपणा घालवण्यासाठी बाहेर पडणं, इतरांना भेटणं, गरजेचं आहे. दुःखाचं कारण शोधायचा प्रयत्न केलात तर त्यावरही काही मार्ग काढता येतील.
   वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत अधिक माहितीसाठी ते लेख नक्की वाचा.

 23. सर जर सेक्स करताना विर्य लवकर गळत असेल तर जास्त वेळ टिकून राहण्यासाठी टिप्स द्या

  • Quickly reply

  • लैंगिक प्रश्नांमध्ये सर्वात मोठा प्रश्न जो अनेक पुरुषांना भेडसावतो, तो म्हणजे शीघ्र वीर्यपतन. काहींना याची इतकी लाज वाटते की ते संभोग करायचं टाळतात. या प्रश्नामुळे पुरुषांचा आत्मविश्वास खूप कमी होतो. खालील शिघ्रपातानाविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या लिंक दिल्या आहेत.
   http://letstalksexuality.com/premature-ejaculation/
   http://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

 24. लिंगाभधिल ठिलेपणा येण्याची कारणे विय्र पिवळसर पातळ दिसणे

  • लैंगिक प्रश्नांमध्ये सर्वात मोठा प्रश्न जो अनेक पुरुषांना भेडसावतो, तो म्हणजे शीघ्र वीर्यपतन. काहींना याची इतकी लाज वाटते की ते संभोग करायचं टाळतात. या प्रश्नामुळे पुरुषांचा आत्मविश्वास खूप कमी होतो. खालील शिघ्रपातानाविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या लिंक दिल्या आहेत.
   http://letstalksexuality.com/premature-ejaculation/
   http://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

 25. माझा लिंगावर एका साईड ला त्वचा पांढरी पडली आहे म्हणजे उलल्या सारखी झाली आहे..मला खरुज झाली होती त्यासाठी मी डॉ दिल्याप्रमाणे क्रिम आणी साबण वापरले होते….

 26. Agodarc mulic sex zal ahe he kasavarun samjate

  • हे ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. वर्जिनिटी ही फार मजेशीर कल्पना आहे. आपले नाते आणि लैंगिक संबंध हे आपल्या इच्छसाठी, प्रेमासाठी आणि नात्याचा भाग म्हणून केले जातात. त्यामध्ये जोडीदाराच्या वर्जिनिटीने काही फरक पडेल असं नाही. आणि जर आधीच्या आयुष्यात लैंगिक संबंध आले का नाही हे माहित करून घ्यायचं असेल, त्याने तुमच्या नात्यावर परिणाम होणार असेल तर बोलणे, संवाद साधणे हा एकमेव मार्ग आहे.

   सेक्स करण्याआधी आणि केल्यानंतर योनीमध्ये म्हणजेच vagina मध्ये काय फरक असतो हे सांगता येत नाही. कुणी जर असा फरक सांगत असेल तर त्याला काहीही शास्त्रीय आधार नाही. मुलींच्या योनीमार्गात एक लवचिक पडदा असतो, ज्याला हायमेन असं म्हणतात. बऱ्याचदा या पडद्याचा संबंध स्त्रीच्या कौमार्याशी लावला जातो. पहिल्या शरीर संबंधांच्या वेळेस रक्त आले तरच स्त्री कुमारी असे मानले जाते. हा खूप मोठा गैरसमज आहे. स्त्रीच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्याच्या पुरुषप्रधान मानसिकतेतून आलेला हा गैरसमज आहे. योनिमार्गातील हा पडदा सायकल चालवणं, खेळ, पोहणं, कष्टाची कामं अशा इतरही कारणांनीही फाटू शकतो. त्यामुळे प्रत्येक मुलीच्या योनीमार्गात हा पडदा असतोच असं नाही आणि तो पहिल्या सेक्सच्या वेळी फाटून रक्त येतंच असं नाही.

 27. मुलांची हस्तमैथुन करण्याची पद्धत कशी आहे

  • स्वतःच्या शरीराला स्पर्श करून लैंगिक सुख मिळवण्याच्या क्रियांना हस्तमैथुन म्हणतात. हस्तमैथुनामध्ये लैंगिक अवयवांना स्पर्श करणे, कुरवाळणे किंवा घासणे या क्रियांचा समावेश होतो. वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले गेले आहेत. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/question/

 28. माझे सौ स्तन मोठे आणि ढिले व लोंबलेले आहे तर kay karayache te sanga

  • प्रत्येक व्यक्तीनुरुप शरीररचना वेगवेगळी असू शकते. अगदी जुळी मुलं देखील स्वभाव आणि शरीराने एकसारखी नसतात. त्याचप्रमाणे, प्रत्येक मुलीचे, स्त्रीचे स्तन देखील वेगवेगळ्या आकाराचे असतात. प्रत्येकाच्या प्रकृती आणि वयानुसार लहान, मोठे, सैल अथवा घट्ट असू शकतात . महत्वाचं म्हणजे स्तन मोठे असावेत की छोटे, सैल असावेत की घट्ट असा काहीही मापदंड नाही. समाजामध्ये स्तनांच्या आकाराविषयी अनेक गैरसमज आढळतात. स्तनांचा आकार आणि सौंदर्य किंवा लैंगिक समाधान याच्याशी लावला जातो. पण यात काहीही तथ्य नाही. हे जाणीवपूर्वक पसरवले गेलेले गैरसमज आहेत. स्तनांच्या आकारावर लैंगिक क्रियेतील आपली रुची, आवड किंवा लैंगिक सुख देण्या-घेण्याची क्षमता अवलंबून नसते. स्तन फार संवेदनशील असतात, हलक्या स्वरूपाच्या स्पर्शानेही ते उत्तेजित होतात. चिञपट किंवा मालिकांमधून देखील स्त्रिया या उपभोगाच्या वस्तू आहेत त्यांनी आकर्षक दिसलंच पाहिेजे असा आभास निर्माण केला जातो. तसेच काही मार्केट धार्जिणे लोक स्तन सुडौल करण्यासाठी उपाय आहेत असा दावा करून त्यांची उत्पादने खपवत असतात. माध्यमांनी दिलेल्या साईजमध्ये जे बसत नाही त्यांना न्यूनगंड आणि जे बसतात त्यांना अहंकार येतो. खरतरं वयानुसार स्तनांचा आकार बदलत राहतो. अनेकवेळा दोन्ही स्तन देखील एकसारखे नसतात. त्यात फिकीर करण्याचं काही कारण नाही. स्तन सुडौल करणारी कोणतीही वैद्यकीय औषधं उपलब्ध नाहीत. चुकीच्या सौंदर्याच्या कल्पनांना नक्कीच छेद देता येवू शकतो. स्तनांच्या आकाराच्या संदर्भातील व्हिडीओची लिंक देत आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. https://www.youtube.com/watch?v=OJSTDekZ4YE

 29. maze lagan tharale aahe ani lagnaparyat amchaya kade 9 mahinyavha kal aahe.asha veli jar aamhi phone varun sex vishayi charcha keli kiva jya ghoshti aamhi bhavishat pratyakshat karnar aahot te jar phone var bolal tar te yogya aahe ka???please sanga.karan asa don teen vela zal aahe ani mala bhitti vatate ki me je karate te yogay nahi.kahi tari chukich aahe.plz advice

  • तुम्हाला जर uncomfortable वाटत असेल तर तसं जोडीदाराला मोकळेपणाने सांगा. तुम्हालाही आवडत असेल, तुमची इच्छा, संमती असेल तर यात काहीही गैर नाही. तुमच्या जोडीदाराशी तुमच्या लैंगिक आयुष्याविषयी बोलणे, मनमोकळा संवाद तुमच्या नात्यासाठी चांगलंच आहे.

 30. lagna aadhi phone through sex chukich aahe ka?

  • तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला यातून आनंद मिळत असेल तर यात काहीही गैर नाही.

   • तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला यातून आनंद मिळत असेल तर यात काहीही गैर नाही. प्रश्न लग्नाआधी किंवा लग्नानंतरचा नाही तर संमती आणि विश्वासाचा आहे.

 31. माझ्या बायकोचे मुल बंद होण्याचे आँपरेशन झाले आहे तरीही तीला गर्भधारणा झाली यावर ऊपाय सुचवा

 32. गर्भ पिशवीत पाणी कसे होते..?

  • कृपया तुमचा प्रश्न अधिक विस्ताराने विचारा म्हणजे उत्तर देणे सोपे जाईल.

 33. लिंगाच्या खाली बारीक फुटकळ्या का असतात?

 34. sir sex kartana virya takne aaplya manawar aste ka mhanje garbh hou dene aaplya manawar aste ka ..

  • संभोग करताना वीर्यपतन होणार याची जाणीव हळूहळू पुरुषाला व्हायला लागते. आणि एक क्षण येतो की, वीर्यपतन होते. आता वीर्यपतन होते म्हणजे नेमके काय होते? पुरूषबीज वाहिन्यांतून पुरुषबीजं व वीर्यकोषातील वीर्य एकत्रितपणे लिंगातून पिचकारीसारखं बाहेर येतं. पुरुषासाठी संभोगातील हा सर्वोच्च बिंदू असू शकतो.

   आता वळूयात तुमच्या मुख्य प्रश्नाकडे, संभोग करताना वीर्यपतन होणार याची जाणीव हळूहळू पुरुषाला व्हायला लागत असेल तरीही ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यावर आपले पूर्ण नियंत्रण असणे शक्य नाही. म्हणूनच वीर्यपतनाच्या वेळी वीर्य बाहेर टाकणे हा गर्भनिरोधनाचा सुरक्षित उपाय असू शकत नाही. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आपल्या जोडीदाराशी संवाद साधून योग्य ते सुरक्षित गर्भनिरोधक वापरणे कधीही चांगले.

   गर्भनिरोधाकांविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
   http://letstalksexuality.com/contraception

 35. And sir , mi ani majhya gf kadun unsafe sex jhala first time , ani virya baherch takle tar pregnency yeu shakte ka….

  • जर संपूर्ण वीर्य बाहेर पडले असेल तर नक्कीच नाही होणार, परंतु संपूर्ण वीर्य बाहेर आलं आहे हा केवळ अंदाज असू शकतो. अनेकवेळा वीर्यपतन होण्याआधी काही थेंब वीर्य बाहेर येण्याची शक्यता असते. अशा वीर्यात शुक्राणूदेखील असतात. यातून गर्भधारणा होण्याची शक्यता आहे. योग्य ती गर्भनिरोधके वापरुन संभोग करणं नेहमीच फायदेशीर असतं

 36. thank u very much…खूप मस्त web siteआहे…माझे खूप सारे गैरसमज दूर झाले .
  पण मला एक प्रश्न विचारावा वाटतो कि हस्तमैथुन याची ठराविक वेळ म्हणजेच per day or किती दिवसांनी केलं पाहिजे ?
  आणि किती वेळा केलं पाहिजे

  • हस्तमैथुन किती वेळा करावं. याचा काही विशेष मापदंड नाही. हस्तमैथून केल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. उलटपक्षी हस्तमैथून ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथूनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत मिळेल.
   दुसरीकडे सतत हस्तमैथून करण्याची इच्छा निर्माण होणे हे देखील योग्य नाही. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे तसे जर का होत असेल तर आपले लक्ष दुसऱ्या क्रियाशील कामांमध्ये घालण्याचा प्रयत्न करा. चांगले वाचन करा, जर आपण विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करा, खेळांमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करा.

 37. Sir majha ani majhya Patnicha raktgat 1ahe AB+ tar ti pregenant ahe tar amchya rakatgatacha kahi parinam mhanje honarya balat kahi dosh nirman karu shakato Ka.m hanaje apangatav vagaries?????

  • रक्तगटासंबंधित एकमेव प्रश्न उद्भवू शकतो तो म्हणजे जर आईचा रक्तगट आरएच निगेटिव्ह (Rh negative) असेल आणि जर तीला आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर मात्र आईला पहिल्या बाळंतपणानंतर किंवा गर्भपातानंतर ४८ तासांच्या आत एक इंजेक्शन घ्यावे लागते. जर इंजेक्शन घेतले नाही तर आईला ऍन्टीबॉडीज म्हणजेच काही विशिष्ट प्रकारच्या री-अॅक्शन येऊ शकतात. तसेच जर तीला पुन्हा पुढच्या वेळी देखील आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर त्या बाळावर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते.
   पुन्हा एकदा आवर्जून नमूद करावेसे वाटते की समान रक्तगट असणाऱ्या पालकांना मुल होण्यात काहीही अडचण येत नाही.

 38. हा कसला प्रश्न ? मुल लैंगिक भावनेत येउन हस्तमैथुन करतात .अजुन तुला समजल नसेल तर तुला एकदा बघाव लागेल .

  • हस्तमैथुन किती वेळा करावं. याचा काही विशेष मापदंड नाही. हस्तमैथून केल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. उलटपक्षी हस्तमैथून ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथूनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत मिळेल.
   दुसरीकडे सतत हस्तमैथून करण्याची इच्छा निर्माण होणे हे देखील योग्य नाही. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे तसे जर का होत असेल तर आपले लक्ष दुसऱ्या क्रियाशील कामांमध्ये घालण्याचा प्रयत्न करा. चांगले वाचन करा, जर आपण विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करा, खेळांमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करा.
   असं दिसून आलं आहे की ज्या व्यक्ती एकाकी आणि दुःखी असतात त्या जास्त प्रमाणावर हस्तमैथुन करतात. तुमच्या बाबत असं काही होत आहे का याकडे लक्ष द्या. एकाकीपणा घालवण्यासाठी बाहेर पडणं, इतरांना भेटणं गरजेचं आहे. दुःखाचं कारण शोधायचा प्रयत्न केलात तर त्यावरही काही मार्ग काढता येतील.
   हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. त्यामुळे अपराधी वाटून घेऊ नका. मात्र हस्तमैथुन केल्याशिवाय किंवा दुसऱ्या कशानेच आनंद मिळत नाही अशी स्थिती येऊ देऊ नका.

 39. माझे पती 15-15 दिवस माझ्या जवळ येत नाहीत
  आले तरी शिघ्रपतन होते
  त्यामुळे माझी खुप चिडचिड होते

  • लैंगिक प्रश्नांमध्ये सर्वात मोठा प्रश्न जो अनेक पुरुषांना भेडसावतो, तो म्हणजे शीघ्र वीर्यपतन. काहींना याची इतकी लाज वाटते की ते संभोग करायचं टाळतात. या प्रश्नामुळे पुरुषांचा आत्मविश्वास खूप कमी होतो. खालील शिघ्रपातानाविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या लिंक दिल्या आहेत.
   http://letstalksexuality.com/premature-ejaculation/
   http://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

  • संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. शीघ्रपतन कोणत्याही वयात होऊ शकते. ही अनेक पुरुषांमध्ये आढळणारी समस्या आहे आणि त्यावर निश्चितच उपाय करता येईल त्यामुळे निश्चिंत रहा. शीघ्रपतनाविषयी सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करून लेख वाचा. http://letstalksexuality.com/premature-ejaculation/ तसेच http://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/ या लिंक वरील लेखामध्ये लेखात शीघ्र वीर्यपतनावर एका तार्किक उपायाचा विचार केला गेला आहे, हा लेख नक्की वाचा. या उपायाचा फायदा होत नसेल तर योग्य त्या डॉक्टरांची अवश्य मदत घ्या.

   आपण आणखी एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की, संभोग हा लैंगिक समाधानाचा एकमेव मार्ग नाही. त्यामुळे तुम्ही प्रणयक्रीडा (fore play) करता यातूनही जोडीदाराला लैंगिक समाधान मिळू शकते. पण तुमच्या जोडीदाराला लैंगिक समाधान मिळते की नाही हे समजून घेण्यासाठी मनमोकळा संवाद हवा.

 40. Sir kiss kelya ntr HIV hotoka

  • फक्त किस केल्याने किंवा चुंबन घेतल्याने काही लैंगिक आजार किंवा एच. आय. व्ही होत नाही. एच. आय. व्ही असणाऱ्या व्यक्तीला किस केल्याने देखील लैंगिक आजार होण्याचा धोका नाही. मात्र, एच. आय. व्ही बाधित व्यक्ती व तिचे चुंबन घेणारी व्यक्ती दोघांच्याही ओठांना अथवा तोंडात जखम असेल व किस करताना अथवा चुंबन घेताना रक्ताशी संपर्क आला तर एच. आय. व्ही ची लागण होऊ शकते. नाही. किस केल्याने लैंगिक आजार होण्याचा धोका नाही. मात्र यापुढे जाऊन लैंगिक संबंध येणार असतील तर कंडोम वापरा.

 41. मला असे विचारायचे होते की संबंध केल्यावर
  किती दिवसांत मूल होण्याची शक्यता असते.
  कृपया करून मला उत्तर दया.

  • प्रत्येकवेळी संबंध केल्यावर मूल होईलच असे नाही. मूल होण्यासाठी स्त्रीबीज आणि पुरुषबीज याचं मिलन होणं आवश्यक आहे. मासिक पाळी येण्य़ाच्या आगोदर १०-१४ दिवस आगोदर एक स्त्रीबीज बीज वाहिनीत येतं. इथे ते साधारण एक दिवस जिवंत राहतं आणि याच दरम्यान पुरुषबीजाशी संपर्क आला तर गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.
   गर्भधारणा नक्की कशी होते हे वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/conception/

  • तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
   http://letstalksexuality.com/conception/
   यांविषयीचे अनेक प्रश्न वेबसाईटवर चर्चिले गेले आहेत तेही वाचा.
   http://letstalksexuality.com/question/

 42. पती पत्नीचे वय समान किवा पती हा पत्नी पेक्षा वयाने लहान असल्यास मुल होत नाही का….?

  उदा. मुलगा वय २८ व मुलगी वय २८ किवा मुलगा वय २७ व मुलगी वय २८ असे असल्यास मुल होत नाही का..?

  • लग्नाच्या नात्यामध्ये जसा मुलगा मुलीपेक्षा मोठा असलेला चालतो तसेच मुलगी मुलापेक्षा मोठी असेल तर काहीही समस्या नाही. तुमचे एकमेकांवर प्रेम असेल, विश्वास असेल आणि लग्नाचं नातं एकमेकांसोबत जगायचं असेल तर बाकी गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता नाही. राहिला प्रश्न गर्भधारणेचा. सर्वसामान्यपणे १८ ते ३० हे वय गर्भधारणेसाठी सुरक्षित मानले जाते. १८ च्या आतील आणि ३० नंतर झालेल्या गरोदरपणात काही धोके उद्भवण्याची शक्यता असते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि निरीक्षणाखाली अनेक ३० च्या गर्भधारणेस अडचण येत नाही. मात्र काही धोके उद्भवण्याची शक्यता असते. गरोदर होण्यासाठी फक्त वयाचा विचार न करता, स्त्रीच्या आरोग्याची स्थिती, तिची मानसिक तयारी, इच्छा या गोष्टींचाही विचार करणे आवश्यक आहे.

 43. मी आणि माझी गर्लफ्रेंड आम्ही खूप वेळा सेक्स केला आहे पण ह्यावेळी सेक्स केल्यानंतर लघवी करताना तिच्या योनीतुन रक्त आलं. आणि दोन तीन दिवस येतच राहील लघवी करताना योनी थोडीफार सुजली आहे, तिला खूप भीती वाटतेय ह्याची, तरी हे काशामुळें घडलं असेल ह्यापूर्वी कधी ब्लड आलं नव्हतं? ती प्रेग्नेंट तर नाही ना होणार आम्ही कंडोम युज केलेला, रक्तस्त्राव कसा थांबवावा? काही उपाय सांग प्लीज

 44. संभोग कसा करावा

  • खरंतर संभोग कसा करावा हा ज्याने त्याने आपल्या जोडीदारासोबत मिळून ठरवण्याची गोष्ट आहे. पहिल्यांदा सेक्स करताना मनात शंका, भीती असणे स्वाभाविक आहे. वेबसाईटवरील ‘सेक्स बोले तो’ हा सेक्शन आणि प्रश्नोत्तरे हा सेक्शन अवश्य वाचा. खाली लिंक दिली आहे.

   http://letstalksexuality.com/category/talking-about-sex/

   http://letstalksexuality.com/question/

 45. लिंग वाकडे(उजव्या ) आहे व अंडाशय खालीवर आहे योग्य मार्गदर्शन करा व लैंगिक जीवनावर काही फरक होईल का?

  • लिंगातील वाकडेपणा हा बऱ्याच पुरुषांना सतावणारा प्रश्न असतो परंतु नैसर्गिकरित्या सर्वच पुरुषांच्या लिंगाला थोड्या फार प्रमाणात बाक असतो. फार थोड्या पुरुषाचं लिंग अगदी सरळ असतं. या बाकामुळे संबंधांच्या वेळी काही अडचण येत नाही. परंतु संभोग करताना जर का वेदना होत असतील तर डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरेल. क्वचित केसेस मध्ये लिंगाचा वाकडेपणा खूप जास्त वाढलेला दिसतो व त्यामुळे लिंगाला योनीत किंवा गुदद्वारात प्रवेश करताना अडचण येते. शस्त्रक्रिया करून किंवा मेडिकल उपकरणांचा वापर करून लिंगाचा बाक कमी करता येऊ शकतो.
   फार काही त्रास होत नसेल तर काळजी करू नका. व्यक्ती तितक्या प्रकृती.
   शिश्नाच्या खालील बाजूस वृषण असते. या वृषणामध्ये दोन बीजकोष असतात. या दोन्ही बीजकोषाचा आकार सारखाच असतो असं नाही. जर लिंगाला संभोगादरम्यान ताठरता येत असेल आणि वीर्यामध्ये पुरेसे शुक्राणू असतील तर अंडकोष किंवा वृषण लहान असल्याने काहीही अडचण येत नाही. सेक्स किंवा संभोग करताना जर लिंगाला ताठरता येत असेल तर संभोग करताना अथवा लैंगिक सुखामध्ये बाधा येत नाही आणि तुमच्या वीर्यामध्ये सशक्त शुक्राणू असतील तर गर्भाधारनेस अडचण येत नाही. यामध्ये जर काही अडचण येत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा काळजी करण्याचे काहीही कारण नाही.
   अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख तसेच वेबसाईटवर चर्चिले गेलेले यासंदर्भातील लेख वाचा.

   http://letstalksexuality.com/male-body/
   http://letstalksexuality.com/question/

 46. thank you sir…
  खूप छान माहिती दिलीत

 47. sir maza ek problem aahe mala sex karatana khup bhiti vatate kay karu…..please

  • सेक्स किंवा संभोग करताना तुम्हाला भीती का वाटते यामागचे कारण शोधले पाहिजे. सेक्सविषयी आपल्या मनात अनेक समज,गैरसमज असतात. आधीच्या सेक्सचा अनुभव चांगला नसेल, इतरांनी सांगितलेले त्यांचे वाईट अनुभव तसेच काही ऐकीव गोष्टी यामुळे देखील मनात भीती असू शकते.पुरेसे शास्त्रीय ज्ञान नसेल तर ‘गर्भधारणा तर होणार नाही ना?’ याची देखील भीती असू शकते.
   तुम्हाला नक्की कशाची भीती वाटते हे शोधून काढा. त्याविषयीची योग्य माहिती मिळावा. वेबसाईटवरील ‘आपली शरीरे’, ‘सेक्स बोले तो’ हा सेक्शन तसेच ‘प्रशोत्तरे’ नक्की वाचा. यामुळे तुमच्या मनातील शंका आणि काही चुकीच्या समजुती असतील तर त्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल.

   शेवटी एकच सांगावेसे वाटते, सेक्स करण्यामध्ये, प्रेम करण्यामध्ये आणि शरीर संबंध ठेवण्यामध्ये पाप किंवा घाण असं काही नाही. आपली जवळीक आपण या क्रियांमधून व्यक्त करत असतो. मात्र ही जवळीक दोन्ही जोडीदारांच्या संमतीने व्हायला हवी. तुम्हाला आणखी काही शंका असेल तर आम्हाला नक्की लिहा. तुमच्या मनातील भीती दूर झाल्यानंतर आम्हाला नक्की कळवा.
   खूप खूप शुभेच्छा…

 48. माझ वय २० आहे मी पोर्न फ्लिम्स पाहतो व आठवड्यातून
  ३ते ४वेळा हस्त मैथून करतो तसेच मी खुप धार्मीक असल्या मुळे मला कधी कधी हस्तमैथूना बद्दल नकारात्मक भाव निर्माण होतो
  हस्त मैथून कडे धार्मीक पद्धती कशा प्रकारे पाहते व हस्त मैथूना बाबत साकारात्मक दृष्टीकोन कसा ठेवावा या बद्दल मार्गदशन करा

  • हस्तमैथून केल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. उलट हस्तमैथून ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथूनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत मिळेल. दुसरीकडे सतत हस्तमैथून करण्याची इच्छा निर्माण होणे हे देखील योग्य नाही. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे तसे जर का होत असेल तर आपले लक्ष दुसऱ्या क्रियाशील कामांमध्ये घालण्याचा प्रयत्न करा.

   हस्तमैथुनाकडे धर्म कसा पाहतो याचा आमचा सविस्तर अभ्यास नाही मात्र लैंगिक इच्छा होणे आणि हस्तमैथुन नैसर्गिक आहे आणि त्याचे दुष्परिणाम होत नाहीत हे मात्र नक्की !

 49. माझे वक्ष खुप ढिले आहेत . त्यमुळे माझे पती नोहमी नाराजी दाखवतात . यावर उपाय सुचवा please…

 50. पाळी जाऊन 16 दिवस झाले तरी देखील माझ्या पत्नीस लघवितुन ब्लड जात अधुन मधून. काही प्रॉब्लम असू शकतो का? आमच्यात अजुन तरी जवळीक झालेली नाही…आणि पोटात सुद्धा दुखत नाही…

 51. 16 divsat pali yeu shakte ka?? Jr adhun madhun blood jaat asel tr kay karave?? Kahi ghabrnyasarkhe tr nahi na?? Plz tell me.

 52. खरुज ऊपाय सुचवा

  • Kz cream ahe 162 r.s la ti vapra khup changli ahe . Jithe jithe infection zalay titha divsat in 2 3 lava mhanje sakali anghol zalyavar ani ratri zopnya adhi

 53. Majhya lingatun 2-3vela virya baher yete yavar upay sanga p Pls lavkar.

 54. Majhya lingatun 2-3vela virya baher yete yavar upay sanga p Pls lavkar

 55. मी माझ्या girlfrind बरोबर sex केला आणि तिच्या पोटात खूप दुखतंय. काय करू आणि ती sex position change करू देत नाही ती सेक्स करते वेळी तिचे पाय जुळून ठेवते तिला पाय स्प्रेड कर म्हणलं तरी ती ऐकत नाही असं करण्या मुळेच तर तिच्या पोटात दुखत नसेल ना आणि खूप पोटात दुखतं. लवकरात लवकर उपाय सांगा मला खूप टेंशन आलं आहे?

 56. **मला पॉर्न मुव्ही पाहणे खुप आवडते , मला पॉर्न मुव्ही पाहील्याने मनाला बर वाटते , कधी कधी मला अस वाटते कि पॉर्न मुव्ही पाहणे हे विकृत बुद्धी चे लक्षण आहे अस काय आहे का ?

  **हस्तमैथून ही करतो आठवड्यातून एकदा किवा महीन्यातून दोन ते तीन वेळा पॉर्न मुव्ही पाहत हस्तमैथून करतो यात काय गैर नाही ना पॉर्न मुव्ही पाहू का नको ? आणि पॉर्न मुव्ही पाहील्याने होणारा बुद्धीवर परिणाम काय होतो??  ?साकारात्मकव  नकारात्मक दोन्ही स्पष्ट सांगा??  वीर्य रस्खला नतर होणारी उदासी कशी घालवायची ?या करिता हस्तमैथून करताना कोनता भाव ठेवावा ज्याने करून वीर्य रस्खला नंतर अपराधी भाव नष्ट होईल ????
  प्लिज सर उत्तर द्यावे**

 57. नमस्कार सर,
  आपण मागच्या वेळेस खूप छान माहिती दिलीत. मला आता गर्भ धरणे विषयी माहिती हवी आहे.

  माझ्या पत्नीची मासिक पाळी पुढे जात असते olivation काळात तिच्या खूप पोटात दुखते. मासिक पालीची तारीख निघून गेल्या नंतर म्हणजेच ५ ते ६ दिवसानी युरीन मार्फत गर्भ चाचणी केली असता सकारात्मक येते परंतु ७ किवा ८ व्या दिवशी मासिक पाळी येते. या सर्व घटनान मुळे माझही पत्नी खूप टेनशन घेत आहे.
  हे कश्यामुळे होत असावे व त्या वर काय निदान करता येईल यावर कृपया मार्गदर्शन करावे.

  please its so urgent sir………

  • तुम्हाला वेबसाईटवरील माहिती उपयोगी पडत आहे, हे ऐकून छान वाटले. तुमच्या पत्नीची युरीन टेस्ट सकारात्मक येते आणि पुन्हा लगेच ७ ते 8 दिवसांनी मासिक पाळी येते याचे कारण शोधण्यासाठी कृपया योग्य त्या स्त्री-रोग तज्ञांचा सल्ला घ्या.

 58. is there any side effect due to hastmaithun on increasing hight ….

  • This is false information or a myth spread to prevent people from masturbating. There is no any relation between masterbation and increasing height Touching our own body to feel sexual pleasure is known as masturbation. Masturbation includes touching, stroking and rubbing one’s own genitals. These are natural acts. Girls and boys as well as men and women perform this activity. As long as we are not hurting ourselves or letting it interfere with everyday work, there is no harm in masturbation.

 59. MANATALE BHARPUR QUESTIONS DUR JHALE THANK YOU……..

 60. प्रेग्नेंट करण्यासाठी……कोणत्या कालावदी सेक्स केल पाहिजे

 61. मला सेक्स करताना खूप समस्या होतात तिची योनी लवकर ओली होत नाही आणि ती जेंव्हा ओली होते तेव्हा माझे वीर्यपतं होते कृपया मला मदत करा

  • स्त्रीला उत्तेजित व्हायला पुरुषांपेक्षा जास्त वेळ लागतो. या तफावतीमुळे दोघांना जवळपास एकाच वेळी परमोच्च लैंगिक सुखाचा बिंदू अनुभवणं अवघड होतं. लैंगिक सुखाचा आनंद दोघानांही कसा घेता येईल यावर विचार व्हायला हवा.
   तुम्ही ज्या जोडीदारासोबत समागम(संभोग/सेक्स) करता त्याच्याबद्दल आदर असणं महत्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही समोरील जोडीदाराला केवळ संभोग(सेक्स) करण्याची वस्तू समजता त्यावेळी लैंगिक सुख कितपत मिळेल यावर शंका आहे. जोडीदाराच्या कलेने, त्याला कोणत्या गोष्टींमधून/कृतींमधून आनंद मिळतो हे पाहणं लैंगिक उत्तेजनेसाठी महत्वाचं असतं. लैंगिक संबंधांमध्ये, हस्तमैथुन करताना किंवा कुठल्याही प्रकारे लैंगिक उत्तेजना मिळाल्यावर एक क्षण असा येतो जेव्हा लैंगिक सुखाचा परमोच्च बिंदू गाठला जातो. हा सुखाचा बिंदू गाठल्यावर शरीराला, मनाला एकदम हलकं, शांत वाटू लागतं. यालाच इंग्रजीमध्ये ऑरगॅझम असं म्हणतात. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही ऑरगॅझमचा अनुभव येतो. स्त्री-पुरुषांच्या ऑरगॅझम बद्दल अधिक माहिती पुढे दिली आहे.
   पुरुषांमधील ऑरगॅझम
   लैंगिक उत्तेजना मिळाल्यावर पुरुषाचं लिंग ताठर होऊ लागतं. हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक प्रकारचा ताण निर्माण होतो. पण हा ताण हवाहवासा वाटत असतो. लिंग ताठर झाल्यानंतर काही काळाने हा ताण अगदी टोकाला पोचतो आणि त्याच क्षणी लिंगातून वीर्य बाहेर येतं. याला वीर्यपात म्हणतात. किंवा इंग्रजीमध्ये याला इजॅक्युलेशन म्हणतात. ऑरगॅझमनंतर लिंग परत शिथिल होतं आणि शरीराला मोकळं, हलकं वाटू लागतं. पुरुषांचा ऑरगॅझम वीर्य बाहेर येण्याशी निगडित आहे.
   स्त्रियांमधील ऑरगॅझम
   स्त्रियांना अशा प्रकारची संवेदना किंवा जाणीव असते हेच अनेक स्त्री पुरुषांना माहित नसतं. त्यामुळे अनेक स्त्रियांना ऑरगॅझमचा अनुभवच आलेला नसतो. स्त्रियांच्या योनिमध्ये क्लिटोरिस नावाचा एक पूर्णपणे लैंगिक अवयव असतो. क्लिटोरिस अतिशय संवेदनशील अशा स्नायूंनी बनलेला असतो. त्याचं टोक मूत्रद्वाराच्या किंवा लघवीच्या जागेच्या वरच्या बाजूला असतं पण त्याची आतली रचना संपूर्ण योनिमध्ये असते. क्लिटोरिसला स्पर्श झाला, ते घासलं गेलं की ते उत्तेजित होऊन थोडं ताठर होतं. हळूहळू त्यातील संवेदना वाढतात. स्त्रीच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि लैंगिक सुखाचा बिंदू गाठला की योनि व योनिमार्गातील, गुदद्वाराचे स्नायू प्रसरण आकुंचन पावतात आणि स्त्रीला लैंगिक सुखाचा अनुभव येतो. अनेकदा स्तनाग्रं किंवा शरीरातील इतर अवयवांना कुरवाळल्याने किंवा स्पर्श केल्यानेही ऑरगॅझम यायला मदत होते.
   स्त्री आणि पुरुष जर संबंध करताना एकताल झाले असतील, एकमेकांच्या कलाने संबंध करत असतील तर दोघांनाही एकाच वेळी ऑरगॅझमचा अनुभव येतो. मात्र दर वेळी असं होईलच असं नाही. मात्र लैंगिक संबंधांमध्ये दोघांनाही हे सुख अनुभवण्याचा अधिकार आहे.

 62. सर संभोग करताना लिंग नेमके योनी मध्ये कोठे टाकावे आणि स्त्रियांची लघविचि जागा कोठे असते ,लगविच्या जागेत लिंग जाते का ? लिंग बरोबर गेले हे कसे समजावे

 63. पोस्ट सेंड होत नाही सर कारण काय?

 64. मुलाचे खरे आई वडील कसे ओळखावे म्हणजे खरा बाप कोण हे कसे समजते

  • तांत्रिकदृष्ट्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास, मुलगा किंवा मुलगी यांचा आणि वडिलांचा DNA किती प्रमाणात जुळतो यावरून मुलाचे वडील कोण हे ओळखता येते.

 65. me ani maza bf ami kiss kel january chya start week mdhe…ani amchyat purn pne sex jhal naia..fkt ling touch jhal mazya vagina la…purn pne aat nahi gel…yala 1 month jhala ahe ani tyanantr mla problem nahi ala..tyamule mnat shnka nirman jhali ahe ki me pregent tr nsel na..plz mmargdarshan krawe.

  • काळजी करु नकोस. फक्त किस केल्यामुळं गर्भधारणा होत नाही. जर पुरुषांच्या लिंगामधून झालेलं वीर्यपतन योनीमध्ये गेलं तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. केवळ योनीला लिंगाचा स्पर्श झाल्याने गर्भधारणा होत नाही. तुझी मासिक पाळीची वेळेवर आली तर काळजी करण्य़ाचं कारण नाही.
   अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/conception/

 66. हस्तमैथुन केल्यास आपल्या चेहरा वर फुटकळ्या येऊ शकते काय येत असतील तर ऊपाय सांगा माझे वय 18

  • हस्तमैथुन ही एक आनंददायी स्वाभाविक म्हणजेच नॉर्मल क्रिया आहे. हस्तमैथुनामुळे चेहऱ्यावर फुटकळ्या किंवा पिंपल्स येतात हा गैरसमज आहे. पिंपल्स किंवा ज्याला मुरुमं म्हणतात ते त्वचेशी संंबंधित असतात. शरीरात जे वेगवेगळे हार्मोन्स, किंवा संप्रेरक तयार होतात त्यामुळे पिंपल्स येतात. चेहरा साध्या पाण्याने नियमित धुवा. तेलकट खाणं कमी करा. चेहऱ्याला कोणतेही क्रीम किंवा इतर प्रसाधनं लावू नका. काही काळाने पिंपल्सची समस्या जाऊ शकेल. खूप प्रमाणातवर पिंपल्स येत असतील तर काही वेळा वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. चिंता करत राहू नका. यात घाबरण्यासारखं काही नाही.

   हस्तमैथुन करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिरेक निरोगी नसतो. सतत हस्तमैथुन करण्याची इच्छा निर्माण होणे देखील योग्य नाही हेही आपण हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे तसे जर का होत असेल तर आपले लक्ष दुसऱ्या क्रियाशील कामांमध्ये घालण्याचा प्रयत्न करा.

 67. Sir, doghanchya sahamatine nehmi sex hot asel tar stri chi tabyet sudharte ( jar adhich partner barik asel tar ) ha gairsamaj ahe ka , me mitrankadun nehmi aikto nehmi sex kelyavar stri chi tabyet sudharte he kharach ahe ka …..

 68. Thnkx for the information……mla ajun eka vidhya bddl mahiti pahije hoti…te mhnje pali late jhalia mg ata tila lwkr ks anta yeil yasathi kay kraw lagel..dr bolle stress mule ht as..bt tri hi…problem n aslyane tension yet n ata exams ahet so problem lwkr ala tr exams la trass ny honar

 69. Thnx sir….mla ajun ek vicharayche ht.ki pali late jhalia ata tr tila lwkr kshi anya yeil…kay option ahe ka yasathi..

 70. 42 वर्षाची स्ञी बाळाला जन्म देऊ शकते का?

  • सर्वसामान्यपणे १८ ते ३० हे वय गर्भधारणेसाठी सुरक्षित मानले जाते. १८ च्या आतील आणि ३० नंतर झालेल्या गरोदरपणात काही धोके उद्भवण्याची शक्यता असते. वयाच्या 45-50 च्या आसपास कधी कधी त्याहीनंतर स्त्रीचं पाळीचक्र थांबतं. याचं साधं कारण म्हणजे बीजकोषात बीजं तयार होणं थांबतं.वाढत्या वयानुसार, विशेषतः वयाच्या, पस्तीशी, चाळीशीनंतर स्त्रीबीजांची संख्या घटते. संख्येबरोबर स्त्रीबीजांची गुणवत्ता व फलनक्षमता कमी होते. गर्भधारणा झाली तर गर्भपातांचे प्रमाण व बाळात व्यंग असण्याचे प्रमाण वाढते. हे सर्व नैसर्गिक आहे. तंत्रज्ञानाामध्ये झालेल्या विकासाचा उपयोग करून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिमरीत्या गर्भधारणा होऊ शकते मात्र हे गर्भारपण ‘हाय रिस्क’ असते. गर्भपात, रक्तदाब वाढणे, साखर वाढणे, सीझरची शक्यता जास्त संभवते. याविषयीची अधिक माहिती तुम्हाला स्त्रीरोग तज्ञ देऊ शकतील. तुमच्या माहितीसाठी चाळीशीनंतर येणाऱ्या ‘मेनोपॉज’ विषयीचे लेख देत आहे ते नक्की वाचा.

   http://letstalksexuality.com/menopause/
   http://letstalksexuality.com/menopause-and-sexual-life/

 71. सर योनी च्या खाली लिंग घालुन संभोग केला तर प्रेग्नसि राहू शकते का?

  • संभोग करताना योनीमध्ये वीर्य गेले आणि हे संबंध पाळीचक्रामधील गर्भधारणेसाठी पूरक असलेल्या काळात आले असतील तर गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
   http://letstalksexuality.com/conception/
   http://letstalksexuality.com/contraception/
   शिवाय वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्नोत्तरे चर्चिली आहेत ती नक्की वाचा.
   http://letstalksexuality.com/question/

 72. divasatun kiti vela sex karava

  • सेक्स किती वेळा करावा याचा काही मापदंड किंवा शास्त्रीय प्रमाण नाही. सेक्स ही अशी गोष्ट आहे जी करणाऱ्यांनी ठरवायची असते. किती वेळा, कुणासोबत, केव्हा, कुठे आणि का हे ‘क’कार सेक्सबाबत मिळून ठरवायचे असतात. जर कसलंही दडपण नसेल, त्रास होत नसेल, सुख मिळत असेल, मज्जा येत असेल, एकमेकांची ओढ वाटत असेल तर चिंता करू नका. मात्र एकत्र येणं म्हणजे फक्त सेक्स करणं असं मात्र समजू नका. कधी कधी नुसती सोबतही तितकीच सुखद, आनंददायी असू शकते.
   शेवटी एवढंच… मनाचा आवाज ऐका. पण एकट्याच्या नाही…दोघांच्या.

   याबाबत अनेक प्रश्न वेबसाईट वर चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली दोन प्रश्नोत्तरांची लिंक देत आहे.
   http://letstalksexuality.com/question/amchya-doghanche-age-25-years-ahe-amhi-mahinyatun-ekda-sex-karto-24-hrs-chya-vele-madhe-7-8-vela-sex-hoto-te-yogya-ahe-ka-kiti-vela-karava/#comment-6929
   http://letstalksexuality.com/question/mahinyatun-navra-baykone-kiti-vela-sex-karava/

   • स्री ला गुद्द द्वारामधे केल्याने गर्भ राहतो का

    • नाही. गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीच्य वीर्य योनीमार्गातून गर्भाशयात जाणं आवश्यक आहे. तेही मासिक पाळी चक्राच्या गर्भधारणेस पूरक असणाऱ्या काळात. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील ’गर्भधारणा कशी होते’ हा लेख वाचा.
     http://letstalksexuality.com/conception/.
     आपल्या वेबसाईटवर यासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
     ‘FAQ – शंका समाधान’: http://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
     प्रश्नोत्तरे :- http://letstalksexuality.com/question/

 73. सुनील खरबावकर

  माझे सेक्स करतांना लिंगात योग्य प्रमाणात ताठरता येत नाही , असे कशामुळे होत असेल ,गर्मी मुले असे होते का ?

  • पहिलं आपण हे समजून घेऊया की, पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू अशा वेळी रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टेरॉन या विशिष्ट सम्प्रेरकाचे प्रमाण ही कमी होत जाते ज्यामुळे लैंगिक उत्तेजनही कमी होत जाते आणि हे नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणताणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिछा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. लिंग शिथिलतेचा प्रश्न हा अनेक पुरुषांना भेडसावत असतो. जर यामुळे लैंगिक सुख अनुभवण्यास त्रास होत असेल तर त्याला आपण समस्या म्हणू शकतो यामुळे दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही असा त्रास होऊ शकतो होऊ शकतो. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. यासाठी सेक्सची सवय झाली की हळू हळू यावर ताबा येतो. रिलॅक्सेशन पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. सेक्स आणि संभोगाबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

   अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करून लेख वाचा.
   http://letstalksexuality.com/premature-ejaculation/
   तसेच या लिंक वरील लेखामध्ये लेखात शीघ्र वीर्यपतनावर एका तार्किक उपायाचा विचार केला गेला आहे, हा लेख नक्की वाचा.
   http://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/
   या उपायाचा फायदा होत नसेल तर योग्य त्या डॉक्टरांची अवश्य मदत घ्या.

   शिवाय वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्नोत्तरे चर्चिली आहेत ती नक्की वाचा.
   http://letstalksexuality.com/question/

 74. सर माझी गर्लफ्रेंड चे लग्ने झाले आहे आणि तिच्यात व तिच्या नावऱ्यामध्ये एकदा सेक्स झाला आहे.तिची अशी इचछा आहेकी तिला माझ्यापासून मूल व्हावे.जर आम्ही सेक्स केला तर काही धोका येऊ शकतो का म्हणजे एड्स ?

  • तुमच्या “मी ‘एक्स’ व्यक्तीशी संबंध ठेवला तर आजार होईल का ?” या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास…तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत सेक्स करायचा आहे त्या व्यक्तीला जर लैंगिक संबंधांतून पसरणारा आजार असेल तर तुम्हालाही आजार होऊ शकतो. लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजाराविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. http://letstalksexuality.com/category/sexual-health/.

   तुमचा प्रश्न “मी ‘एक्स’ व्यक्तीशी संबंध ठेवला तर आजार होईल का ?” एवढ्यापुरता मर्यादित नसून त्याला अनेक भावनिक आणि सामाजिक पैलू आहेत त्याचा तुम्ही विचार करावा असे वाटते.
   १.उघड आहे तुमचे हे संबंध तुम्ही जगासमोर स्वीकारण्याच्या स्थितीत नसणार आहात. ते लपवावे लागतील. कारण आपल्या समाजात ते स्वीकारले जाण्याची शक्यता नाही. असे संबध जर उघडकीस आले तर त्यातून तयार होणाऱ्या अडचणींना/ गुंतागुंतीला सामोरं जाण्याची तुमची तयारी आहे का? त्यावेळी दोघांची एकमेकांना साथ असेल का? निर्णय काहीही घ्या पण त्याच्या परिणामांची जाणीव ठेवा आणि जबाबदारीही घ्या. त्यापासून पळून जाऊ नका किंवा माझा काही संबंध नाही असं नंतर म्हणू नका. कारण बहुतेक वेळेस पुरुषासाठी हे सोपं असू शकतं, बाईसाठी नाही…
   २. या लैंगिक संबंधांमुळे तुमच्या मैत्रिणीच्या वैवाहिक नात्यामध्ये गुंतागुंत वाढू शकते.
   ३. दुसऱ्याच्या बायकोसोबत लैंगिक संबध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे.

   • माझा लिंग वाकडा आहे…..तर मी काय करू

    • लिंगातील वाकडेपणा हा बऱ्याच पुरुषांना सतावणारा प्रश्न असतो परंतु नैसर्गिकरित्या सर्वच पुरुषांच्या लिंगाला थोड्या फार प्रमाणात बाक असतो. फार थोड्या पुरुषाचं लिंग अगदी सरळ असतं. या बाकामुळे संबंधांच्या वेळी काही अडचण येत नाही. परंतु संभोग करताना जर का वेदना होत असतील तर डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरेल. क्वचित केसेस मध्ये लिंगाचा वाकडेपणा खूप जास्त वाढलेला दिसतो व त्यामुळे लिंगाला योनीत किंवा गुदद्वारात प्रवेश करताना अडचण येते. शस्त्रक्रिया करून किंवा मेडिकल उपकरणांचा वापर करून लिंगाचा बाक कमी करता येऊ शकतो.
     फार काही त्रास होत नसेल तर काळजी करू नका. व्यक्ती तितक्या प्रकृती.
     आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकवरील लेख आणि ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
     पुरुषाचं शरीर :- http://letstalksexuality.com/male-body/
     प्रश्नोत्तरे :- http://letstalksexuality.com/question/

 75. me mazya mami sobat sex kela. ani protection use nahi kela tar ti pregnant hou shakte ka?
  tine family planning che operation pan kele ahe. plz reply me

  • कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन झाले असल्यास गरोदर राहण्याची शक्यता नाही. मात्र अशा प्रकारच्या लैंगिक संबंधांमध्ये इतर मानसिक आणि भावनिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यांची जबाबदारी घेऊनच अशे लैंगिक संबध ठेवावेत. आपल्या वेबसाईटवर जवळच्या नात्यामधील लैंगिक संबंध याविषयीचे अनेक प्रश्न ‘प्रश्नोत्तरे’ या सेक्शनमध्ये चर्चिले आहेत ते नक्की वाचा. http://letstalksexuality.com/question/

 76. Mansik aajaramule virya jau shakte ka

  • होय. काही मानसिक व शारीरिक आजारांमुळे व काही औषधांमुळे वीर्यपतन आणि एकूणच लैंगिक अनुभवावर प्रभाव पडू शकतो. बऱ्याचदा पेशंट अशा गोष्टी डॉक्टरजवळ कशा बोलायच्या म्हणून डॉक्टरांशी बोलत नाहीत आणि अनेक वेळा डॉक्टरही, औषधांच्या लैंगिक दुष्परिणामांची कल्पना देत नाहीत. एखादं औषध किंवा एखादा आजार आपल्याला लैंगिक दुष्परिणाम दाखवत असेल तर डॉक्टरांकडे याबद्दल मोकळेपणाने बोलायला शिकले पाहिजे. लाजायचं आजीबात कारण नाही.
   बिंदुमाधव खिरे यांच्या ‘मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख’ या पुस्तकातील ‘आजार आणि औषधं’ या प्रकरणामध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. सदर पुस्तक रसिक साहित्य, साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे यासाठी विक्रीसाठी उपलब्ध आहे.

 77. Gelya mahinyat pali 13 tarkhela aali aani ya mahinyat pali 14 tarkhela aali,pali dar mahinyala velevar yete,tar mi ata kevha sex karu mhanje garbhdharna hoil,fix date sanga,

  • अशी फिक्स डेट सांगता येत नाही. काहीजण असं म्हणतात की, पाळी सुरु झाल्यापासून बरोबर १४ व्या दिवशी अंडोत्सर्जन (Ovulation) होते पण हे पूर्णतः बरोबर नाही. अन्डोत्सर्जन अगदी ८ व्या दिवशी देखील होऊ शकते आणि अगदी १६ व्या दिवशी देखील. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
   http://letstalksexuality.com/conception/

   • सर मुलींचे ओटी पोट का पुढे येते?

    • गर्भधारणा झाल्यास किंवा ओटीपोटाच्या आसपास चरबी जमा झाल्यास देखील पोट पुढे येऊ शकते.

 78. Girls che oti pot pude ale asen v tiche age 18 asen tar kay karan asen

  • गर्भधारणा झाल्यास किंवा ओटीपोटाच्या आसपास चरबी जमा झाल्यास देखील पोट पुढे येऊ शकते.

 79. मुलींचे ओटी पोट पुढे येते
  कारण ज्या मुलीने सेक्स केलेला असत तिच ओटीपोट ( पोट आणि लिंग यामधली जागा ) जास्त पुढे आलेलं असतं…सेक्स करताना त्यांच्या लिंगाच्या जागेवर दणके बसतात..
  व तो भाग बाहेर येतो….
  Physical Relation नंतर मुलीच्या शरीरात कोणकोणते बदल होतात?
  डाॅक्टर असे उत्तर देईल..
  १. ओटीपोट दिसणे
  २. शरीराला थोडेसे जाडपण येणे.
  ३. छाती लटकणे.
  ४. चेहरा टवटवीत दिसणे.

  हे सर्व बदल…मुलाचे पाणी (Spurms-शुक्राणु) मुलीच्या शरीरात ठोकताना पाडल जात- टाकल जात… त्यानंतर दिसुन येतात
  मला असी माहिती मिळाली होती तर यावर तुमचे के मत आहे

 80. sir…maz nuktach lagna zalay …..ling atmaadhye(yonit) jaat naahi mee kay karav ….please sanga

 81. Plz reply dya

 82. मुलींचे ओटी पोट पुढे येते
  कारण ज्या मुलीने सेक्स केलेला असत तिच ओटीपोट ( पोट आणि लिंग यामधली जागा ) जास्त पुढे आलेलं असतं…सेक्स करताना त्यांच्या लिंगाच्या जागेवर दणके बसतात..
  व तो भाग बाहेर येतो….
  Physical Relation नंतर मुलीच्या शरीरात कोणकोणते बदल होतात?
  डाॅक्टर असे उत्तर देईल..
  १. ओटीपोट दिसणे
  २. शरीराला थोडेसे जाडपण येणे.
  ३. छाती लटकणे.
  ४. चेहरा टवटवीत दिसणे.

  हे सर्व बदल…मुलाचे पाणी (Spurms-शुक्राणु) मुलीच्या शरीरात ठोकताना पाडल जात- टाकल जात… त्यानंतर दिसुन येतात
  मला असी माहिती मिळाली होती तर यावर तुमचे काय मत आहे
  Plz reply dya

  • हे बदल सर्वच स्त्रियांमध्ये दिसतात असे नाही. स्त्रिसाठी सेक्स आनंददायी असेल तर तिचा समाधानाने चेहरा टवटवीत दिसेलही कदाचित. किंवा ती मानसिक दृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या समाधानी असेल तर तब्येत वाढूही शकते. एखादी स्त्री लैंगिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या समाधानी असेल पण नियमित व्यायाम करत असेल तर कदाचित तिचे ओटीपोट दिसणार नाही. एखाद्या स्त्रीच्या शरीरात लैंगिक संबंधामुळे शुक्राणू जात असतील मात्र ती लैंगिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या समाधानी नसेल किंवा तिच्यासोबत इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवले जात असतील तर तिचा चेहरा टवटवीत दिसेल का ? किंवा तब्येत तरी सुधारेल का ?

   थोडक्यात काय, तर स्त्रीच्या शरीरात शुक्राणू गेले किंवा लैंगिक संबंध आला म्हणजे तुम्ही नमूद केलेली लक्षणे सरसकट दिसतीलच असा अंदाज बांधता येणार नाही. तुम्ही नमूद केलेले बदल होण्यासाठी सेक्स काही अंशी कारणीभूत असेलही पण इतर गोष्टी कारणीभूत आहे हे मात्र नक्की.

 83. हस्तमैथून केल्याने शिश्न मोठे होते का

  • नाही. हस्तमैथुन केल्याने शिश्न मोठे होत नाही. आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
   ‘FAQ – शंका समाधान’: http://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
   प्रश्नोत्तरे :- http://letstalksexuality.com/question/

 84. मंगेश

  Kay jale ahe ka reply nahi tumacha

  • माफ करा. सध्या आम्ही ऑफिस बदलले असल्याने, ऑफिस शिफ्टिंग मध्ये बिझी आहोत त्यामुळे उत्तरं द्यायला वेळ लागत आहे. एका आठवड्याच्या आत तुम्हाला नियमितपणे उत्तरं मिळायला सुरुवात होईल.

 85. मुलींचे ओटी पोट पुढे येते
  कारण ज्या मुलीने सेक्स केलेला असत तिच ओटीपोट ( पोट आणि लिंग यामधली जागा ) जास्त पुढे आलेलं असतं…सेक्स करताना त्यांच्या लिंगाच्या जागेवर दणके बसतात..
  व तो भाग बाहेर येतो….
  Physical Relation नंतर मुलीच्या शरीरात कोणकोणते बदल होतात?
  डाॅक्टर असे उत्तर देईल..
  १. ओटीपोट दिसणे
  २. शरीराला थोडेसे जाडपण येणे.
  ३. छाती लटकणे.
  ४. चेहरा टवटवीत दिसणे.

  हे सर्व बदल…मुलाचे पाणी (Spurms-शुक्राणु) मुलीच्या शरीरात ठोकताना पाडल जात- टाकल जात… त्यानंतर दिसुन येतात
  मला असी माहिती मिळाली होती तर यावर तुमचे काय मत आहे..

  • हे बदल सर्वच स्त्रियांमध्ये दिसतात असे नाही. स्त्रिसाठी सेक्स आनंददायी असेल तर तिचा समाधानाने चेहरा टवटवीत दिसेलही कदाचित. किंवा ती मानसिक दृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या समाधानी असेल तर तब्येत वाढूही शकते. एखादी स्त्री लैंगिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या समाधानी असेल पण नियमित व्यायाम करत असेल तर कदाचित तिचे ओटीपोट दिसणार नाही. एखाद्या स्त्रीच्या शरीरात लैंगिक संबंधामुळे शुक्राणू जात असतील मात्र ती लैंगिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या समाधानी नसेल किंवा तिच्यासोबत इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवले जात असतील तर तिचा चेहरा टवटवीत दिसेल का ? किंवा तब्येत तरी सुधारेल का ?

   थोडक्यात काय, तर स्त्रीच्या शरीरात शुक्राणू गेले किंवा लैंगिक संबंध आला म्हणजे तुम्ही नमूद केलेली लक्षणे सरसकट दिसतीलच असा अंदाज बांधता येणार नाही. तुम्ही नमूद केलेले बदल होण्यासाठी सेक्स काही अंशी कारणीभूत असेलही पण इतर गोष्टी कारणीभूत आहे हे मात्र नक्की.

 86. nasbandi nantar mul have aslyas kay karave lagel. mul hoil ka ?

  • नसबंदीच्या शस्त्रक्रियेत शुक्रवाहिनीचा/बीजवाहक नलिकेचा काही भाग कापला जातो. नसबंदी नंतर मूल हवे असल्यास बंद नस पुन्हा जोडण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. ती यशस्वी झाली तर पुन्हा मूल होऊ शकते.
   शुक्रवाहिनी/ बिज्बाहक नलिका आणि इतर लैंगिक अवयवांविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
   http://letstalksexuality.com/male-body/

 87. सर मी प्रेयसी बरोबर सेक्स केला.पण मला माझे ईंद्रीय एकदम सहज आत गेले. थोडा पण त्रास नाही झाला. तिची योनी एकदम ओली होती.माझे ईंद्रीय ताठच होते पण सेक्स करताना खुप काही आनंद वाटला नाही. तिची योनी खुप ढिली आहे. म्हणजे तीने आधी खुप मुलांबरोबर संबंध ठेवल्याने अस होईल का.

  • एखद्या व्यक्तीने आधी कोणासोबत लैंगिक संबंध ठेवले आहेत की नाहीत हे ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. तुमच्या प्रश्नामधील काही मुद्द्यांविषयी बोलूयात.
   १. स्त्रीच्या योनीमार्गात हायमेन नावाचा लवचिक पडदा असतो. तो फाटला असेल तर ती मुलगी कुमारी किंवा व्हर्जिन नाही असा चुकीचा समज आहे. हा पडदा सेक्सशिवाय इतरही शारीरिक हालचाली – जसं पोहणं, सायकल चालवणं, खेळ यामुळे फाटू शकतो. त्यामुळे हायमेन फाटणे म्हणजे सेक्स हे गृहितकच चुकीचं आहे.
   वर्जिनिटी ही फार मजेशीर कल्पना आहे. आपले नाते आणि लैंगिक संबंध हे आपल्या इच्छसाठी, प्रेमासाठी आणि नात्याचा भाग म्हणून केले जातात. त्यामध्ये जोडीदाराच्या वर्जिनिटीने काही फरक पडेल असं नाही. आणि जर आधीच्या आयुष्यात लैंगिक संबंध आले का नाही हे माहित करून घ्यायचं असेल, त्याने तुमच्या नात्यावर परिणाम होणार असेल तर बोलणे, संवाद साधणे हा एकमेव मार्ग आहे. अधिक माहितीसाठी खलील लिंक वरील लेख वाचा.
   http://letstalksexuality.com/virginity/

   २. योनीमध्ये सैलपणा असू शकतो यामुळे खरंतर गर्भधारणा आणि लैंगिक सुख यामध्ये काहीही अडचण येत नाही. योनीमार्ग, मूत्रद्वार आणि गुदद्वार या तीनही मार्गांच्या आजूबाजूच्या स्नायूंमध्ये घट्टपणा आणण्यासाठी, सैलपणा कमी करण्यासाठी डॉ. केगल यांनी सुचवलेला व्यायाम केला जातो. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी http://letstalksexuality.com/question/kegel-exercise/ या लिंकवरील माहिती वाचा. लिंग- योनी मैथुन करताना जास्त घर्षण झाले तरच लैंगिक सुख मिळते आणि हाच फक्त लैंगिक सुख मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे असा गैरसमज आपल्या समाजात आढळतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी संवाद वाढवून लैंगिक समाधान मिळवण्याच्या नवनवीन पद्धती शोधू शकता. तुम्हाला आणि जोडीदाराला नक्की कशातून आनंद मिळतो याविषयी मनमोकळा संवाद तुम्हाला फायदेशीर ठरेल.

   ३. नात्याच्या सुरुवातीलाच संशय आणि अविश्वास याचा नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.