जननेंद्रियांवरील चामखीळ किंवा मस : जनायटल वार्टस

0 809

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) मुळे होणारा हा आजार आहे. पॅपिलोमा विषाणूची लागण झालेल्या बहुतेक व्यक्तींना त्याची कल्पना नसते कारण त्यांना काही लक्षणं जाणवतीलच असं नाही. मात्र लक्षणं नसली तरीही लागण झालेल्या व्यक्तीकडून दुसऱ्याला एचपीव्हीची लागण होऊ शकते.

लक्षणं

  • जननसंस्थेच्या त्वचेवर चामखिळीसारखे, फुलकोबीसारखे दिसणारे मस
  • मस लालसर, मऊ, लांबट असतात. बटाटयावर येणा-या कोंबासारखेच पण लालसर रंगाचे हे मस लगेच ओळखू येतात. कधी कधी हे मस त्वचेच्या रंगाचेही असू शकतात.
  • पुरुषांना हे मस शिश्नावर कोठेही येतात. जर समलिंगी संबंध असल्यास हे मस गुदद्वाराच्या सभोवताली येतात.
  • स्त्रियांच्या बाबतीत हे योनीद्वारावर व आतपण असतात. दिसत नसले तरी संबंधांच्या वेळी त्रास होऊ शकतो.
  • उपचार न केल्यास हे मस खूप भराभर वाढतात.

निदान कसं करायचं?

यासाठी रक्ततपासणीही उपलब्ध आहे.

उपचार

हे मस उपचाराशिवाय आपोआप जिरत नाहीत. पोडोफायलिन मलम यासाठी दर आठवडयात 1-2 वेळा लावल्यास हे कोंब हळूहळू जिरून जातात. गरोदरपणात हे मलम वापरू नये कारण त्यामुळे गर्भावर दुष्परिणाम होऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.