अविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड

आंतरजातीय विवाह केल्यास दोन लाखांचा दंड

0 892

तत्कालिक पंतप्रधानांच्या गुजरात राज्यातील ठाकोर समुदायाचा  एक विचित्र निर्णय समोर आला आहे. दांतीवाडामध्ये अविवाहित मुलींच्या मोबाइल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जर अविवाहित मुलीने मोबाइल वापरला तर वडिलांना दीड लाखांचा दंड भरावा लागणार आहे. एकीकडे जगभरात स्त्री-पुरूष समानतेच्या गोष्टी बोलल्या जात आहे. काही क्षेत्रात तर मुलींनी मुलांनाही मागे टाकले आहे. मात्र, गुजरातमधील ठाकोर समुदायाची विचित्र गोष्ट समोर आली आहे.

गुजरातमधील दांतीवाडामधील ठाकोर समुदायाने हा नवीन नियम केला आहे. ज्यामध्ये अविवाहित मुलीच्या मोबाइल वापरावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. तसेच आंतरजातीय विवाहावरही बंदी घालण्यात आली आहे. जर ठाकोर समुदायातील मुलीने इतर जातीच्या मुलासोबत लग्न केल्यास दीड लाखांचा दंड द्यावा लागणार आहे. ठाकोर जातीमधील मुलाने इतर जातीच्या मुलीसोबत लग्न केल्यास दोन लाखांच्या दंडाचा नियम करण्यात आला आहे.

१४ जुलै रविवारी जगोल गावात झालेल्या ठाकोर समुदायाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला ठाकोर समुदायातील ८०० नेत्यांचा सहभाग होता. या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाला ठाकोर समाजातील लोक संविधानाप्रमाणे मानतात. त्यानुसार, अविवाहित मुलीने मोबाइल वापरण्याचा गुन्हा केल्यास दंड म्हणून वडिलांना दीड लाख रूपये द्यावे लागणार आहेत.

बातमी वाचल्यावर तुमच्या मनात नक्की काय विचार चालू आहेत?  ठाकोर समुदायाने

घेतलेले निर्णय तुम्हाला पटतायेत का? 

बातमीचा स्त्रोत : लोकसत्ता ऑनलाइन

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.