हद्दपार…अचंबित…

- संध्या नरे-पवार

0 1,079

आपल्या वेबसाईटच्या तरुण वाचकांसाठी संध्या नरे-पवार यांची बाई आणि पुरुषांच्या लैंगिकतेबद्दल, अनुभवांबद्दल काही मूलगामी  सांगू पाहणारी ही कविता, जी पुरुषस्पंदनच्या २०११ दिवाळी अंकात छापून आली होती, ती येथे देत आहोत.

 

पुरुष तुंबतो

म्हणून वाहतो सुसाट

पुन्हा तुंबण्यासाठी

वाहवत जाण्यासाठी

 

बाई तुंबत नाही

वाहत नाही

पाझरत राहाते

ओली ओली होत

झिरपत राहे  निरंतर

 

तिला तुंबणं माहीत नाही

म्हणून मोकळं होण्यातली

मर्दानगी कळत नाही

मोकळं झाल्यावर पुन्हा

तुंबण्यातली असोशी

तिच्या जगाला अनोळखी, हद्दपार...

 

त्याला पाझरणं माहीत नाही

म्हणून ओलाव्यात स्वत: ला

रुजवून घेत

आतल्या आत फुटणा-या कोंबासह

स्वत: ला बांधून घेत

मुळात मुळं रुजवत

जमीनभर पसरणारं बाईपण

त्याच्या समजूतीपल्याड, अचंबित…

 

कविता आवडली तर कवितेबद्दलचे आपले मत खाली कमेंट्स मध्ये आवर्जून नोंदवा.

प्रकाशक – Men Against Violence and Abuse (MAVA)

दिवाळी अंक – http://www.mavaindia.org/Purushspandana-2011.pdf

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.