वेबसाईटला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने…

2 151

अभिनंदन !!! चिअर्स !!! कॉंग्रॅच्युलेशन्स !!! आपल्या वेबसाईटला  एक वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल वेबसाईटच्या निर्मितीसाठी आणि वेबसाईट यशस्वी होण्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे विशेषतः तुम्हा वाचकांचे मनापासून आभार आणि अभिनंदन !

लैंगिकतेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन रुजवण्यासाठी त्याविषयी मनमोकळेपणाने बोलणे ही पहिली पायरी आहे. पण लैंगिकता म्हणजे फक्त सेक्स किंवा लैंगिक संबंध नाही. लैंगिकता त्याहून खूप जास्त आहे. स्वतःच्या आवडी निवडी, इच्छा विचार, बंधनं अशा सगळ्या गोष्टी लैंगिकतेशी संबंधित असतात. काही जणांसाठी लैंगिक कल म्हणजे लैंगिकता असेल तर काही जणांना मनाप्रमाणे राहणं, कपडे घालणं, व्यक्त होणं म्हणजे लैंगिकता असू शकेल. लैंगिकतेबद्दल बोलणं म्हणजे आपल्या मनातील शंका, विचार, भीती, उत्सुकता व्यक्त करणं. त्यासाठी मनमोकळ्या संवादाची, विश्वासाची एक जागा (स्पेस) हवी असते. मागच्याच वर्षी तथापि संस्थेनं  letstalksexuality.com  ही वेबसाईट खुली करून अशीच एक स्पेस निर्माण केली. याच महिन्यात वेबसाईटला एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने वेबसाईट विषयी थोडेसे.

लैंगिकता, आपली शरीरे, सगळं नॉर्मल आहे, प्रेम/ फ्रेम, लिंगभावाची व्यवस्था, मेरी मर्जी, हिंसा आणि छळ या वेगवेगळ्या सेक्शन्समधून लैंगिकतेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन आणि लैंगिकतेची मुल्ये रुजवण्यासाठी आम्ही माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केला. लेख, कविता, सत्यकथा, व्हिडीओ, हेल्पलाईन व पुस्तकांविषयी माहिती इ. स्वरूपात वेबसाईटवर माहिती प्रकाशित केली. वाचकांना संवाद करता यावा, मते मांडता यावीत आणि मोकळेपणाने प्रश्न विचारता यावेत यासाठी ‘ओपिनिअन पोल’, ‘प्रश्नोत्तरे’ आणि लेखाखाली ‘कमेंट्स’ लिहिण्याची सोय आहे.

वेबसाईटची खास वैशिष्टे:

 • लैंगिकतेवर बोलणारी पहिली मराठी वेबसाईट
 • मनमोकळ्या संवादासाठी जागा : ओपिनिअन पोल, प्रश्नोत्तरे, कमेंट्स च्या माध्यमातून वाचकांचा सहभाग
 • एका वर्षात जवळजवळ २ लाख हिट्स, ३०० कमेंट्स, ३५० प्रश्न, प्रत्येक महिन्यात जवळजवळ ४५० लोकांचा पोलसाठी प्रतिसाद
 • प्रश्नोत्तरे विचारणाऱ्या व्यक्तीची ओळख कुठेही उघड होत नाही.
 • वाचकांचा जगभरातून प्रतिसाद

वेबसाईटच्या प्रेक्षकांनीही वेबसाईटला भरभरून प्रतिसाद दिला. प्रसिद्धीसाठी कोणतेही विशेष प्रयत्न न करता एका वर्षात जवळजवळ २ लाख हिट्स, ३०० कमेंट्स, ३५० प्रश्न, एका महिन्यात जवळजवळ ४५० लोकांचा पोलसाठी प्रतिसाद ही वाचकांनी वेबसाईटवर भरभरून केलेल्या प्रेमाची पोहोचपावतीच आहे.

वेबसाईटवर असंच भरभरून प्रेम करा. तुमचे प्रश्न, मते, विचार, प्रतिक्रिया, सूचना यांचे स्वागत. या वेबसाईटच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांमध्ये सकारात्मक मुल्ये रुजवण्यासाठी प्रयत्नशील राहूया.

या महिन्यात वेबसाईटला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा वेबसाईटच्या निर्मितीसाठी आणि वेबसाईट यशस्वी होण्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे विशेषतः तुम्हा वाचकांचे मनापासून आभार आणि अभिनंदन !

सुरक्षित समाजासाठी चला लैंगिकतेवर बोलूया…

आपली प्रिय,

तथापि टिम… 

You might also like More from author

2 Comments

 1. akshay patil says

  माझ्या लिंगा वरील कातड अजुन मागे गेल नाही मी त्या साठी काय करू

  1. I सोच says

   लिंगाच्या टोकाला एक फुगीर भाग असतो ज्याला शिस्नमुंड म्हणतात. शिस्नमुन्डावर एक त्वचा असते. मुलगा तारुण्यात आल्यावर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही. तुम्ही विचारले आहे की लिंगावरील त्वचा हाताने मागे घेतली तर चालते का? हे खरंतर शिस्नमुंडावरची त्वचा कितपत आवळलेली/टाईट यावर अवलंबून असेल. हाताने मागे घेऊन इजा होण्याची शक्यता आहे का? याबाबत योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त योग्य असेल. (फायमॉसिसची माहिती ‘मानवी लैंगिकता’ या बिंदू माधव खिरे यांच्या पुस्तकातून साभार)

Leave A Reply

Your email address will not be published.