एच आय व्ही – एड्स

65 10,954

एच आय व्ही – एड्स

एच आय व्ही म्हणजेच ह्यूमन इम्युनो डेफिशिअन्सी व्हायरस (HIV – Human Immune-Deficiency Virus). शरीराची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू. एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिण्ड्रोम (AIDS – Acquired Immune-Deficiency Syndrome). ही आजाराची एक अवस्था आहे. या संसर्गामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती नष्ट व्हायला लागते. याचा परिणाम म्हणजेच शरीर कोणत्याही प्रकारच्या जंतुलागणीचा मुकाबला करू शकत नाही. एचआयव्हीचं रुपांतर काही काळाने एड्समध्ये होतं. एचआयव्ही बरा होऊ शकत नाही. मात्र आता औषधं आणि योग्य आहाराच्या मदतीने एचआयव्ही असला तरी चांगलं आयुष्य जगता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो.

एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते.

एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे

 • निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया,
 • दूषित रक्त आणि
 • प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.

लिंगसार्गिक आजार असतील तर एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो.

लक्षणं

एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणं

एचआयव्हीची आधीची लक्षणं साध्या सर्दी-तापासारखी असतात. ताप, अंगदुखी, खोकला, इत्यादी. असुरक्षित संभोगानंतर 3 ते 6 आठवड्याच्या आत पुढील लक्षणं जाणवू लागली तर एचआयव्ही तपासणी करणं गरजेचं आहे.

 • ताप, डोकेदुखी
 • जुलाब
 • अंगावर रॅश, पुरळ

एचआयव्हीची लागण नसेल तर ही लक्षणं कसल्याही उपचराशिवाय जाऊ शकतात. मात्र लागण झाली असेल तर ही लक्षणं कित्येक महिने तशीच राहतात. आणि हळूहळू शरीराची प्रतिकार शक्ती नष्ट करतात. यातूनच पुढे एड्स ही अवस्था येते.

एड्सची लक्षणं

 • वजनात प्रचंड घट
 • भूक न लागणे
 • सतत जुलाब
 • त्वचेचा कॅन्सर
 • मेंदूज्वर
 • क्षयरोग

निदान कसं करायचं?

एचआयव्हीची लागण झाल्याची शक्यता वाटत असेल (निरोध न वापरता केलेला संभोग, निर्जंतुक न केलेल्या सुया वापरल्या असतील किंवा अंगात रक्त भरलं असेल) तर रक्ततपासणी करता येते. मात्र त्यासाठी ३ महिने वाट पाहून मग तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. एचआयव्हीची लागण झाली असेल तर त्या विषाणूच्या विरोधात शरीरात प्रतिद्रव्ये तयार होतात. संसर्ग झाल्यावर अशी प्रतिद्रव्ये तयार होण्यासाठी किमान २ महिन्याचा काळ जावा लागतो. रक्ताच्या तपासणीमध्ये अशी प्रतिद्रव्ये तयार झाली आहेत का ते पाहिले जाते. ३ महिन्याच्या आधी रक्त तपासणी केली तर ही प्रतिद्रव्ये मिळत नाहीत आणि एचआयव्ही झाला असेल तरी त्याची लागण नाही असा रिपोर्ट येतो. यामुळे पुन्हा रक्ताची तपासणी होणं गरजेचं आहे.

उपचार

एचआयव्हीवर कोणताही इलाज नाही. मात्र जीवनशैलीत आवश्यक बदल केले तर एचआयव्हीची लागण झाल्यानंतरही व्यक्ती संपूर्ण आयुष्य व्यवस्थित राहू शकते. सध्याच्या औषधांमुळे एड्सची अवस्था लांबवता येऊ शकते. या औषधांना अण्टीरेट्रोव्हायरल औषधे म्हणतात. ही औषधं विषाणूची वाढ थोपवतात.

एचआयव्ही होऊ नये म्हणून

लैंगिक संबंधातून लागण टाळण्यासाठी

 • निरोधचा वापर
 • एकाहून अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंध टाळा. किंवा असे संबंध नेहमी निरोधचा वापर करूनच ठेवा.
 • पुरुषांमध्ये सुंता केल्याने म्हणजेच लिंगाच्या पुढची त्वचा काढून टाकल्याने लिंगसांसर्गिक आजारांची लागण होण्याचा धोका ५०  टक्क्यांनी कमी होतो.
 • जननेंद्रियांवर फोड, व्रण, अनियमित स्राव किंवा वेदना असेल तर तपासणी करून घ्या. इतर कोणते लिंगसांसर्गिक आजार असतील तर एचआयव्हीची लागण होण्याचा धोका वाढतो.

रक्तातून लागण होऊ नये म्हणून

 • शरीरात रक्त भरताना ते अधिकृत रक्तपेढीतूनच घ्या. रक्ताची एचआयव्ही तपासणी झाली आहे का नाही हे तपासून बघा. रक्ताच्या पिशवीवर त्या रक्तावर केलेल्या सर्व तपासण्यांची नोंद असते.
 • निर्जंतुक न केलेल्या सुयांचा वापर कटाक्षाने टाळा. प्रत्येक वेळी नवीन सुई वापरा.
 • एकमेकांच्या इंजेक्शन्स किंवा सुया वापरू नका. शिरेतून नशा घेणाऱ्या व्यक्तींसाठी हे खास करून महत्त्वाचं आहे.

आईकडून बाळाला लागण होऊ नये म्हणून

 • आईला एचआयव्ही असेल तर गरोदरपणी आणि प्रसूतीच्या वेळी एआरटी औषधे घ्या.
 • प्रसूती शक्यतो सिझेरियन पद्धतीने करा.

हे समजून घ्या

आपल्याला कोणत्याही कारणाने एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे अशी शंका मनात असल्यास लगेच निदान करून घ्या. एक लक्षात घ्या वेळेवर निदान झालं आणि उपचार सुरू झाले तर एचआयव्ही झाला म्हणजे आयुष्य संपत नाही. जर काही काळजी घेतली आणि आपल्या जीवनशैलीत बदल केले तर एचआयव्ही असतानाही चांगलं आयुष्य जगण्याच्या शक्यता वाढवता येतात. निरोगी जीवनशैली, वेळेवर आरोग्य तपासणी, पोषक आहार आणि सकारात्मक मानसिकता यामुळे एचआयव्हीसह जीवन चांगलं जगता येऊ शकतं.

65 Comments
 1. Prakash Marathe says

  HIV झालेल्या व्यक्तीच्या तोंडामधील लाळेमध्ये HIV चे जन्तु असतात का ?

  1. I सोच says

   एच. आय. व्ही. चे प्रमाण लाळेमध्ये अगदी नगण्य असते. कीस करताना लाळेची मोठ्या प्रमाणात अदलाबदल होण्याची शक्यता नसते. चुंबन घेताना एच. आय. व्ही. चा मुखात प्रवेश झाला तरी विषाणू गिळले जाण्याची अधिक शक्यता असते. जठराच्या माध्यमातून प्रौढ व्यक्तींना एच. आय. व्ही. होत नाही. तोंडातील लहान जखमांमधून एच. आय. व्ही. विषाणू प्रवेश करण्याची शक्यता असे काहीवेळा म्हंटले जाते. मात्र कीस केल्याने लैंगिक उत्तेजना निर्माण होऊन असुरक्षित संभोग झाला तर मात्र एच. आय. व्ही. होण्याचा धोका वाढतो.

 2. deepak says

  Partner ko aur mere ko hiv nahi hai uske sath bar bar sex karne se hiv ho sakta hai

  1. deepak says

   Mere 2 grail Friend hai une hiv nahi aur muje hiv nahi hai to hiv hone khatra hai kya

   1. I सोच says

    जिस व्यक्ती को एड्स है उसके साथ यौनसंबंध बनाने से एच. आय. व्ही. होने की संभावना बढती है I अगर आप जिसके साथ यौनसंबंध राखते है उसे एड्स नहीं है तो चिंता करने की जरुरत नहीं है I लेकिन गर्भधारणा और अन्य लिंगसांसर्गिक बीमारी की रोकधाम के लिए कंडोम का इस्तमाल करना जरुरी है I

  2. I सोच says

   अगर आप दोनों को एड्स नहीं है तो चिंता करने की जरुरत नहीं है I लेकिन गर्भधारणा और अन्य लिंगसांसर्गिक बीमारी की रोकधाम के लिए कंडोम का इस्तमाल करना जरुरी है I

 3. shobha gawali says

  Agar beena condon ke sambandh 3 /4 logo ke sath rakhne se ho sakta hai kya.

  1. I सोच says

   अगर आप एच आय व्ही के बारे में जानना चाहते है तो यह महत्वपूर्ण सवाल आपने पूछा हैI एच.आय.व्ही / एड्स लैंगिक संबंधोद्वारा फैलनेवाली बीमारी हैI जिन व्यक्तियों के साथ लैंगिक सम्बंध है उसमेसे किसीको भी एच.आय. व्ही का संसर्ग नहीं हुआ है तो एच.आय.व्ही की बाधा नहीं होगीI लेकिन किसी को देखनेसे ये अंदाजा नहीं लगा सकते की वो व्यक्ति एच.आय.व्ही संक्रमित है की नहींI इस संसर्ग को पहचानने या जानने के लिए मेडिकल जांच यही इकमात्र पर्याय हैI इसलिए एच आय व्ही की बाधा से दूर रहने के लिए या सुरक्षित लैंगिक सम्बंध बनाने के लिए कन्डोम का उपयोग जरुरी होता हैI
   एच.आय.व्ही / एड्स के बारे में अधिक जानकारी के लिए निचे दी हुई लिंक पे क्लिक किजिएI (जानकारी मराठी में है)
   http://letstalksexuality.com/hiv_aids/

 4. Shree says

  जर एक किंवा जास्त मुलीनं सोबत जर मुख मुखमेतून केला असेल या,
  या स्त्री च्या योनी मार्गाला मैथुन सुख दिला असेल, आणि या पैकी कोणाला ही HIV नसेल तर , काही संभावना आहे का ….???
  या दोघांसोबत करत असताना जर या मध्ये time period खूप कालावधीचा असेल तर ….त्याचा फायदा होऊ शकतो का….???

 5. समीर चाहल says

  सर, मै और मेरा दोस्त एक लडकी के साथ बार बार सेक्स करते है।मेरा दोस्त हप्ते मे 2 ते 3 बार करता है लेकींन मै हर दिन मै 2 ते 3 बार करता हू। पहले ओ बार बार सेक्स करता था जैसे मे अब करता हू ।मै सेक्स करते समय उसकी योनी अपने मूह से चाटता हू ,किस भी करता हू।कभी कभी मै उसके योनी से अनेवाला स्त्राव भी पी लेता हू वैसे ही वो लडकी भी मेरा लिंग अपने मूह मे लेती है और कहि बार उसने मेरा वीर्य भी पिया है। हम में से किसींको एड्स नही है। तो क्या मुझे और मेरे partener को और हम तिन को एड्स हो सकता है क्या।plz मुझे ans जलदी भेजो

  1. समीर चाहल says

   Sir iska javab kab tak milega

 6. Ajay kadam says

  एड्स असलेल्या व्यक्ती ला किस केल्याने आपल्याला एड्स होतो का?

  1. I सोच says

   एडस असलेल्या व्यक्तीला किस केल्याने एडस होत नाही.

   अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/hiv_aids/

 7. दत्ता says

  सभोगा नंतर 1आठवडयात एचआईवीची लक्षणे जाणवतात का? जसे की जुलाब?

  1. I सोच says

   मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स करू नये असा काहीही नियम नाही. हा एक प्रचलित गैरसमज आहे की मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीर संबंध येऊ देऊ नयेत. या गैर समाजाचा संबंध पाळीच्या काळात स्त्री अपवित्र असते, तिला स्पर्श वर्ज असतो, पाळीतील रक्त अपवित्र असतं म्हणून तिला ‘बाजूला’ बसवलं गेलं पाहिजे इ. अशास्त्रीय बाबी ज्या आपण अनेक पिढ्या सांभाळत आलो आहोत त्यांच्याशी आहे. या पितृप्रधान परंपरा आणि गैरसमजुतीनाच प्रश्न विचारणं गरजेचं आहे.

   पण या सोबतच एक गोष्ट लक्षात ठेवू या की, काही स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होतो. या त्रासामुळे तिला विश्रांतीची गरज वाटू शकते. पाळी दरम्यान रक्तस्त्राव होत असतो. त्रासामुळे तिचा मूड नसेल तर संभोग करू नये. काहींना मासिक पाळीच्या वेळी योनीतून रक्त जात असताना त्यात लिंग घालून संभोग करायला घाण वाटतं, असं वाटत असेल तर या काळात संभोग करू नये. या काळात ओटी पोटात दुखणे, पाठ दुखणे किंवा चीड चीड होणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. अशा काळात शरीर संबंधांची इच्छा नसणं, नको वाटणं सहज आहे. तसं असेल तर त्याचा आदर कारण गरजेचं आहे.

   पाळीच्यावेळी स्त्रीच्या योनीच्या आतल्या भागाला संरक्षण करणाऱ्या जिवाणूंचे संतुलन बिघडलेलं असतं. अशा वेळी जर निरोध न वापरता संभोग झाला व जर पुरुषाला एड्स किंवा इतर लैंगिक आजार असेल तर स्त्रीला लैंगिक आजारांची लागण होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. शरीर संबंधांसाठी त्यात सामील व्यक्तींनी एकमेकांची संमती, इच्छा, एकमेकांप्रती किमान आदर आणि सर्वांचा आनंद या गोष्टींना महत्व देणं फार गरजेचं आहे.

   अधिक माहितीसाठी खालील लिंकवर भेट द्या.
   http://letstalksexuality.com/sex_during_periods/

 8. Sonu says

  Sir hiv teast 15 महीने me 5 बार करवाया nigitve hay oar चेक करना चाहिए kay plz batavo मायने aek accident के पेशंट को उठाया था so plz ans दीजिए mam

  1. I सोच says

   अगर आपने किसी पेशंट को उठाया तो HIV क्यु होगा? ऐसा नही हो सकता. आपने अगर 5 बार चेक भी किया है तो घबराना कैसा?
   फिर भी आपको घबराहट हो रही है तो 1097 इस हेल्पलाईन पर फोन करके सहायता मांग सकते हो.

   आप के और कोई सवाल हो तो http://letstalksexuality.com/ask-questions/ इस लिंक पर भेजिये

 9. mayur dhumal says

  1.)सर एच आय व्ही व्यक्ती सोबत निरोधचा वापर करून सेक्स केल्याने एच आय व्ही होऊ शकतो का.?

  2)वेश्या किंवा कॉल गर्ल सोबत संभोग करणे सुरक्षित आहे का?

  1. I सोच says

   1)एच आय व्ही व्यक्ती सोबत निरोधचा वापर करून सेक्स केल्याने एच आय व्ही होण्याचा धोका कमी होतो. कारण संभोग करताना बाकिच्या बर्‍याच गोष्टी होत असतात अन तिथुन संसर्ग होण्याची शक्यता असू शकते. अधिक माहितीसाठी http://letstalksexuality.com/hiv_aids/ या लिंकला भेट द्या.
   2)वेश्या किंवा कॉल गर्ल सोबत संभोग हा निरोधचा वापर करुन केला तर सुरक्षित होऊ शकतो.

 10. Pratik says

  Hiv किंवा एड्सअसलेल्या महिलेसोबत कंडोम वापरून सभोग केल्यावर एड्स किंवा इन्फेकॅशन होण्याची शक्यता किती असते?
  कंडोम वापरल्याने किती प्रमाणात सुरक्षा मिळते?पहिल्यांदाच सेक्स केल्यावर hiv होण्याची किती शक्यता असते?सेक्स करताना एकावेळी किती कंडोमम वापरावीत?

  1. I सोच says

   Hiv झालेल्या महिलासोबत कंडोम लावून संभोग केल्यावर एड्स किंवा इन्फेकॅशन होण्याचा धोका कमी होतो, पूर्णत: टळतो असे नाही कारण संभोग करताना बाकिच्या ब-याच गोष्टी घडत असतातच की, अन हो संभोग करताना एकच निरोध वापरावा, एकावर एक चढवुन 2 निरोध वापरु नयेत, त्याने निरोध फ़ाटू शकतात. याबाबत अधिक माहितीसाठी http://letstalksexuality.com/hiv_aids/ या लिंकला भेट द्या.
   पुढच्या वेळेस या ठिकाणी प्रश्न न विचारता http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर प्रश्न विचारा

 11. aniket says

  bf sobat pn sex zalay n dusra bf pn aahe jr sex krtana tyachi sperm an thod blood aat gelyas hiv hoto ka
  2 sobat bina com sex zalay

  1. I सोच says

   शरीरातील स्रावांमधून एच.आय.व्ही.ची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एच.आय.व्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो.
   एच.आय.व्ही.ची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते.
   अधिक माहीतीसाठी खालील लिंक्वर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/hiv_aids/

 12. Pmd says

  पिक्चरटाँकीज मध्ये टाचनी टोचविल्याने एडस झाला अशी बातमी खरी असु शकते का ?

  1. I सोच says

   असे काही होण्याची शक्यता कमी आहे पण त्यावेळी नक्की काय परिस्थिती काय होती यावर काय होणार हे अवलंबून असते. या बाबतीत आणखी माहितीसाठी पुढील लिंक नक्की पहा
   http://letstalksexuality.com/hiv_aids/

   आणखी काही प्रश्न असल्यास या ठिकाणी न विच्रारता http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर जाऊन विचारा
   धन्यवाद

 13. Prathamesh says

  एच आय व्ही बाधीत स्रीचे ब्रेस्ट चोखल्याने लागण होते का ?

  1. I सोच says

   त्यामागे खूप सार्‍या गोष्टी असू शकतात. म्हणजे स्तनांवर, हाताला, ओठाला, दातांमध्ये वा तोंडाला जर छोटी/बारीक जखम असेल. जिथुन संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
   अधिक माहितीसाठी http://letstalksexuality.com/hiv_aids/ इथे भेट द्या
   पुढच्या वेळेस या ठिकाणी प्रश्न न विचारता http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर प्रश्न विचारा

 14. Kachru says

  Maz lagn houn 2 varsh zaliy, maza job gadivar firnuacha ahe mazya penis la infection zal, pandhrya pural alya mazyamul tichya yonila pan reaction zalay hiv che lakshan ahe ka?

  1. I सोच says

   घाबरु नका, तुम्ही सांगितलेल्या लक्षणांवरुन एडस आहे की नाही याचे अनुमान नाही काढता येत. एचआयव्हीची लागण झाल्याची शक्यता वाटत असेल (निरोध न वापरता केलेला संभोग, निर्जंतुक न केलेल्या सुया वापरल्या असतील किंवा अंगात रक्त भरलं असेल) तर रक्ततपासणी करता येते. मात्र त्यासाठी ३ महिने वाट पाहून मग तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. एचआयव्हीची लागण झाली असेल तर त्या विषाणूच्या विरोधात शरीरात प्रतिद्रव्ये तयार होतात. संसर्ग झाल्यावर अशी प्रतिद्रव्ये तयार होण्यासाठी किमान २ महिन्याचा काळ जावा लागतो. रक्ताच्या तपासणीमध्ये अशी प्रतिद्रव्ये तयार झाली आहेत का ते पाहिले जाते. ३ महिन्याच्या आधी रक्त तपासणी केली तर ही प्रतिद्रव्ये मिळत नाहीत आणि एचआयव्ही झाला असेल तरी त्याची लागण नाही असा रिपोर्ट येतो. यामुळे पुन्हा रक्ताची तपासणी होणं गरजेचं आहे.
   म्हणून तुम्ही लवकरात लवकर तुमच्या पत्नीसोबत जाऊन डॉक्टरांना भेटा व पुढिल उपचाराची प्रक्रिया सुरु करा.

 15. Anant says

  असुरक्षित संभोगानंतर कमीत कमी किती दिवसात HIV ची लक्षणे दिसतात?

  1. I सोच says

   असुरक्षित संभोगानंतर 3 ते 6 आठवड्याच्या आत ताप, डोकेदुखी, जुलाब, अंगावर रॅश, पुरळ लक्षणं जाणवू लागली तर एच.आय.व्ही तपासणी करणं गरजेचं आहे. अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/hiv_aids/

   1. Rajan says

    7 saal bad ho sakta hai kya hiv

    1. lets talk sexuality says

     जैसे कि हम जानते है की HIV एक विषाणू है और इस विषाणू के संक्रमण के कारण धीरे-धीरे मनुष्य की रोग प्रतिरोधी क्षमता खत्म होती है और कुछ सालो के बाद HIV संक्रमण की दूसरी अवस्था AIDS आती हैं. आप 7 साल पुरानी बात बता रहे है, तो जब तक सही टेस्ट ना किये जाएं, तब तक निश्चित तौर पर नहीं कहा जा सकता कि वायरस संक्रमण है या नहीं.
     National AIDS Control Organisation (NACO) ने एक helpline चालू कि है उसका toll-free number 1097 है, आप यहा फोन करके अधिक जानकारी ले सकते है.

   2. Anant says

    मी 1097 ला कॉल केला होता. त्यांनी सांगितले की hiv ची सुरवातीची कोणतीही लक्षणे नसतात… माझा संभोग झाल्यानंतर 4 दिवसानंतर 10 दिवस सर्दी, 4 दिवस ताप आणि एक आठवडा खोकला होता… डॉक्टर कडून गोळ्या घेतल्यानंतर बरा झाला… तर hiv ची शंका घेता येईल का?

    1. lets talk sexuality says

     तुम्हाला एचआयव्हीची लागण झाल्याची शक्यता वाटत असेल तर रक्ततपासणी करुनच त्याची खात्री होऊ शकते. दुसरा कुठलाही खात्रीशीर मार्ग नाही आहे. मात्र त्यासाठी ३ महिने वाट पाहून मग तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. एचआयव्हीची लागण झाली असेल तर त्या विषाणूच्या विरोधात शरीरात प्रतिद्रव्ये तयार होतात. संसर्ग झाल्यावर अशी प्रतिद्रव्ये तयार होण्यासाठी किमान २ महिन्याचा काळ जावा लागतो. रक्ताच्या तपासणीमध्ये अशी प्रतिद्रव्ये तयार झाली आहेत का ते पाहिले जाते. ३ महिन्याच्या आधी रक्त तपासणी केली तर ही प्रतिद्रव्ये मिळत नाहीत आणि एचआयव्ही झाला असेल तरी त्याची लागण नाही असा रिपोर्ट येतो.
     तेव्हा तुम्ही तुमच्या रक्ताची HIV ची चाचणी करुन घ्या व चिंतामुक्त व्हा.

 16. Sanket says

  Agar age 15 saall ho tab anal sex kiya hai
  7saal ho gaaye aur partner HIV +be tha to HIV hota hai kya ,but mera penis uske anal me nhi gaya that surf bahar lagaya tha to HIV ho sakta hai kya

  1. lets talk sexuality says

   आपने जैसे कहा उससे पता चल रहा है की, आपका दोस्त पहले से संक्रमित था और आप दोनों ने 15 साल पहले असुरक्षित सेक्स किया था तो आप खतरे के दायरे में है. जैसा कि हम सब जानते हैं जब तक सही टेस्ट ना किये जाएं, निश्चित तौर पर नहीं कहा जा सकता कि वायरस संक्रमण है या नहीं. और ये 15 साल पहले कि बात है तो दोस्त आपको जादा घबराने की जरुरत नही है, सिर्फ सही टेस्ट करवा लो तो आप की घबराहट कम हो जायेगी. अच्छे रहो खूश रहो.

   इस विषय पर आपके जादा जानकारी के लिए निचे दी गयी लिंक देखे.
   http://letstalksexuality.com/hiv_aids/

 17. pd says

  maza GF Cha parents na aids hota but ticha janmacha 10 varshananter te warle mg Tila HIV asu shkto ka…
  mi tichabrobr without condom sex kela ahe but mala tas khi symptoms janvle nhit…

  1. lets talk sexuality says

   मित्रा, तुझी काळजी लक्षात येते आहे. तुम्ही सांगितल्यानूसार खूप सार्या शक्यता यात आहेत. जर तुमच्या मैत्रिणीच्या जन्माच्या वेळेस त्यांचे आई वडिल HIV/AIDS सह जगत होते का? की, तुमच्या मैत्रिणी च्या जन्माच्या नंतर त्यांना HIV चा संसर्ग झाला. अन अजुन खूप सार्या शक्यता आहेत.
   त्यामुळे सध्या तुमच्या व तुमच्या मैत्रिणीच्या पुढच्या आयुष्यासाठी हे महत्वाचे की, सध्याची काय परिस्थिती आहे. तेव्हा तुम्ही व तुमच्या मैत्रिणीची HIV ची टेस्ट करणे गरजेचे आहे. त्याने सर्व निदान होईल व मनातली शंकेचे निरसन होईल. टॆस्ट कधी व केव्हा करायची यासाठी हा लेख परत वाचा. अन अजिबात ताण घेऊ नका, पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.

 18. Vidya Khude says

  एचआयव्ही झालेल्य माणसाचे वीर्य महिलेच्या योनी मध्ये गेले नसे नसेल पण सेक्स केला असेल तर त्या महिलेला एचआयव्ही होऊ शकतो का

  1. lets talk sexuality says

   शरीरसंंबंध करताना जर निरोधचा वापर योग्य प्रकारे केला असेल तर शक्यता कमी होते. तसेच असुरक्षित संबंध आले असतील तर शक्यता खूप जास्त प्रमाणात बळावते.

   जर अजुन काही प्रश्न असतील तर या ठिकाणी न विचारता http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर विचारावेत.

 19. Kishor hingde says

  सर हातावर गोंधले आणि एका महिन्या नंतर थोड बाजूला एका जागी सूज आली आणि आता 15 दिवस झाले आजुन ही ती सूज आहे तर काय समजावे थोड सांगा सर या बद्दल

  1. lets talk sexuality says

   घाबरून जाऊ नका,आधी डॉक्टरांना भेटा व त्यांचा सल्ला घ्या, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील.

 20. AJit gawade says

  Sir maze boys to boys sex zale 4-5 Janansobat so bat mla hiv houshkto ka..typaiki konalach nasta tri

  1. lets talk sexuality says

   निरोध शिवाय जर शारीरिक संबंध आलेले असतील तर ते कधीही धोकादायकच असतात. अन कुणाला HIV/AIDS आहे हे वरून कळत नाही त्यासाठी चाचणी करावी लागते.
   चाचणी कधी? का? कुठे? करायची यासाठी वरची पोस्ट व त्याखालच्या कमेंट्स परत नक्की वाचा.

   यानंतर कधीही प्रश्न विचारण्यासाठी पुढील लिंकवर जात चला.
   http://letstalksexuality.com/ask-questions/

 21. AJIT Gawade says

  Pan sir ya gostila 3 yer zale ani…ani ya 3 varshat mi 5 test kelya non reactive Ali. .tr bhavishyat positive hou shakte ka..

  1. lets talk sexuality says

   नाही!
   पण परत या मधल्या काळात किंवा भविष्यात जर कधी असुरक्षित(निरोध शिवाय)शारीरिक संबंंध आले तर परत चाचणी करावी लागेल. त्यामुळे नेहमी निरोधचा वापर करा व अशा लिंगसांसर्गिक आजारांपासून आपले रक्षण करा.

   पुढील वेळी या ठिकाणी प्रश्न न विचारता http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर जाऊन प्रश्न विचारावेत

 22. kn says

  सर माझं एका पेक्षा अधिक विवाहित महिलांशी संबंध विना कंडोमचा झालाय , आणि या प्रत्येक संबंधमध्ये 4 ते 5 दिवसांचा ग्याप आहे , तर HIV होण्याचे कारण आहे का ?

  1. lets talk sexuality says

   निरोध शिवाय जर शारीरिक संबंध आलेले असतील तर ते कधीही धोकादायकच असतात. अन कुणाला HIV/AIDS आहे हे वरून कळत नाही त्यासाठी चाचणी करावी लागते.तुमचे संबंध असणाऱ्या कुठल्याही महिलेला जर HIV/AIDS असेल तर तो तुमच्याकडे सहज संसर्गित होऊ शकतो. म्हणून चाचणी करून घ्या.

   एचआयव्हीची लागण झाल्याची शक्यता वाटत असेल रक्ततपासणी करता येते. मात्र त्यासाठी शेवटचे असुरक्षित शारीरिक संबंध (निरोध शिवाय केलेले) आल्यानंतर तिथपासून ३ महिने वाट पाहून मग तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण एचआयव्हीची लागण झाली असेल तर त्या विषाणूच्या विरोधात शरीरात प्रतिद्रव्ये तयार होतात. संसर्ग झाल्यावर अशी प्रतिद्रव्ये तयार होण्यासाठी किमान २ महिन्याचा काळ जावा लागतो. रक्ताच्या तपासणीमध्ये अशी प्रतिद्रव्ये तयार झाली आहेत का ते पाहिले जाते. ३ महिन्याच्या आधी रक्त तपासणी केली तर ही प्रतिद्रव्ये मिळत नाहीत आणि एचआयव्ही झाला असेल तरी त्याची लागण नाही असा रिपोर्ट येतो. यामुळे पुन्हा रक्ताची तपासणी होणं गरजेचं आहे.

   यानंतर प्रश्न विचारण्यासाठी पुढील लिंकवर जावे
   http://letstalksexuality.com/ask-questions/

 23. Rushikesh karale says

  H.i.v जर एका व्यक्तीला आहे आणी समोरच्या व्यक्तिला नाहि आनि त्याचे संबध आले तर h.i.v होऊ शकतो का?

  1. lets talk sexuality says

   निरोध शिवाय जर शारीरिक संबंध आले तर HIV सह जगणाऱ्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्ती ला HIV चा संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त पटीने वाढते. म्हणून शारीरिक संबंध करताना निरोध चा वापर करणे महत्वाचे आहे.

 24. s says

  I due to prone type masterbation hiv cause. I’m doing it from 2010 does it leads hiv

  1. lets talk sexuality says

   तुमचा प्रश्न नीट कळत नाही आहे, सविस्तरपणे लिहिला तर उत्तर द्यायला मदत होईल.

 25. abhishek bhaisare says

  Hiv positive aslelya vyakti ch blood juice mdhe mix krun dilya gel age mla
  Tr mla aids honar ka

  1. lets talk sexuality says

   नाही, कारण HIV चा विषाणू या परिस्थितीत तग नाही धरू शकत. संसर्ग होण्याची कारणे वरती दिलेली आहेतच, आवश्यकता वाटल्यास वरील लेख नव्याने पुन्हा वाचा.

 26. Attu Patil says

  जर मी एका व्यक्ती सोबत मुखमैथुन केल व नंतर 2-3 दिवसांनी एका वेश्या व्यवसाय करणार्या महिला सोबत संभोग करत असताना जर निरोध अचानक फाटला तर मला HIV/AIDS होऊ शकतो का..??
  ( वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही व्यक्ती ना HIV नाहीये )
  सांगा सर मी खुप घाबरलो आहे

  1. lets talk sexuality says

   जर संभोग करणा-या व्यक्तींमध्ये कुणाला HIV/AIDS नसेल तर त्याचा संसर्ग एकाकडून दुस-याला नाहीच होणार, पण कुणाला HIV आहे वा नाही हे चाचणी न करता कळत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. पण निरोध फाटला वा मुखमैथुन करतानाही जर एखाद्या व्यक्तीला HIV/AIDS असेल तर दुस-याला संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा निरोध वापरताना तो योग्य पद्धतीने घालणे गरजेचे असते.
   अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा http://letstalksexuality.com/use-of-men-condom/, http://letstalksexuality.com/condom-part-2/, http://letstalksexuality.com/dental-dam/ .

   एचआयव्हीची लागण झाल्याची शक्यता वाटत असेल रक्ततपासणी करता येते. मात्र त्यासाठी शेवटचे असुरक्षित शारीरिक संबंध (निरोध शिवाय केलेले) आल्यानंतर तिथपासून ३ महिने वाट पाहून मग तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण एचआयव्हीची लागण झाली असेल तर त्या विषाणूच्या विरोधात शरीरात प्रतिद्रव्ये तयार होतात. संसर्ग झाल्यावर अशी प्रतिद्रव्ये तयार होण्यासाठी किमान २ महिन्याचा काळ जावा लागतो. रक्ताच्या तपासणीमध्ये अशी प्रतिद्रव्ये तयार झाली आहेत का ते पाहिले जाते. ३ महिन्याच्या आधी रक्त तपासणी केली तर ही प्रतिद्रव्ये मिळत नाहीत आणि एचआयव्ही झाला असेल तरी त्याची लागण नाही असा रिपोर्ट येतो. यामुळे पुन्हा रक्ताची तपासणी होणं गरजेचं आहे.

   यानंतर प्रश्न विचारण्यासाठी पुढील लिंकवर जावे
   http://letstalksexuality.com/ask-questions/

   1. राकेश says

    लडके ने लडके के साथ मुखमैथुन किया तो इससे भी कुछ खतरा है क्या?

    1. let's talk sexuality says

     निरोधशिवाय केल्या जाणा-या कुठल्याही शारीरिक संबंधामुळे hiv/ aids ची सैंद्धांतिक पातळीवर शक्यता खूप कमी असते पण लिंगसांसर्गिक आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. तेव्हा मुखमैथुन करायचे असेल तरीही काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पुढील लिंक पहा. http://letstalksexuality.com/dental-dam/

 27. Jbl says

  Aids aslelya stree la period yete ka

  1. lets talk sexuality says

   हो! येतात की.

 28. महेश says

  सर जर 10 महिन्यापूर्वी असुरक्षित संभोग केला असेल आणि त्यानंतर मलेरिया किंवा डेंग्यू आजार झाले आणि ते बरे पण झालेत.वजनामध्ये वाढ झाली आहे ही लक्षणे एड्स ची आहेत का

  1. lets talk sexuality says

   सुरवातीला कुठलीही लक्षणे पाहून आपण एड्स आहे की नाही हे कळत नाही, त्यासाठी एड्सची चाचणी करावीच लागेल.
   अधिक माहितीसाठी वरील लेख पुन्हा वाचा

 29. चेतन पाटील says

  मि बाहेर वेश्यासोबत सेक्स केल. पण मि जसे सेक्स करायला लागलो तर लगेच 1 मिनिटात कोन्डम फाटले.मग त्या बाईने लगेच दुसरे दोन कंडोम चढवले मग आम्ही सेक्स केल.तर मला भिती होती की यामुळे मला एच आय व्ही होईल का? मला मार्गदर्शन करा . तसा. कोणताही स्राव तिच्या. योनितुन झाला नव्हता.व ति बोलताना बोली. कि पैसे आयुष्य भर कमवता.येतील.पण जिवन एकदाच मिळतो.त्या मुळे तुम्हालाही रोग नाही ..आणी मला पण रोग नाही.मि घाबरुण हा व्यवसाय करते.पण तरीही मला भिती वाटत होती.

  1. let's talk sexuality says

   तुमची परिस्थिती लक्षात येते आहे, ब-याच वेळा निरोध कसा वापरायचा याचे योग्य मार्गदर्शन – माहिती नसल्याने निरोध फाटू शकतो.निरोध कसा वापरायचा याबाबत माहिती सोबतच्या लिंकमध्ये दिली आहे. http://letstalksexuality.com/use-of-men-condom/ , http://letstalksexuality.com/condom-part-2/.

   एकावेळेस एकच निरोध वापरावा, दोन वापरले तर ते एकमेकांना घासुन फ़ाटतात. अशाच काही बाबी आहेत ज्या निरोधबाबत महत्वाच्या आहेत, सोबतची लिंक पहा. http://letstalksexuality.com/myths-and-facts-about-condom/

   त्या महिलेने तुम्हाला संगितले आहे व घडलेल्या तुमच्या परिस्थितीत तशी जास्त शक्यता वाटत नाही. तरीही या सगळ्या शक्यताच आहेत. अन कुणा व्यक्तिला एडस आहे की नाही हे आपण पाहुन सांगु शकत नाही. त्यासाठी चाचणी करावीच लागते. ही चाचणी असुरक्षित शारीरिक संबंध आल्यानंतर 3 महिन्यांनी करायची असते. या मधल्या काळात जर पुन्हा असे असुरक्षित शारीरिक संबंध आले तर पुन्हा तिथुन पुढे 3 महिने थांबुन ही चाचणी करावी लागते. एडस व त्याबाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंक वाचा. http://letstalksexuality.com/hiv_aids/, http://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

   तुम्हालाही एड्सचा संसर्ग झाला आहे की नाही, हे चाचणी केल्याशिवाय कळणार नाही. तेव्हा जास्त टेंशन घेऊ नका, सध्या या आजारावर ही औषधे आहेत व त्यामुळे hiv/एडस सोबत जगणा-या माणसांचे आयुर्मान वाढवता येते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.