माझ्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधू ?

0 802

प्रिय मित्र-मैत्रिणींनो,

तथापिकडून सदिच्छा !

सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही वेबसाईटवरील प्रश्नोत्तरे या प्लॅटफॉर्मला भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल धन्यवाद! आशा आहे, तुम्हाला याचा फायदा होत असेल. अनेकदा वेबसाईटवर ‘माझ्या प्रश्नाचे उत्तर कसे मिळेल?’ किंवा ‘माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही’ अशा प्रतिक्रिया येताना दिसतात. तुम्ही कोण आहात? किंवा तुम्ही नेमका कोणता प्रश्न विचारला आहे? हे आम्हाला ओळखता येत नाही. त्यामुळं नेमकं कोणाच्या प्रश्नाला उत्तर मिळालं नाही हेही आम्हाला समजणं शक्य नाही. म्हणूनच तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधणं सोप्पं जावं यासाठी ही माहिती देत आहे.

आम्ही शक्यतो तीन दिवसात किंवा जास्तीत जास्त एक आठवडा या कालावधीत उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

तुम्ही प्रश्न विचारताना ‘Private’  हा पर्याय निवडला असेल तर तुमचा प्रश्न विचारताना चालू असलेला ई-मेल आयडी देणे अनिवार्य आहे. तरच तुमचे उत्तर तुमच्या ई-मेल वर मिळेल. निश्चिंत राहा. तुमचा ई-मेल आयडी गोपनीय राहील तसेच त्याचा आमच्याकडून गैरवापर केला जाणार नाही.

जर तुम्ही प्रश्न विचारताना ‘Public’ हा पर्याय निवडला असेल तर तुमचे उत्तर शोधण्यासाठी उजव्या बाजूला ‘प्रश्नोत्तरे’ असे लिहिले आहे त्यावर किंवा http://letstalksexuality.com/questions-2/ या लिंकवर क्लिक करा. सर्च मध्ये तुमचा प्रश्न टाईप करा. तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल. रोज नवीन प्रश्नांची उत्तरं टाकली जातात त्यामुळे आधीची उतरं वेबसाईटवर ‘आधीचे प्रश्न आणि उत्तरं’ याखाली दिसत नाहीत त्यामुळे ती ‘प्रश्नोत्तरे मध्ये शोधावी लागतात.

तरीही तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही तर माफ करा काही तांत्रिक अडचण आली असावी. तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा.

प्रश्नोत्तरे तसेच वेबसाईटवरील इतर लेख, पॉडकास्ट्स , व्हिडीओज, कार्टून्स याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. वेबसाईटसाठी तुमचे प्रेम, नाती, लैंगिकता यांविषयीचे अनुभव नक्की लिहा.

 

आयसोच आणि तथापि टीम

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.