Home / I Soch / ‘आयकॉल’ हेल्पलाईन-०२२ २५५२११११

‘आयकॉल’ हेल्पलाईन-०२२ २५५२११११

नाते संबंधातील ताणतणाव, नैराश्य, शोषण, हिंसा, घरगुती हिंसा, लैंगिकतेविषयीचे प्रश्न, कामाच्या ठिकाणच्या अडचणी, दुर्धर आजार, व्यसनाधिनता आणि करिअरविषयीचे प्रश्न यांसारख्या अनेक प्रश्नांचा सामना करत असताना आपल्याला ताणतणाव येऊ शकतो. भावनिक आणि मानसिक आधाराची गरज भासू शकते.

टाटा समाजविज्ञान संस्थेची iCALL (आयकॉल)  ही हेल्पलाईन गरजू व्यक्तींना समुपदेशन आणि भावनिक आधार देण्याच्या हेतूने सुरु करण्यात आली आहे. ‘आयकॉल’ला तुम्ही तुमच्या सोयीनुसार फोन किंवा ई-मेल करू शकता. तुमचे नाव किंवा फोन नं. देण्याची आवश्यकता नसल्याने तुमची ओळख कुठेही उघड होणार नाही. तुम्ही तुमचे समाधान होईपर्यंत, कितीही वेळ बोलू शकता.

फोन:  ०२२ २५५२११११

ई-मेल: icall@tiss .edu
फोन करण्याची वेळ: सोमवार ते शनिवार, सकाळी ८ ते रात्री १०

आयकॉलची वैशिष्ट्ये:

 • प्रशिक्षित व्यावसायिक समुपदेशन सेवा
 • सोमवार ते शनिवार, सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत दूरध्वनी मार्ग व्यस्त असणार नाही
 • प्रत्येक ई-मेल /ट्वीटर/ फेसबुक संदेशाला २४ तासांत प्रतिसाद
 • पूर्णत: गोपनीयता : तुमचे नाव अथवा फोन नं. नोंदविण्याची आवश्यकता नाही. संभाषण ध्वनिमुद्रित केले जात नाही.
 • तुम्ही तुमचे समाधान होईपर्यंत, कितीही वेळ बोलू शकता आणि तुमचे सर्व बोलणे संयमपूर्वक ऐकले जाते.
 • मिळणारा भावनिक आधार हा न-निर्णायक (non judgmental) असेल आणि तुम्ही कोणत्याही विषयावर बोलू शकता.
 • विविधतेचा आदर : प्रत्येक समुपदेशक अल्पसंख्यांक/ दुर्लक्षित समुदायाच्या समस्यांबाबत संवेदनशील आहे.

About I सोच

I Soch encourages Pune youth to SPEAK OUT on equality, safety, diversity within the discussions of sexuality. It is a platform to learn, argue and clarify.

2 comments

 1. राहुल

  सर ।
  माझी एक गोटी लहान आहे तर त्यावर उपाय सांगा।

  • वृषणाच्या किंवा बीजकोषाच्या आकारावरुन शुक्राणूंच्या निर्मितीवर काहीही परिणाम होत नाही. शरीराचं तापमान आणि वृषणांचं तापमान यामध्ये फरक असतो. वृषणांमध्ये शुक्राणूंची निर्मिती होण्यासाठी ठराविक तापमानाची गरज असते. शरीराच्या रचनेमध्ये वृषणांची पिशवी शरीराबाहेर असते ज्यामुळं वृषणांची पिशवी आंकुचन आणि प्रसरण पावून तापमान राखता येतं. जर ठराविक तापमान निर्मितीसाठी वृषणांना अडथळा निर्माण होत असेल तर तर शुक्राणूंच्या कमी-जास्त निर्मितीवर परिणाम होवू शकतो. उदा. जास्त तंग किंवा उष्ण प्रदेशात जाडसर कपडे घालणं. जर लिंगाला संभोगादरम्यान ताठरता येत असेल आणि वीर्यामध्ये पुरेसे शुक्राणू असतील तर अंडकोष किंवा वृषण लहान असल्याने काहीही अडचण येत नाही. सेक्स किंवा संभोग करताना जर लिंगाला ताठरता येत असेल तर संभोग करताना अथवा लैंगिक सुखामध्ये बाधा येत नाही आणि तुमच्या वीर्यामध्ये सशक्त शुक्राणू असतील तर गर्भाधारनेस अडचण येत नाही. यामध्ये जर काही अडचण येत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा काळजी करण्याचे काहीही कारण नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.