काही वावगं नाही… सगळं नॉर्मल आहे…

0 1,064

आपण सगळे मानव आहोत. आपण सगळे एक आहोत तरी आपल्यातला प्रत्येक जण वेगळा आहे. माझा रंग काळा आहे पण माझी मैत्रीण गोरी आहे. मी जाड आहे तर माझा भाऊ लुकडा. काही जणांच्या शरीरात लिंग आणि वृषणं असतात तर काहींच्या शरीरात गर्भाशय आणि योनिमार्ग. काहींना दिसतं, ऐकू येतं तर काहींना नाही. काही जण प्रेमात पडतात तर काहींना प्रेमाशी काहीच देणं घेणं नसतं. काहींच्या शरीरावर केस असतात तर काहींच्या नसतात. तरीसुद्धा आपण सगळे मानव आहोत. आपली शरीरं जशी वेगळी आहेत तशाच आपल्या भावना आणि कल्पनादेखील भिन्न आहेत. आपल्या आवडी निवडी वेगवेगळ्या असल्या तरी आपला उगम एकच आहे.

काही मुलींना 10 व्या वर्षीच पाळी येते तर काहींना येतच नाही. काही मुलांना झोपेत वीर्य बाहेर येण्याचा अनुभव आला असेल तर काहींना नाही. काही स्त्रिया आई होतात तर काही ठरवून मुलं जन्माला घालत नाहीत. काहींना पुरुष आवडतात तर काहींना स्त्रिया. काहींना संग करायला, सेक्स करायला आवडतं तर काहींना त्यात काडीचा रस नाहीये.

या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. आपण जसे आहोत तसं असणं नॉर्मल आहे. आणि आपण इतरांपेक्षा वेगळे असलो तरी त्यात वावगं काही नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.