पोलीस शिपाई ललिता साळवे यांना लिंगबदलाची परवानगी

628

बीड येथील महिला पोलीस शिपाई ललिता साळवे यांना राज्य पोलीस मुख्यालयाने लिंगबदलासाठी परवानगी दिली.

पोलीस मुख्यालयाने धाडलेले पत्र रविवारी साळवे यांच्या हाती पडले. त्यानुसार पुढील उपचारांसाठी त्यांनी सोमवारी मुंबईतील जेजे रुग्णालय गाठले. साळवे यांनी लिंगबदलाची इच्छा व्यक्त केली होती. त्यास परवानगी देण्यात आल्याचे बीडचे पोलीस अधिक्षक श्रीधर गोविंद राजन यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. मात्र लिंगबदलानंतर त्यांना पुरुष शिपाई म्हणून पोलीस दलात सामावून घेतले जाईल का, याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “मी या दिवसाचीच वाट पाहत होते, आत मी माझी स्वप्न पूर्ण करू शकेन”, या शब्दांत साळवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बातमी साभार – https://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-woman-cop-gets-government-nod-for-sex-change-surgery-1684044/

Comments are closed.