‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ कार्यक्रमाला आवर्जून या…

0 339

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,

आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला.  आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं  आग्रहाचं  निमंत्रण.

तथापीनं ‘आय सोच- चला लैंगिकतेवर बोलूया’ हा प्रकल्प सुरु केला. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही युवकांसोबत निवडीचा अधिकार, प्रतिष्ठा,वैविध्य, समानता आणि आदर या लैंगिकतेच्या मूल्यांना घेऊन संवाद करत आहोत. लैंगिकतेची मूल्यं, नात्यातील दबाव आणि नियंत्रण यांसारख्या विषयांवर आम्ही युवकांसोबत चर्चा घडवून आणू शकलो. यासाठी प्रत्यक्ष संवाद, व्हिडीओ क्लिप्स, वेबसाईट आणि सोशल नेटवर्किंग साईट्स यांसारख्या माध्यमांचा उपयोग केला. या प्रकल्पाचा भाग म्हणून letstalksexuality.com  ही वेबसाईट सुरु करून लैंगिकतेबद्दल बोलण्यासाठी, आपल्या मनातील शंका, विचार, भीती, उत्सुकता व्यक्त करण्यासाठी  मनमोकळ्या संवादाची, विश्वासाची एक स्पेस तयार करण्यात आली. या वेबसाईटला गेल्या वर्षभरात प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

लेट्स सोच- एक नया नजरिया’ हा सांगता कार्यक्रम महाविद्यालये, प्राध्यापक, युवक, संस्था आणि प्रकल्पामध्ये आणि वेबसाईटसाठी योगदान दिलेल्या सर्वांसोबत साजरा करण्याचा विचार आहे. हा कार्यक्रम शनिवार, ११ फेब्रवारी २०१७ सकाळी ९.३० ते दुपारी २.००  असणार आहे.  कार्यक्रमासाठी आवर्जून वेळ काढून उपस्थित रहावे. खाली निमंत्रण पत्रिका दिली आहे.

स्थळ: हॉल क्र. ३ , मराठवाडा मित्र मंडळाचे, कॉलेज ऑफ कॉमर्स, (एम. एम. सी. सी. कॉलेज)  डेक्कन, पुणे.

 

आपली

गौरी आणि तथापि टिम

 

Leave A Reply

Your email address will not be published.