सज्ञान मुला-मुलींना ‘लिव्ह-इन’चे स्वातंत्र्य, सुप्रीम कोर्टाचा नि:संदिग्ध निर्वाळा

209

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुला-मुलींना आपल्या पसंतीच्या जोडीदारासोबत एकत्र राहण्यासाठी लग्नासाठीचे कायदेशीर वय पूर्ण होण्याची गरज नाही. लग्न न करता ही मुले-मुली ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ मध्ये एकत्र राहू शकतात, असा नि:संदिग्ध निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली – लग्नाचे कायदेशीर वय न झालेल्या मुला-मुलींनी पळून जाऊन विवाह केला तरी त्यांचे पालक बळजबरीने त्यांची ताटातूट करू शकत नाहीत. पालकांनी सक्ती केल्यास प्रेमी युगुलास पुन्हा एकत्र आणणे हे न्यायालयांचे कर्तव्य आहे. सामाजिक रुढी-परंपरांचा मुलाहिजा न ठेवता न्यायालयांनी हे कर्तव्य न चुकता बजावायला हवे, असेही न्यायालयाने अधोरेखित केले.

सर्वोच्च न्यायालय…
भारतात १८ वर्षे वयाचा नागरिक कायद्याने सज्ञान मानला जातो व त्याला राज्यघटनेने दिलेले सर्व मुलभूत हक्क व स्वातंत्र्य प्राप्त होतात. जगण्याचा हक्क हा त्यापैकी महत्त्वाचा मुलभूत हक्क आहे. आपले आयुष्य कसे जगायचे, कोणत्या धर्माचे आचरण करायचे, कोणाशी लग्न करायचे वा लग्न न करता कोणासोबत राहायचे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य हा या हक्काचा अविभाज्य भाग आहे. अगदी आई-वडिलांचे काय पण न्यायालयेही या स्वातंत्र्यात लुडबूड करू शकत नाही.

धर्म, कुटुंब किंवा समाजही या व्यक्तिगत स्वातंत्र्याला आडकाठी ठरू शकत नाही.

बातमी साभार : http://www.lokmat.com/national/freedom-live-18-children-and-girls/

Comments are closed.