पुरुषाचं शरीर

66 25,885

XY गुणसूत्रं – आपल्या सर्वांचा जन्म स्त्री आणि पुरुष बीजाच्या संयोगातून झाला आहे. या दोन्ही बीजांमधून गुणसूत्रांच्या 23 जोड्या नव्या फलित बीजामध्ये येतात. यातल्या एका गुणसूत्राच्या जोडीवरून होणाऱ्या बाळाचं लिंग ठरतं. स्त्री बीजामध्ये केवळ X गुणसूत्रं असतं तर पुरुष बीजांमध्ये X किंवा Y हे गुणसूत्र असतं. स्त्री बीजामधील X आणि पुरुष बीजामधील X एकत्र आले तर मुलगी होते. आणि स्त्री बीजामधील X आणि पुरुष बीजामधील Y एकत्र आले तर मुलगा होतो. ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या होते. त्यावर पुरुषाचा काहीच ताबा नसतो. आणि बाईचा तर अजिबात संबंधही नसतो. तरी मुलगी झाली तर सारा दोष बाईच्या माथ्यावर येतो. हे चूक तर आहेच पण पूर्णपणे अशास्त्रीय देखील आहे.

लिंग

male-body1मुलींप्रमाणे मुलग्यांचे लैंगिक अवयव शरिराच्या आत नसतात. ते शररीराच्या बाहेर दिसू शकतात. पुरुषांच्या बाहेरील (दिसणाऱ्या) लैंगिक अवयवाला लिंग किंवा शिश्न असे म्हणतात. शिश्नाचा आकार हा प्रत्येक पुरुषानुसार वेगवेगळा असू शकतो. शिवाय विविध अवस्थांमध्ये शिश्नाचा आकार बदलत असतो. शिश्नाला बाहेरून एका पातळ त्वचेचं आवरण असतं. शिश्न ताठरतं तेव्हा ही त्वचा मागे सरकली जाते. शिश्नावरील ही त्वचा खालच्या बाजूने वृषणास जोडलेली असते. शिश्न हे पूर्णपणे सरळ असतंच असं नाही. ते उजवीकडे किंवा डावीकडे किंचित झुकलेलं असू शकतं. शिश्नाचा पुढील टोकाचा भाग जास्त संवेदनशील असतो.

पुरुष लैंगिकदृष्टया जेव्हा उत्तेजित होतो तेव्हा शिश्नात रक्ताचा पुरवठा वाढतो. यामुळे शिश्न ताठ आणि मोठं होतं. यालाच शिश्न ताठरणे असे म्हणतात. शिश्न उत्तेजित झाल्यावर त्यातून पारदर्शक द्रावाचे थेंब बाहेर येतात. काहीवेळेस कोणत्याही लैंगिक उत्तेजनाशिवायही लिंगामध्ये ताठरता येते. लघवी आणि वीर्य बाहेर येण्याचा एकच मार्ग असतो तो म्हणजे मूत्रनलिका. त्यामुळे एखादेवेळी लघवी करताना किंवा आधी पांढरा पदार्थ बाहेर पडताना दिसतो. कारण लघवी करण्यापूर्वी मूत्रनलिकेत राहिलेलं वीर्य बाहेर पडत असतं.

माहिती असावं:

अ) रात्री व पहाटे झोपेत अनेक पुरुषांचं लिंग उत्तेजित होऊन वीर्य बाहेर येतं. मात्र याचा अर्थ लैंगिक उत्तेजना जास्त आहे असा होत नाही.

ब) कोणत्याही प्रकारच्या औषधाने, व्यायामाने किंवा मालिश केल्याने लिंगाचा आकार वाढू शकत नाही.

क) लिंगाचा आकारापेक्षा लैंगिक क्रीडेच्या पध्दतीवर लैंगिक सुख अवलंबून असतं.

इ) काही जाती/धर्मामध्ये लिंगांच्या पुढील त्वचा कापून टाकली जाते. यालाच सुंता करणे असे म्हणतात. काही वैद्यकीय कारणांमुळे सुद्धा लिंगाच्या पुढची त्वचा काढून टाकावी लागते.

वृषण व बीजकोष

शिश्नाच्या खालील बाजूस वृषण असते. या वृषणामध्ये दोन बीजकोष असतात. या दोन्ही बीजकोषाचा आकार सारखाच असतो असं नाही. पोटात जिथे मूत्राशय असतं, त्याच्या मागच्या बाजूला दोन वीर्यकोष असतात. बीजकोषात पुरुषबीजं तयार व्हायला लागतात. पुरुषबीजं बीज कोषातून बाहेर पडून बीजवाहक नलिकेतून वीर्यकोषात जातात. वीर्यकोष व त्याच्या शेजारील प्रोस्टेट ग्रंथीमधून वेगवेगळे स्त्राव स्त्रवतात आणि ते वीर्यकोषात साठेवले जातात. त्यात एक चिकट पांढरा पदार्थ तयार व्हायला लागतो त्यालाच वीर्य असे म्हणतात. तयार झालेले वीर्य शिश्नातून बाहेर पडते.

शरीरामध्ये वीर्यनिर्मिती सातत्याने चालू असते. वीर्यामध्ये शुक्राणू आणि इतर घटक पदार्थ असतात. शुक्राणूमुळे गर्भधारणा होऊ शकते. शुक्राणूंच्या निर्मितीसाठी शरिराच्या तापमानापेक्षा कमी तापमानाची गरज असते. त्यामुळे वृषण शरीरापासून थोडे वेगळे असतात. बीजकोष हे जास्त संवेदनशील असतात. जेव्हा बीजकोषाजवळील तापमान थंड असते, त्यावेळेस वृषण आकुंचन पावतात, तर जेव्हा तापमान जास्त असते त्यावेळेस वृषण प्रसरण पावतात. कारण शुक्राणू तयार होण्यासाठी बीजकोषाला एका विशिष्ट तापमानाची गरज असते. आकुंचन आणि प्रसरण या क्रियांवर आपले नियंत्रण नसते. शरीराच्या तापमानापेक्षा वृषणाचे तापमान कमी असते.

माहित असावं:

अ) मन उद्दीपित झाल्यावर किंवा कधी कधी झोपेतही वीर्य बाहेर येतं. यात काहीच चुकीचं नाही.

ब) रक्ताच्या 100 थेंबापासून वीर्याचा एक थेंब तयार होतो हा समज साफ चुकीचा आहे.

क) रोज लाखो पुरुषबीजं म्हणजेच शुक्राणू तयार होतात आणि वीर्यातून बाहेर पडतात. त्याला जपून ठेवण्याचे काहीच कारण नाही.

ड) पुरुषबीजाचा स्त्रीबीजाशी संयोग झाला तर गर्भधारणा होते.

इ) एक चमचा(5 मिलिमीटर) वीर्यामध्ये 10 करोड शुक्राणू असतात.

काळजी कशी घ्याल:

 1. जननेंद्रिये रोज स्वच्छ पाण्याने धुवावीत. यासाठी साबण किंवा जंतूनाशके यांची गरज नसते.
 2. साबणामुळे जीवाणूमध्ये नैसर्गिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. कदाचित यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका उद्भवू शकतो. अगदीच वापरायचा असेल तर साधे साबण (कमी रासायनिक) वापरता येतील.
 3. शिश्नावरील त्वचेखालील चिकट भागात घाण साचून राहण्याची शक्यता असते. म्हणून ही त्वचा हळूवारपणे मागे ओढून शिश्नाचे टोक स्वच्छ धुवावे. शिश्न उत्तेजित नसताना ही स्वच्छता करणं जास्त सोपं जातं.
 4. शिश्न आणि वृषण या भोवतालची त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे त्यावरील केस काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ब्लेड किंवा ब्लिचिंगसाठीची रसायने वापरू नये. अगदीच आवश्यकता वाटल्यास कात्रीने काळजीपूर्वक ते केस कापून स्वच्छ करावेत.

केस

वयाच्या 10 व्या वर्षानंतर लैंगिक संप्रेरकं शरीराच्या आकारावर नियंत्रण आणायला सुरुवात करतात. ही संप्रेरकं अँड्रोजन आणि इस्ट्रोजन अशा दोन गटातील असतात. पुरुष आणि स्त्री अशा दोघांच्याही लिगांमध्ये दोन्ही गटातील संप्रेरकं तयार केली जातात. त्यांच्या प्रमाणात फरक असतो. स्त्री शरीरात इस्ट्रोजन तर पुरुषांच्या शरीरात अँड्रोजन जास्त प्रमाणात तयार होतात. अँड्रोजन हे हाडांच्या वाढीसाठी आणि शरीरावरच्या केसांसाठी कारणीभूत असतं. यामुळे पौगांडा अवस्थेत शरीराच्या बऱ्याच भागावर केस यायला लागतात.

दाढी, मिशा येणे, काखेमध्ये, लिंगाजवळ, आणि गुदद्वाराच्या आसपास केस यायला चालू होतात. तसेच वृषणावर सुध्दा केस येऊ लागतात. काही मुलांना छाती आणि पाठीवरही केस येतात. किंवा काही मुलांच्या अंगावर कधीच केस येत नाही. केस केव्हा आणि किती येतील, या गोष्टी अनुवांशिक गुणधर्मावर आधारित असते. काही मुलांना वयाच्या 11 वर्षी तर काहींना 15 वर्षी केस येणं चालू होतं. काही जणांच्या शरीरावर फारसे केस नसतात.

अंगावरच्या केसांचा किंवा दाढीमिशांचा पुरुषत्वाशी थेट संबंध नसतो.

 

 

66 Comments
 1. धीरजकुमार पवार says

  I am satisfied

 2. I Soch says

  Thanks for your response. Please feel free to ask for any other information or queries.

 3. Sachin jadhav says

  सेक्स केल्यानंतर थोड्या वेळाने शिश्नात जळजळ होते .उपाय सांगा

  1. I सोच says

   कृपया योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

   http://letstalksexuality.com/category/sexual-health/

 4. Armam says

  लिंगातून रक्त का येते

  1. I सोच says

   लिंगातून रक्त येत असेल तर कृपया योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 5. Armam says

  हस्तमैथुन करताना

  1. I सोच says

   हस्तमैथुनाविषयी नेमका कोणता प्रश्न आपणाला विचारायचा आहे तो अगदी मोकळेपणाने आणि स्पष्टपणे विचारा. शिवाय वेबसाईटवर हस्तमैथुनाबद्दलचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा. प्रश्नोत्तरे वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/question/

   1. आशिष says

    लिंगाची त्वचा खालीवर होत नाही उपाय सांगावे

    1. I सोच says

     लिंगावरची त्वचा मागे जात नसेल तर समस्या होईलच असं नाही. अनेकवेळा लैंगिक संबंधांच्या सुरुवातीच्या काळामध्ये लिंगावरची त्वचा मागे जाताना थोडाफार त्रास होऊ शकतो. परंतु हळूहळू हा त्रास कमी होत जातो आणि लिंगावरची त्वचा मागे जायला सुरुवात होते. त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. हस्तमैथुन करताना किंवा संभोग करताना लिंगावरची त्वचा मागे न जाता त्रास होत असेल तर अशी त्वचा छोटी शस्त्रक्रिया करुन काढून टाकता येते. याला सुंता करणं असं म्हटल जातं. मात्र यासाठी तज्ञ डॉक्टरांचीच मदत घ्यावी. कारण शस्त्रक्रियेमध्ये स्वच्छता महत्वाची असते. अन्यथा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. सुंता करणे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
     http://letstalksexuality.com/male-circumcision/
     प्रश्नोत्तरे :- http://letstalksexuality.com/question/

  2. वडजे says

   ×
   लीगांची त्वचा खाली होत नाही मला उपाय सांगा

   1. I सोच says

    लिंगाच्या टोकाला एक फुगीर भाग असतो ज्याला शिस्नमुंड म्हणतात. शिस्नमुन्डावर एक त्वचा असते. मुलगा तारुण्यात आल्यावर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही.
    याविषयीचे अनेक प्रश्नोत्तरे वेबसाईट चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक देत आहे.

    http://letstalksexuality.com/question/

    1. वडजे says

     माझी त्वचा लहान पणा पासून मागे येत नाही पूर्ण पने लिंगा वरती आहे.

     1. I सोच says

      लिंगाच्या टोकाला एक फुगीर भाग असतो ज्याला शिस्नमुंड म्हणतात. शिस्नमुन्डावर एक त्वचा असते. मुलगा तारुण्यात आल्यावर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही.
      याविषयीचे अनेक प्रश्नोत्तरे वेबसाईट चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक देत आहे.

      http://letstalksexuality.com/question/

    2. shri sai says

     धन्यवाद

     1. I सोच says

      आम्ही तुमच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकलो याचा आनंद आहे. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर नक्की आणि नि:संकोचपणे विचारा…

   2. अरविंद says

    लिंगाची मागे गेलेली चामडी पुढे येण्यासाठी काय करावे लागेल

    1. I सोच says

     लिंगाची चामडी/त्वचा मागे गेल्यामुळे तुम्हाला काही त्रास होतो का? बालवयापासून शिश्नमुंडावरील त्वचा मागे सरकत नसेल किंवा काही स्थानिक जंतुसंसर्गामुळे जननेंद्रियावर सूज आली असेल किंवा लैंगिक संबंधांद्वारे पसरणाऱ्या आजारांमुळे मागे गेलेली त्वचा पुढे येत नसेल तर अशा व्यक्तींमध्ये सुंता करणं आवश्यक ठरतं. तुम्हाला काय त्रास होतो ते अगदी मोकळेपणाने डॉक्टरांना सांगा ते तुम्हाला पुढील मार्गदर्शन करतील.

     याविषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
     http://letstalksexuality.com/male-circumcision/

     शिवाय वेबसाईटवर याविषयीची अनेक प्रश्नोत्तरे चर्चिली आहेत ती नक्की वाचा.
     http://letstalksexuality.com/question/

 6. Abhijeet says

  खुपच महत्वाची माहिती दिली. धन्यवाद!

  1. I सोच says

   धन्यवाद… तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद… वेबसाईट वाचत जा. तुमच्या सूचना, प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत…

 7. Sanket says

  दररोज हस्तमैथुन केल्याने आयुष्यात काही त्रास होतो का?

 8. आकाश says

  माझ वय १९ वर्ष आहे मीब्रम्हचर्य हि जीवन है या पुस्तकात मी हस्तमैथून गैर आहे पाप आहे असे वाचले , लैगिंक भावही मनात आसने वाईट आणि उत्तेजना कामूकता याला खुप विरोध आहे ह्या पुस्तकातआणि तसेच मी धार्मिक असल्या मुळे आशा अध्यात्मिक पुस्तकाचा प्रभाव माझ्यावर लवकर पडतोसोबतच मला हस्तमैथून करायची पोर्न फ्लिम्स पाहायची सवय आहे से्क्स या विषयात मी रूजलो आहे पन हे पुस्तक वाचल्या पासुन हस्तमैथून व मना मधे स्त्री यांचे गुप्तांग चा विचार करायला घाबरतोय माझ्या साठी आता तरीही शिश्न ताठ राहते मला काय करने योग्य आहे या वयात ब्रम्हचर्य कि हस्तैमथून ??कृपया योग्य मार्गदर्शन करा …

 9. गोविंद says

  मी 30 वर्षाचा आहे मी लहान पानापासून पुरुषांबरोबरच सेक्स केला आहे पण मी गे नाही मी लग्न करणे चुकीचे आहे का

  1. I सोच says

   तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही ‘गे’ नाही असा उल्लेख केला आहे मात्र तुम्ही लहानपणापासून पुरुषांसोबतच सेक्स केला आहे असेही म्हणता. तुमचा लैंगिक कल नेमका कोणता आहे हे ओळखा. लैंगिक कलाविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा. http://letstalksexuality.com/sexual-orientation-and-diversity/. तुम्ही जर समलिंगी असाल आणि समाजासाठी एखाद्या स्त्रीसोबत लग्न करत असाल तर ते तुमच्यासाठी आणि त्या स्त्रीसाठीही त्रासदायक असेल. समलिंगी लैंगिक कल असण्यात काहीही गैर नाही. तुम्ही जसे असाल तसे स्वतःला स्वीकारा आणि योग्य तो निर्णय घ्या. तुमच्या माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
   http://letstalksexuality.com/category/its-perfectly-normal/
   लैंगिक काळाविषयी काही शंका असतील तर ‘ समपथिक ट्रस्ट, पुणे. 020-6417 9112’ येथे अवश्य संपर्क करा.

 10. sagar says

  माझे शिश्न आत खेचत आहे व आकार लहान होत आहे त्याच बरोबर त्वच्या कोरडी होत आहे झोप जास्त आहे कृपया ऊपाय सांगा

  1. I सोच says

   खरंतर लिंगाचा आकार असा लहान होत नाही. त्वचा कोरडी होण्यामागे आणि झोप जास्त असणे यावर मात्र उपचार करता येईल, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 11. akash says

  माझ्या लिंगावरील त्वचा माघे सरकत नाही सारल्यास कामाच्या वेळी स्पश॔ केल्यास खुप त्रास होतो. उपाय

 12. akash says

  माझ्या लिंगावरील त्वचा माघे सरकत नाही

  1. I सोच says

   लिंगाच्या टोकाला एक फुगीर भाग असतो ज्याला शिस्नमुंड म्हणतात. शिस्नमुन्डावर एक त्वचा असते. मुलगा तारुण्यात आल्यावर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही.
   याविषयीचे अनेक प्रश्नोत्तरे वेबसाईट चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक देत आहे.

   http://letstalksexuality.com/question/

 13. Anonymous says

  हस्त मैथु दररोज केलयांने काय होईल

  1. I सोच says

   काहीच होणार नाही. अगदी नैसर्गिक आहे.
   लैंगिक इच्छा होणं आणि हस्तमैथुन करणं अगदी नैसर्गिक आहे त्यात काहीही गैर नाही. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत. हस्तमैथुन केल्याने लिंगामध्ये ताठरता येण्यास काहीही अडचण येत नाही. आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘लेख’, ‘FAQ – शंका समाधान’ तसेच ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
   लेख- http://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
   ‘FAQ – शंका समाधान’: http://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
   प्रश्नोत्तरे :- http://letstalksexuality.com/question/

 14. Rahul says

  वारंवार लघवी पिवळी होणे व गरम तसेच वास येणे

  1. I सोच says

   वैद्यकीय स्वरूपाच्या प्रश्नाचे नेमके उत्तर वेबसाईटवर देणे शक्य नाही त्यामुळे योग्य ते निदान आणि उपचार यसाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 15. nikhil says

  hastmaythun kelyavar viryach baher nahi yet, age 24 ahe…upay sangava

  1. I सोच says

   जर त्रास होत असेल आणि तुमचे सहसा स्खलन होत नसेल तर तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांना भेटा ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील किंवा योग्य त्या डॉक्टरांकडे (सेक्सॉलॉजिस्ट) पाठवतील.
   खरे पाहता ही एक खूप दुर्मिळ स्थिती आहे. बहुतेक पुरुषांची शिघ्र पतनाची समस्या असते. पण वीर्य स्खलनच होत नाही हे सामान्य नाही. याला डिलेड अथवा रीटार्डेड इजाक्युलेशन म्हणतात. याला अनेक कारणं असू शकतात. उदा. तुम्ही काही विशिष्ट प्रकारची औषधे घेत असाल तर त्याचा हा परिणाम असू शकतो. दुसरे म्हणजे वयोमानापरत्वे लिंगातील नसांमध्ये संवेदनशीलता कमी होऊन शिथिलता येते. लिंग पुरेसे ताठर होत नसेल तरीसुद्धा स्खलनात अडथळा येऊ शकतो. एखाद्या ऑपरेशन दरम्यान नसेला इजा पोचणे, दारूचे सेवन, ग्रंथीमधील बिघाड, पुरेशी झोप नसणे, चिंता अशी कारणेही यामागे असू शकतात. तुमच्या बाबत काय कारण असेल हे आम्ही सांगू शकत नाही. पण आमचा सल्ला आहे की जर शक्य असेल तर तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटा अथवा न लाजता तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशाच आणखी प्रश्नांच्या उत्तरांसाठी खालील लिंक्स वर क्लिक करा…

   http://letstalksexuality.com/question/sambhog-veli-lovker-shut-hot-nahi-bai-vaitagun-jate/

   http://letstalksexuality.com/question/partner-lavakar-shant-hot-nahi/

 16. कृष्णा says

  माझा स्पर्म काऊंट 0 आहे मी YouTube वर काही व्हिडीओ बघून अश्वगंधा,सफेद मुसळी,कौच के बीच,शतावरी,चंद्रप्रभा वटी ,शिलाजत सत हे औषधी 2 महिने घेतली पण काही फायदा झाला नाही,त्यानंतर ही सर्व हकीकत एका आयुर्वेदिक वैद्यराज जे स्टोल लावून बसतात त्यांना सांगितली, त्यांनी मला शरीरामध्ये उष्णता असल्या कारणाने वीर्य बनत नाही असे सांगितले.

  तर मी कोणत्या स्पेशालिस्ट कडे जाऊ ते सांगा.आणि आयुर्वेदिक चांगले राहील का दुसरे चांगले राहील हे सुचवा

  1. I सोच says

   जर तुम्हाला तुमच्या वीर्यातल्या शुक्राणूंची संख्या/स्पर्म काउंट माहिती आहे त्याचा अर्थ तुम्ही डॉक्टरकडे जाऊन टेस्ट केल्या आहेत असा अर्थ होतो. त्यामुळं त्याच डॉक्टरनी तुम्हाला शुक्राणूंची संख्या किती असणं गरजेचं आहे किंवा त्यांचं महत्व काय आहे याबद्दलही सल्ला दिला असेलच. तसं पाहता हा प्रश्न तेव्हा उपस्थित होऊ शकतो जेव्हा आपण व आपला जोडीदार मूल जन्माला घालण्याचा विचार करत असाल. वीर्यातील शुक्राणूंची संख्या वाढवण्याच्या किंवा शुक्राणूंची शक्ती वाढवण्याच्या नावाखाली अनेक भोंदू वैद्यराज किंवा झोलाछाप डॉक्टर्स आहेत तसेच बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत परंतु त्यातली बरीचशी फसवी असू शकतात. त्यामुळं अशी कोणतीही औषधं घेण्याअगोदर आपल्या डॉक्टरचा सल्ला घेणे रास्त ठरेल. एखद्या Sexologist चा सल्ला घ्या. तुम्हाला जवळपासचे sexologist माहिती नसतील तर तुमच्या फॅमिली डॉक्टर/ जनरल प्रॅक्टीशनर यांचा सल्ला घ्या ते तुम्हाला सल्ला देतील/योग्य त्या डॉक्टरांकडे पाठवतील

   1. कृष्णा says

    आपण माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले त्याबद्दल धन्यवाद,
    1) 28-29 वर्ष वय असलेल्या माणसाचा सेक्स टाइम किती साधारण किती मिनिट असतो
    2) उंची 5 फूट 3 इंच असलेल्या वरील वयातील माणसाची लिंगाची लांबी किती असायला हवी आणि जाडी किती असते.

    1. I सोच says

     खरंतर साधारण सेक्स टाइम असं काही नसतं. शिवाय उंची, जाडी किंवा इतर बाह्य लक्षणे आणि लिंगाची लांबी जाडी याची एकमेकांशी काहीच संबंध नाही. तसेच लिंगाचा आकार आणि लैंगिक समाधान याचाही काही संबंध नाही. प्रत्येक स्त्री-पुरुषाचा संभोग करण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. दुसर्‍यासोबत तुलना करणं चुकीचं ठरेल. दोन्हीही जोडीदारांच्या उत्कटेच्या पातळीवर संभोग क्रियेचा कालावधी अवलंबून असतो. अनेकवेळा संभोगाचा अर्थ फक्त लिंग योनीमध्ये टाकणं एवढाच घेतला जातो. खरतरं संभोगापूर्वीचा प्रणय देखील तितकाच महत्वाचा असतो. पण याकडं बरेचवेळा दुर्लक्ष केलं जातं. पॉर्न क्लिपमधून दाखवलेला जास्त कालावधीचा संभोग हा कृत्रिम असतो. पण अशा जास्त वेळ चालणार्‍या संभोगाच्या क्लिप्स पाहून मनामध्ये न्यूनगंड तयार होतो. याला छेद देणं आवश्यक आहे. जोडीदारामधील उत्तम परस्पर समजुतदारपणा संभोग क्रियेचा कालावधी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. बधीरता आणणारी विशिष्ट औषधे शिश्नावर लावली तर शिश्नाची संवेदना घटल्याने वीर्यपतन विलंबाने होऊ शकते. परंतु सामान्यतः हे लक्षात ठेवणं चागलं की औषधी उपायांपेक्षा जोडीदारांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हा उत्तम पर्याय आहे. लिंगताठरता येत नसेल किंवा शीघ्रपतन होत असेल तर त्याविषयी माहिती देणारे अनेक लेख वेबसाईटवर प्रकाशित केले आहेत ते नक्की वाचा.

     http://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/
     http://letstalksexuality.com/premature-ejaculation/
     http://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

 17. yoyo says

  maze ling hard zalya vr 6 innch hote …te pa peksha jast hou shakte ka ?ani gf soabt blowjob kartana ti mhanate khup motha ahe….hi size normal ahe ka ?or ya peksha vast vadhavta yete?

  1. I सोच says

   पेनिस साईझ वाढविण्याचा कोणताही नैसर्गिक आणि शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध झालेला उपाय अस्तित्वात नाही. मुळात पेनिस साईझ/ लिंगाचा आकार का वाढवायचा? प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. साधारणपणे लिंग शिथिल असताना ते ६ ते १३ सेंटीमीटर (३-४ इंच) लांब असतं तर ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ (४-५ इंच) सेंटीमीटर एवढी असू शकते. साधारणपणे लिंगाची लांबी १२ सेंटीमीटर असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. लिंग वाकडं असणं, तिरकं असणं, डाव्या किंवा उजव्या बाजुला झुकलेलं असणं हे सर्व अगदी ‘नॉर्मल’ आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
   http://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction

 18. Rohan says

  माझे अंडकोश खालीवर झाले आहे परंतु त्यांचा आकार सारखा आहे. एकाची त्वचा लांबली म्हणुन हे झाले उपाय

  1. I सोच says

   पुरुषांच्या अंडकोषांना वृषणही म्हणतात. पुरुषांना दोन वृषण असतात. हे वृषण त्वचेच्या पिशवीत (वृषणकोष) असतात. दोन्ही वृषण समान आकाराचे नसतात. एक वृषण दुसऱ्यापेक्षा थोडं मोठं असतं व थोडं खाली लोंबत असतं. वयात आल्यानंतर वृषणात टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक तयार होतं. वयात आल्यावर या संप्रेरकामुळे स्नायू बळकट होणं, आवाज बदलणं हे बदल होतात. याच संप्रेरकामुळे वृषणात पुरुष बीजं तयार होऊ लागतात व ही प्रक्रिया पुढे आयुष्यभर चालू राहते.
   पुरुष बीजं तयार होण्यास विशिष्ट तापमान लागतं. हे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा थोडं कमी असावं लागतं. म्हणून हे तापमान सांभाळण्यासाठी खूप थंडी असते तेंव्हा वृषणं शरीराच्या जवळ ओढली जातात व जेव्हा खूप उष्णता असते तेंव्हा वृषणं शरीरापासून दूर केली जातात म्हणजेच जास्ती खाली लोंबतात. विशेष म्हणजे जर वृशाणांना सातत्यानं जास्त तापमान जाणवलं, तर पुरुषबीजांच्या निर्मितीवर विपरीत परिणाम होतो. म्हणून मुलांना सैल चड्डी घालावी. कुस्ती/व्यायाम करणाऱ्यांनी लंगोट घातला तर व्यायाम झाल्यानंतर लंगोट काढून सैल चड्डी घालावी.
   काही त्रास होत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही.

 19. Rohan says

  माझे वय 19 आहे उपाय सांगा

 20. vaibhav says

  मी हस्तमैथुन याआधी करायचो परंतु आता विर्या सोबत काळे ठिपके येतात याचा अर्थ काय ??

  1. I सोच says

   विर्यासोबत काळे ठिपके का येतात किंवा त्याचा अर्थ काय हे सांगता येणार नाही. याचे नेमके कारण तपासून घ्यावे लागेल. याबरोबर तुम्हाला इतर काही त्रास जाणवतो का? जरी एखादे इन्फेक्शन असले तरी यावर इतर आजारांप्रमाणे उपचार उपलब्ध आहेत. यासाठी तुम्ही कोणताही संकोच किंवा लाज न बाळगता प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य राहील.
   हस्तमैथुन ही नैसर्गिक व सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे किंवा परिणाम होत नाहीत.
   हस्तमैथुनाविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
   आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
   ‘FAQ – शंका समाधान’: http://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
   प्रश्नोत्तरे :- http://letstalksexuality.com/question/

 21. रोहन काळे says

  सेक्स करताना माझ्या लिंगाची मागील त्वचा जी लिंगाच्या खलील भागास चिकटलेली असते ती निघाली आहे तर खूप रक्तही निघाले
  तरी उपाय सांगावा

  1. I सोच says

   लैंगिक अवयव हे नाजूक आणि संवेदनशील असतात. सेक्स दरम्यान काही अडचण निर्माण होत असेल आणि त्यामुळे त्यांना दुखापत किंवा इजा झालेली असेल तर कोणतीही लाज किंवा संकोच न ठेवता डॉक्टरांना भेटा. वैद्यकीय उपचार घ्या.

 22. Bharat says

  सर माझे वय ३३ आहे. शिश्नाच्या कातडीमधे पांढरा पदार्थ तयार होतो व शिश्न व कातडी लालसर होते व खाज सुटते.

  1. I सोच says

   ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

 23. Bhavesh says

  Bhavesh
  sir maze vay 24 ahe mazyakadun jast hastmaithun zale ahe ani maze ling(shrishn) davikade vakale ahe tr tyacha parinam mazya pudhachya pidhivar hoil ka?ani honar asel tr mi Kay upchar kele pahije?

 24. संदीप says

  माझे वय 28 आहे. माझ्या लिंगातून पिवळ्या कलरची घाण येत होती तेव्हा मी candid – B नावाची क्रीम वापरली, पण ते परत होत आहे. व या आदी माझ्या लिंगावरची त्वचा मागे जात होती. पण आत्ता मागे जात नाही. मागे न जाण्याचे कारण आणि त्यासाठी उपाय काय आहे.

 25. विलास says

  वीर्य जास्त प्रमाणात निघत आहे

 26. Rohan says

  मी खुप दिवस सतत हस्तमैथुन करतो आता लिंग निट ताठ होत नाही वय 20 आहे उपाय सांगा

  1. I सोच says

   कधी कधी आजारपणात पाळी पुढे ढकलली जाते तर कधी प्रवासामुळे दगदग होऊन पाळी अपेक्षेपेक्षा लवकर येते. प्रत्येकीचं पाळीचं चक्र जसं वेगळं असतं तसंच दोन पाळी चक्रांमध्ये पण फरक पडू शकतो. यासाठी पाळीची लांबी कशी ठरते ते समजून घेऊ या.
   डॉक्टर सांगतात बरोबर 14व्या दिवशी अंडोत्सर्जन होतं आणि 28 व्या दिवशी पाळी येते. पण खरं तर हे पूर्ण सत्य नाही. प्रत्येकीच्या शरीराची आणि पाळीच्या चक्राची गती वेगळी असते.पाळीचक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्वाची घटना असते. एकदा का बीज बीजकोषातून बाहेर आलं आणि गर्भधारणा झाली नाही तर त्यानंतर साधारणपणे 12-16 दिवसांनी पाळी सुरू होते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधीचा काळ मात्र निश्चित असतोच असं नाही. तो बदलू शकतो. प्रवास, मानसिक ताण, औषधोपचार अशा विविध कारणांमुळे हा काळ कमी किंवा जास्त होऊ शकतो. मात्र अंडोत्सर्जन झाल्यानंतर मात्र 16 दिवसात पाळी येते. त्यामुळे लवकर का उशीरा यापेक्षाही पाळीचं चक्र कसं आहे ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं.
   अधिक माहितीसाठी खालील लिंकवर भेट द्या.
   http://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/

  2. I सोच says

   पुरुषांच्या लिंग ताठरतेविषयी अनेक समज-गैरसमज अनेकांच्या मनात असतात. पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं, हे समजून घेऊयात. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू अशा वेळी रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो.
   अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/penis-erection/
   http://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

 27. xyZ says

  मी 2 वर्षापासून सतत हस्थमैथुन करतो आता माझे लिंग निट ताठ होत नाही उपाय सांगा

 28. Satish says

  माझ्या लिंगावरील कातड्यावर पाढंरा डाग आहे.तो घालवण्यासाठी काय आपचार आहेत का.

  1. I सोच says

   आपल्याला नक्की काय झाले आहे हे प्रत्यक्ष निरिक्षणावरुन निदान करणे सोपे जाईल, आपण डॉकटरांना दाखवावे. अन त्यानूसार उपचार करावेत

   जर अजुन काही प्रश्न असतील तर या ठिकाणी न विचारता http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर विचारावेत.

 29. भागीरथ says

  गुदद्वारात लिंग घालणे योग्य आहे काय?

  1. I सोच says

   गुदामैथुनामध्ये कधी कधी गुदद्वाराला आतमध्ये जखमा होण्याची शक्यता असते. योनिमार्गासारखे गुदद्वाराचे स्नायू लवचिक नसल्याने तिथे इजा होऊ शकतात. यासाठी चांगल्या प्रकारचे वंगणयुक्त जेलसारखे पदार्थ वापरणं उपयोगी ठरतं.

 30. Balaji says

  विर्य लालसर रंगाचे येते काय करू ?

  1. I सोच says

   सामान्यत: मानवी वीर्य हे पांढ-या रंगाचे असते, पण राखाडी किंवा पिवळसर वीर्य देखील सामान्य असू शकते. जर विर्याचा रंग रक्तासारखा गुलाबी किंवा लालसर असेल तर त्याला हेमटोस्पर्मिया म्हणतात. यामुळे काही वैद्यकीय समस्या उद्भवू शकते, जर ही समस्या ताबडतोब संपली नाही, तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

   पुढील वेळी या ठिकाणी प्रश्न न विचारता http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर जाऊन प्रश्न विचारावेत.

 31. sagar says

  सर माझ्या लिंगावर पूढच्या बाजूवर बारीक लाल रंगामध्ये पूटकूळ्या आहेत,तर ऊपाय सांगा

 32. P says

  Maze age 20 aahe mi barpur hasthmaithun kelay aani aata maz virya lavkar baher padtay yavar solution sanga

 33. I सोच says

  तुमच्या प्रश्नांच्या समाधानासाठी खालील लिंक ला भेट द्या.
  http://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/
  http://letstalksexuality.com/premature-ejaculation/

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.