माझी पाळी इतकी उशिरा का येते?

8 1,438

मासिक पाळीची लांबी

माझी पाळी फार लवकर येते किंवा माझी पाळी फार उशीराने येते अशी वाक्यं आपण नेहमी ऐकत असतो. काही मुलींची पाळी 21-22 दिवसांनी येते तर काहींना दोन दोन महिने पाळी येत नाही. कधी कधी आजारपणात पाळी पुढे ढकलली जाते तर कधी प्रवासामुळे दगदग होऊन पाळी अपेक्षेपेक्षा लवकर येते. प्रत्येकीचं पाळीचं चक्र जसं वेगळं असतं तसंच दोन पाळी चक्रांमध्ये पण फरक पडू शकतो. यासाठी पाळीची लांबी कशी ठरते ते समजून घेऊ या.

डॉक्टर सांगतात बरोबर 14व्या दिवशी अंडोत्सर्जन होतं आणि 28 व्या दिवशी पाळी येते. पण खरं तर हे पूर्ण सत्य नाही. प्रत्येकीच्या शरीराची आणि पाळीच्या चक्राची गती वेगळी असते. सलमाची पाळी 30-31 दिवसांनी येते तर लिसाची पाळी बरेचदा 40 दिवसांनी येते. प्रियाची पाळी कधी चार आठवड्यांनी येते तर कधी कधी पाच आठवड्यांनी येते. जयाची पाळी 21 दिवसांनी येते. पाळीचक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्वाची घटना असते. एकदा का बीज बीजकोषातून बाहेर आलं आणि गर्भधारणा झाली नाही तर त्यानंतर साधारणपणे 12-16 दिवसांनी पाळी सुरू होते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधीचा काळ मात्र निश्चित असतोच असं नाही. तो बदलू शकतो. प्रवास, मानसिक ताण, औषधोपचार अशा विविध कारणांमुळे हा काळ कमी किंवा जास्त होऊ शकतो. मात्र अंडोत्सर्जन झाल्यानंतर मात्र 16 दिवसात पाळी येते. त्यामुळे लवकर का उशीरा यापेक्षाही आपलं स्वतःचं पाळीचं चक्र कसं आहे ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं.

You might also like More from author

8 Comments

  1. deepali chaudhari says

    mazi mulgi 17 years eadge chi ahe & tichi masik pali 4 te 5 mahinyane yete
    sagle upay karun zale tatpurti farak padtp pan kaya swarupi sathi kay karave
    5 years pasun sagle Dr. karun zale pan ajun kahi farak nahi .
    wet jaast ahe tiche

    1. I सोच says

      मासिक पाळी सुरु झाल्यापासून सुरुवातीच्या वर्षभरात असं होऊ शकतं. पण तुमच्या सांगण्यानुसार हे ४ ते ५ वर्षांपासून सुरु आहे. याविषयी डॉक्टरांचाच सल्ला घेणं योग्य असेल.

  2. kiran says

    Sir mi mazhy fribr 3mahinypurvi sex kelta tithun pudh tila partek mahinyt pali aali pratek mahinyt pali aali pn hay pahinyt pali aali nhi 24tarikh aahe palichi pn ajun aali ny tr ky zhaly ky samjat nhi plz help

    1. kiran says

      Sir plz help. Mi mazhy fri barobar 3 mahinypurvi sex kelta.pali yenych aadhi6 divas aadhi sex kelta.tithun pudha tila partek mahinyt pali aali 3mahine.pn aatachy mahinyt tila 24tarikh aahe palichi pn ajun pali aali nhi plz madat kara ky zhaly kalat nhinhi.

      1. I सोच says

        सेक्स केल्यानंतर पाळी आली असेल व त्यानंतर असुरक्षित लैंगिक संबंध आले नसतील तर गर्भधारणा असण्याचा प्रश्नच येत नाही. गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.
        आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.
        काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
        अधिक माहितीसाठी – http://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि http://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.
        टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

    2. I सोच says

  3. shekhar says

    Majhya waif la 4-5 month ne pali yete ase ka hotey..?

    1. I सोच says

      तुमच्या पत्नीचे वय किती आहे हे समजले असते तर उत्तर देणे सोपे गेले असते. मासिक पाळीचक्र साधारणपणे २२ ते ३५ दिवसांचे असते. कधीकधी पाली अनियमित होऊ शकते किंवा मेनोपॉज म्हणजेच मासिक पाळी जेव्हा बंद होते तेव्हा पाळी अनियमित होऊ शकते. आपल्या शरीराविषयी आणि पाळीचक्राविषयी जागरूक असणं केव्हाही चांगलं. कृपया स्त्रीरोग तज्ञांची मदत घ्या. ते तुम्हाला योग्य उपचार देतील/ सल्ला किंवा मार्गदर्शन करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.