मासिक पाळीमुळे २३ टक्के मुली सोडतात शाळा

0 610

प्रशांत हेलोंडे, लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा: एकविसाव्या शतकामध्ये तंत्रज्ञानामध्ये कितीही प्रगती झाली असली तरी, अद्याप मासिक पाळीबाबत प्रचंड अज्ञान आणि गैरसमज आहेत. देशातील ६० ते ७० टक्के मुली मासिक पाळीदरम्यान शाळेत जात नाहीत. तर, २३ टक्के मुली पहिल्या पाळीनंतर शाळा कायमच्या सोडत असल्याचे धक्कादायक वास्तव देशभरातील सर्वेक्षणातून समोर आले आहे.

मासिक पाळीच्या गैरसमजाबाबत महाराष्ट्र तथा  अन्य राज्यांमध्ये सर्वेक्षण घेण्यात आले आहे. या सर्व सर्वेक्षणांचे निष्कर्ष एकत्र करून म. गांधी इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी ही टक्केवारी काढली आहे. आजही ४३ टक्के मुली मासिक पाळीचे स्वच्छता व्यवस्थापन करत नाहीत. तर, ८८ टक्के मुली मासिक पाळीमध्ये राख, वृत्तपत्र, वळलेली झाडाची पाने वा भुसा, वाळू वापरतात. यामुळे आजार ताठ इन्फेक्शन बळावले आहे. देशातील ७७ टक्केपेक्षा अधिक मुली व स्त्रिया पाळीदरम्यान जुने कापड वारंवार वापरतात. देशातील १२ टक्के  महिलाच ‘सॅनिटरी नॅपकीन’ वापरत असल्याचे काही सर्वेक्षणातून समोर आले आहे. ५५ टक्के मुलींना मासिक पाळी नैसर्गिक व सामान्य आहे, हे माहित नसते तर १० टक्के मुलींना पालीची धास्ती वाटते. हे गैरसमज दूर करण्यासाठी मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन विद्यार्थ्यांना शिकविण्याचे निर्देश होते; पण त्यांना केराची टोपली दाखविली.

  • शालेय विभाग अनभिज्ञ

मासिक पाळीबाबत शाळांतून मार्गदर्शन व्हावे, असे मंत्रालयाने सुचविले. शिक्षणाशी संबंधित प्रत्येकाची जबादारी निश्चित केली; पण दोन वर्षात केंद्राच्या शालेय विभाग व राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषदेने पावले उचलली नाहीत. विद्यार्थ्यांना कुठल्या इयत्तेत हा विषय शिकवावा हेदेखील शालेय विभागाला माहित नाही. यामुळे सीबीएसई, एन्सीईआरटीला दिशानिर्देशही दिले नसल्याचे आरटीआयमध्ये उघड झाले.

  • किशोरवयीन मुलींना पाळीदरम्यान लहानसा आधार, योग्य माहित दिल्यास अज्ञान व गैरसमजुती दूर होऊन समस्या टाळू शकतात. त्यांच्या दैनंदिन जीवनात, शिक्षणात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. यामुळे अभ्यास क्रमात याचा अंतर्भाव करणे अत्यावश्यक आहे. – प्रा. डॉ. इंद्रजित खांडेकर

 

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.