१३ वर्षांच्या मुलीच्या गर्भपातास परवानगी

0 318

 

Maharashtra Times | Updated: Sep 6, 2017, 05:15PM IST

मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली

बलात्कार पीडित १३ वर्षाच्या मुलीला गर्भपात करण्यास अखेर सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. ही पीडित मुलगी ३१ आठवड्याची गर्भवती आहे. पीडित मुलीचे वय आणि तिला होणारा त्रास याबाबी लक्षात घेऊन तिला गर्भपात करण्यास मंजुरी देत असल्याचे कोर्टाने म्हटले.

सुप्रीम कोर्टाच्या न्या. एस. ए. बोबडे आणि न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने याआधी जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. हे पॅनेल मुलीची वैद्यकीय तपासणी करून गर्भपात करण्याबाबत सुप्रीम कोर्टाला अहवाल देणार होते. मुलीच्या वैद्यकीय अहवालानंतर अखेर सुप्रीम कोर्टाने मुलीचा गर्भपात करण्यास मंजुरी दिली. पीडित मुलीवर तिच्या वडिलांच्या परिचयातील २३ वर्षीय आरोपीने बलात्कार केला होता.

http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/sc-allows-medical-termination-of-31-week-old-pregnancy/articleshow/60391724.cms

Leave A Reply

Your email address will not be published.