कंडोम : समज-गैरसमज

0 1,097

 

आपल्या वेबसाईटवर आपण गर्भनिरोधन व लिंग सांसर्गिक आजारांपासून वाचण्यासाठी कंडोम किती उत्तम व फायदेशीर मार्ग आहे हे नेहमी सांगत असतो. रोजच्या व्यवहारात कंडोमबाबत बोलणं आता तसं सहज झालेलं दिसतं. पण आपल्याला खरं तर कंडोमबद्दल जितकी योग्य  माहिती आहे त्या पेक्षा त्याबद्दल अनेक गैरसमज आणि अर्धवट माहिती अधिक असते असे खूप वेळा लक्षात येते आहे. तेव्हा आज आपण कंडोमबाबतचे काही समज, गैरसमज वा चूकीच्या धारणा ज्या लोकांच्या मनात असतात त्यामागचे सत्य काय आहे हे समजून घेऊयात.

समज १ : एकाच आकाराचे कंडोम सर्वानाच फिट बसतात.

मोठ्या प्रमाणात लोकांना वाटते की, लिंगाचा आकार काही का असेना एकाच आकाराचे कंडोम सर्वाना फिट बसतात. जरा विचार करा, सगळ्या पुरुषांनी एकाच मापाच्या पॅन्ट घातल्या तर? बसतील का? नाही ना बसणार?

खरं तर कंडोम वेगवेगळ्या आकारात तयार केलेले असतात. जर आपण चुकीच्या मापाचा कंडोम वापरला/घातला तर तो फाटू शकतो, संबंधांच्या वेळी निसटू शकतो किंवा आपल्या जोडीदाराच्या लैंगिक अवयवांच्या आतमध्येही राहू शकतो. अन कुणालाही असं व्हावंसं वाटत नाही. तेव्हा आपण आपल्या लिंगाच्या आकारानूसार, आपल्याला हव्या असणा-या मापाचा, कोणता कंडोम आहे हे शोधायला हवे. (कंडोमच्या मापाबाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंकला भेट देऊ शकता : https://www.condomdepot.com/condom-information/condom-size-chart/)

समज २ : कंडोममुळे सेक्स करण्याची मजाच निघून जाते.

कंडोम वापरल्याने मजा येत नाही किंवा आनंद मिळत नाही असं काही नाही. तुम्ही कंडोमचा वापर करुन तुमच्या लैंगिक क्रियांमध्ये अजून विविधता आणू शकता, सेक्स अजून रंजक बनवू शकता.

तुम्हाला माहिती असेलच की, कंडोममध्ये खूप सारे आकार, रंग, पोत आणि फ्लेवर्स मिळतात. या वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद तुम्ही घेऊ शकता ना!. रोज वेगळे वेगळे रंग, फ्लेवर्सचे कंडोम वापरुन सेक्समध्ये नाविन्य आणू शकता की नाही! अन ज्या पुरुषांना शिघ्रपतनाची समस्या आहे,  त्यांच्यासाठी तर हे फार फायदेशीरच आहे.

थोडक्यात काय तर कंडोम वापरल्याने लैंगिक सुख मिळतेच, तसेच नको असणारी गर्भधारणा आणि लिंगसांसर्गिक आजारांची भिती राहत नाही हे महत्वाचे.

समज ३ : एकापेक्षा दोन जास्त फायद्याचे असतात.

असं करण्याची काही गरज नाही. खूप पुरुषांना असंच वाटतं की दोन कंडोम म्हणजे जास्त प्रोटेक्शन मिळेल. पण असं काही नसतं. यामुळे जास्त धोका वाढतो.

एकाच वेळी दोन निरोध लावल्याने एकतर निरोध फाटू शकतो वा सटकू शकतो. अन त्यामुळे सुख, आनंद न मिळता मन:स्तापच होऊ शकतो. खरंतर एकच कंडोम पुरेसा सुरक्षित आहे.

थोडक्यात काय तर दोन पुरुष कंडोम असोत वा एक पुरुष व एक महिला कंडोम असो, हे एकाच वेळी वापरणं फायद्याचे नाही. ते जास्त त्रासदायकच आहे व त्यामध्ये पैसाही वाया जातो तो निराळाच.

समज ४ :  कंडोम वापरतो म्हणजे मी पूर्णपणे सुरक्षित आहे.

हे काही खरे नाही, खूप वेळा कंडोमचे पाकीट फोडताना ते नीट फाडले गेले नाही किंवा कंडोम लिंगावर चढवताना आतली हवा पूर्ण न काढता चढवला तर निरोध फाटू शकतो. कंडोमची कालबाह्यता तारीख (Expiry date) न तपासता वापरले गेले किंवा कंडोमसोबत असणारे वंगण संपलेले आहे व तरीही वापरला तर कंडोम पूर्णपणे सुरक्षित राहत नाही.

समज ५ :  ज्या लोकांना रबराची ऍलर्जी आहे ते कंडोम नाही वापरु शकत.

नको असणारी गर्भधारणा व लिंग सांसर्गिक आजारांपासून वाचण्यासाठी कंडोम फार उत्तम व फायदेशीर मार्ग आहे. पण ज्यांना रबराची ऍलर्जी आहे ते मेंढीच्या कातडीपासून तयार केलेले कंडोम किंवा पॉलीयूरीथेन पासून बनलेले कंडोम वापरु शकतात.

पॉलीयूरीथेन पासून बनलेले कंडोम हे रबरी कंडोमला चांगला पर्याय आहे. पण हे कंडोम जरा पातळ व महाग असतात. याची एक चांगली बाजू ही पण आहे की, यामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराचा उबदारपणा जास्त छान अनभवू शकता.

पॉलीयूरीथेन पासून बनवलेले कंडोमसुद्धा रबरापासून तयार केलेल्या कंडोम सारखेच नको असणारी गर्भधारणा व लिंग सांसर्गिक आजारांपासून वाचवतात. हे जरी खरे असले तरी हे जास्त पातळ असल्यामुळे सटकण्याची वा फाटण्याही शक्यता अधिक असते. तसेच मेंढीच्या कातडीपासून बनवलेल्या कंडोममध्ये छोटी न दिसणारी छिद्र (pores) असल्या कारणाने ते गर्भधारणा रोखू शकतात पण लिंग सांसर्गिक आजारांपासून रक्षण नाही करु शकत हे लक्षात ठेवायलाच हवे.

समज ६ :  जर वर्जिन आहात तर कंडोम वापरण्याची काही गरज नसते.

गरज तर असतेच ना!

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सेक्स करता, तेव्हा गर्भधारणा व लिंग सांसर्गिक आजार होण्याची शक्यता असतेच. त्यामुळे नको असणारी गर्भधारणा व लिंग सांसर्गिक आजारांपासून वाचण्यासाठी कंडोम वापरणे हाच एक पर्याय महत्वाचा आहे आणि हो कंडोम पुरुषांसाठी व महिलांसाठीही मिळतात.

समज ७ :  संबंध करताना कंडोम महिलांच्या योनीमध्येच राहिला, तर तो महिलांच्या गर्भाशयात वा योनीत राहू शकतो. 

जर कंडोम लिंगावर चढवताना किंवा महिला कंडोम लावताना नीट लावला तर, तो आतमध्ये राहण्याची शक्यता फार कमी होते. आणि जरी तसे झाले तरी, त्याला योनीतुन बाहेर काढणे सोपे आहे त्यात घाबरण्यासारखं काही नाही. तुम्ही तुमच्या हाताने काढू शकता. जर तुम्हाला काढणं शक्य नाहीच झालं तर डॉक्टरांची मदत घेऊ शकता.

जर असे काही झाले तर कंडोममधली पुरुषबीजे (Sperms) योनीमध्ये जाण्याची शक्यता असते, म्हणून इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टीव पिल्स (http://letstalksexuality.com/ecp/) घ्यायला विसरु नका.

संदर्भ : https://safersexfairy.wordpress.com/2016/09/13/common-condom-myths/

https://lovematters.in/hi

चित्र साभार :

Die WAHRHEIT über KONDOME!

https://www.condomjungle.com/condoms/

लेखांक – १ : निरोध वापरण्याची योग्य पद्धत

 

लेखांक – २ : निरोध वापरण्याची योग्य पद्धत

 

लेखांक – ३ : मौखिक/तोंडाचा कंडोम (डेंटल डॅम)

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.