अलैंगिकता

393
Shiv asked 11 months ago

मी एक समलैंगिक मुलगा (gay) आहे. माझा स्वभाव मुलीसारखा आहे. शरीराने मी पूर्ण पुरुष आहे. पण मनाने मात्र स्त्री सारखा स्वभाव आहे. मला मुलांविषयी आकर्षण वाटते. पण लैंगिक आकर्षण कमी वाटते. म्हणजे anal sex, oral sex करू वाटत नाही. फक्त mutual masturbation, hug etc करू वाटतं. म्हणजे माझ्यामध्ये sexual attraction नाहीये का? मी अलैंगिक आहे का?

1 Answers
lets talk sexuality answered 11 months ago

हस्तमैथुन करणे, मिठी मारणे हे देखील लैगिक आकर्षणाचा भाग आहेत त्यामुळे तू अलैंगिक आहेस असे म्हणता येणार नाही. तुला जे वाटते त्यात काहीही गैर किंवा अनैसर्गिक नाही. लैंगिक आकर्षण म्हणजे फक्त लैंगिक संबंध नाहीत, तर त्याहून खूप जास्त आहे. स्वतःच्या आवडी निवडी, इच्छा विचार, बंधनं अशा सगळ्या गोष्टी लैंगिक आकर्षणाशी संबंधित असतात. काही जणांसाठी लैंगिक कल म्हणजे लैंगिक आकर्षण असेल तर काही जणांना मनाप्रमाणे राहणं, कपडे घालणं, व्यक्त होणं म्हणजे लैंगिक आकर्षण असू शकेल. प्रत्येक व्यक्तीच्या लैंगिकदृष्ट्या व्यक्त होण्याच्या पदधती वेगवेगळ्या असतात. तुला मुखमैथुन, गुदमैथुन आवडत नाही, हस्तमैथुन करायला, मिठी मारायला आवडते ही तुझी वैयक्तिक निवड आहे आणि हे अगदीच स्वाभाविक आहे. कदाचित अशाच परिस्थितीतून अनेकजण जात असतील. त्यांना या प्रश्नाच्या उत्तरामुळं कदाचित मदत होईल. समलैंगिक असण्यामध्ये काहीही चूकीचं नाही. तुला मुलांविषयी आकर्षण आहे, हे अगदीच नैसर्गिक आहे, पण तुझ्या प्रश्नातून तुझे वय लक्षात येत नाहीये, कायद्याने १८ वर्षे वयाखालील व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवणे किंवा लैंगिक वर्तन करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्याच्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा आहे.

अधिक माहितीसाठी खाली काही लिंक देत आहोत. त्याच्यावर क्लिक करून तेथील माहिती वाच… नक्की मदत होईल. तसेच पुण्यात समपथिक नावाची संस्था समलैंगिक आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी अनेक कार्यक्रम राबविते आणि त्यांच्या अधिकारांचे मुद्दे घेऊन काम करते. तुला तिथे सर्वप्रकारची मदत मिळेल. बिंदूमाधव खिरे हे ती संस्था चालवतात आणि या विषयावर संवेदनशीपणे, मुलभूत काम करणाऱ्या भारतातील काही लोकांपैकी ते आहेत. तुला त्यांना प्रत्यक्ष बोलता येईल. त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे ९७६३ ६४० ४८०. सोमवारी ८ – ९ संध्याकाळी या वेळेत फोन कर.