आईचे दूध

1,043
Rohi asked 4 months ago

ब्रा घातल्याने आईच्या दुधावर काही परिणाम होतो का?

1 Answers
let's talk sexuality answered 4 months ago

ब्रा खूप घट्ट आणि सिन्थेटिक कापडाची असेल तर अंगावर पाजणाऱ्या मातांना स्तनांना त्रास होऊ शकतो. मात्र त्याचा दुधावर परिणाम होत नाही. दूध येण्याची प्रक्रिया मेंदूतील रसायनांशी आणि बाळाच्या दूध पिण्याच्या क्रियेशी संबंधित आहे.

तरीही शक्य असल्यास सर्वच स्त्रियांनी, अंगावर पाजणाऱ्या किंवा न पाजणाऱ्या, सुती किंवा होजियरी कापडाची ब्रा वापरावी. फार घट्ट वापरू नये तसंच रात्री झोपताना शक्यतो ब्रा काढून झोपल्यास आराम मिळू शकतो.