एखाद्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवत असताना दोघांचीही इच्छा, संमती आणि सुरक्षितता महत्वाची आहे. समोरच्या व्यक्तीची देखील तुमच्या सोबत सेक्स करण्याची इच्छा असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आता समोरच्या स्त्रीची तुमच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा आहे की नाही हे तुमचं तुम्हालाच शोधावं लागेल. पण जरा जपून. एखाद्या स्त्रीला माझ्याशी लैंगिक संबंध ठेवशील का? असे जर विचारले आणि तिला ते आवडले नाही तर मात्र संभावित परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. शिवाय एखाद्या स्त्रीसाठी तिच्या इच्छेविरुद्ध असं विचारणं हा लैंगिक छळ ठरू शकतो. त्यामुळे जे काही कराल ते विचारा अंती करा शिवाय संभावित परिणामांची तयारी ठेऊन.
दोघांचीही तेवढीच इच्छा, ओढ आणि संमती आहे का? तसेच लैंगिक संबंध सुरक्षित आहेत का हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. फसवणूक करून, खोटं बोलून, जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. अजुन एक लैंगिक संबंध ठेवताना दोघेही सज्ञान (१८ वर्ष पूर्ण) असणे महत्वाचेच आहे. कारण अशा व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो, जरी मुलीची संमती असली तरीही.
सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आवश्यक आहे. लैंगिक ज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता या गोष्टी लैंगिक सुखास कारणीभूत ठरतात.
लैंगिक इच्छा होणं अगदी स्वाभाविक आहे. ज्या लोकांना प्रत्यक्ष लैंगिक संबंध ठेवणं शक्य नसतं ते हस्तमैथुन करतात आणि त्यात काहीही गैर नाही.
अधिक माहितीसाठी खालील लिंक्सवरील लेख वाचा.
Please login or Register to submit your answer