गर्भ आहे का नाही

280
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsगर्भ आहे का नाही
J asked 8 months ago

मी माझ्या gf बर   सेक्स केला तेव्हा तिची मासिक पाळी होऊन 8 दिवस झाले होते

पण तिला भीती वाटतेय की गर्भधारणा झाली आहे

आम्ही तेव्हा गर्भनिरोधक वापरले होते

आणि सेक्स नंतर वीर्य 10 मिनिट नंतर बाहेर काढले

होते

आम्ही। प्रेग्नन्सी टेस्ट करावी का ?

1 Answers
lets talk sexuality answered 8 months ago

मासिक पाळीच्या चक्रामधल्या काही दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. प्रत्येक स्त्रीसाठी पाळीचं चक्र वेगवेगळं असतं. गर्भधारणेसाठी एक शुक्राणू देखील पुरेसा असतो त्यामुळे योग्य काळजी घेणे म्हणजेच गर्भनिरोधक वापरणे गरजेचे असते.

सेक्स झाल्यानंतर तुमच्या मैत्रिणीची मासिक पाळी चुकली आहे का? कारण सेक्स नंतर मासिक पाळी चुकणे हे गर्भधारणेचे एक कारण आहे. सेक्स दरम्यान तुम्ही गर्भनिरोधक वापरलेले आहे आणि तुमच्या मैत्रिणीची मासिक पाळी चुकली नसेल तर गर्भधारणा होण्याचे काही कारण नाही. मासिक पाळीची तारीख उलटून गेली असेल तर मात्र प्रेग्नसी टेस्ट करा.

गर्भधारणा झाली असेल आणि मुल नको असेल तर वैद्यकीय सल्ल्याने गर्भपात करणे हा एकमेव सुरक्षित मार्ग आहे. कृपया घरगुती उपाय किंवा इतर अवैद्यकीय गोष्टींना बळी पडू नका.

गर्भधारणा नक्की कशी होते, गर्भनिरोधके व गर्भपात याविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

गर्भधारणा कशी होते: http://letstalksexuality.com/conception/

गर्भनिरोधके: http://letstalksexuality.com/contraception/

गर्भपात आणि मर्जी हेल्पलाईन: http://letstalksexuality.com/helpline-abortion/