संबंध झाल्यानंतर योनी लाल होते व कंड खुप येतो मागून जात नाही.

501
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसंबंध झाल्यानंतर योनी लाल होते व कंड खुप येतो मागून जात नाही.
sangeetakawture@gmil. asked 9 months ago
1 Answers
I सोच answered 9 months ago

तुम्हाला नेमकं काय विचारायचं आहे याचा बोध होत नाही. योनी लाल होण्यासोबतच योनीला खाज सुटणे, पांढरट आणि आंबट वास येणारा स्राव, लघवी करताना जळजळ किंवा लैंगिक संबंधांच्या वेळेस वेदना होणे असे काही होत असेल तर ताबोडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा काळजी करण्याचे कारण नाही.

याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी http://letstalksexuality.com/reproductive-tract-infections/या लिंकवरील लेख वाचा.

अशी जंतुलागण झाली तर ती निश्चितपणे बरी करता येऊ शकेल. जोपर्यंत जंतुलागण जात नाही तोपर्यंत शक्यतो लैंगिक संबंध ठेऊ नका. अशा आजारांमध्ये लैंगिक संबंधांतून दोन्ही जोडीदाराला आजार होण्याची शक्यता असते म्हणून दोघांनी उपचार घेणे आवश्यक आहे. आजार न लपवता, कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता मोकळेपणाने डॉक्टरांशी बोला आणि लवकरात लवकर उपचार घ्या.

तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले नसेल तर कृपया तुमचा प्रश्न स्पष्टपणे आणि विस्ताराने विचारा म्हणजे आम्हाला उत्तर देणं सोप्पं जाईल. लैंगिकतेच्या विविध पैलूंविषयीचे प्रश्न वेबसाईटवर चर्चिले आहेत ते वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

‘FAQ – शंका समाधान’: http://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- http://letstalksexuality.com/question/