तुम्ही पहील्यासारखंच दररोज एक तरी प्रश्नाचे उत्तर अपडेट का करत नाहीत? १५-१५ दिवस तेच तेच प्रश्न दिसतात मी रोज साईट चेक करतो सेक्सबद्दल खुप माहीती मिळते जी इतरञ कोठेही नाही. काही प्रश्न अश्लिल म्हणून गायब करीत जाऊ नका. माइया मैत्रिणीच्या काही प्रश्नांची ऊत्तरे दिली नाहीत तिने जरा बिनधास्तपणे विचारलं होतं.

575
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsतुम्ही पहील्यासारखंच दररोज एक तरी प्रश्नाचे उत्तर अपडेट का करत नाहीत? १५-१५ दिवस तेच तेच प्रश्न दिसतात मी रोज साईट चेक करतो सेक्सबद्दल खुप माहीती मिळते जी इतरञ कोठेही नाही. काही प्रश्न अश्लिल म्हणून गायब करीत जाऊ नका. माइया मैत्रिणीच्या काही प्रश्नांची ऊत्तरे दिली नाहीत तिने जरा बिनधास्तपणे विचारलं होतं.
komal dage@gmil.com asked 9 months ago
1 Answers
let's talk sexuality answered 9 months ago

बिनधास्तपणे विचारणे आणि अविचाराने, आपल्या काल्पनिक जगातील काल्पनिक बाबींवर मत देऊन त्यावर आमचे मत विचारणे वेगळे आहे भाऊ. शिवाय आपण जी भाषा आणि टर्म्स वापरतो त्या एकूण महिला वर्गासाठी मानहानीकारक आहेत का हे पाहणेही आवश्यक आहे. ही वेबसाईट लैंगिकतेशी संबंधित सकारात्मक मूल्य उदा. समानता, संमती, सुरक्षितता, विविधता इत्यादीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आहे. जे प्रश्न जेन्युईन असतात त्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर देण्याचे आजपर्यंत आम्ही टाळलेले नाही. त्यामुळेच मागच्या तीन एक वर्षात आम्ही तीन एक हजारावर प्रश्नांना उत्तर दिलेले आहेत.