नपुंसक म्हणजे नेमके काय?आणि मी आजवर 4 ते 5 वेळा लैंगिक संबंध करायचा प्रयत्न केला परंतु माझे लिंग कमी ताठर होत होते त्यामुळे मी सेक्स करूच शकलो नाही.मला आता सेक्स ची भीती वाटायला लागलीय,वय 30 वर्षे आहे आणि लग्न पण करावंसं वाटत नाही आता.माझ्यात अतिहास्तमैथुनमुळे नपुंसकत्व तर नसेल ना आले?प्लीज मला हेल्प करा आणि सविस्तर माहिती द्या.

377
प्रश्नोत्तरेCategory: Private Questionनपुंसक म्हणजे नेमके काय?आणि मी आजवर 4 ते 5 वेळा लैंगिक संबंध करायचा प्रयत्न केला परंतु माझे लिंग कमी ताठर होत होते त्यामुळे मी सेक्स करूच शकलो नाही.मला आता सेक्स ची भीती वाटायला लागलीय,वय 30 वर्षे आहे आणि लग्न पण करावंसं वाटत नाही आता.माझ्यात अतिहास्तमैथुनमुळे नपुंसकत्व तर नसेल ना आले?प्लीज मला हेल्प करा आणि सविस्तर माहिती द्या.
आकाश asked 2 weeks ago

1 Answers
I सोच answered 7 days ago

मूल जन्माला घालू शकण्याची क्षमता नसणे म्हणजे नपुंसकत्व असा साधारणपणे अर्थ घेतला जातो. पुरुषाच्या संदर्भात अंडकोषात पुरुषबीजांची निर्मिती न होणे, पुरेशा प्रमाणात न होणे ई कारणांनी नपुंसकत्व येऊ शकते. पण त्या सोबतच आपल्या इथे लैंगिक संबंध न करता येणे, ताठरता न येणे, स्टॅमिना कमी असणे, स्त्री जोडीदाराला लैंगिक आनंद देता न येणे अशा खऱ्या-खोट्या अनेक स्थितीसाठी हा शब्द वापरला जातो.

लिंगाला ताठरता न येणे ही स्थिती अनेक कारणांमुळे येऊ शकते. खाली काही लेखांची लिंक देत आहे. ती वाचा. तुमच्या बाबत काय कारण आहे ते ओळखा. हस्तमैथुनामुळे असे होत नाही. काळजी करू नका. शिवाय लैंगिक संबंधांना घाबरण्याची काही आवश्यकता नाही. जवळच्या एखाद्या डॉक्टरांची किंवा सेक्सोलॉजिस्ट ची मदत घ्या.

http://letstalksexuality.com/question/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%AF-29-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%89%E0%A4%A8-1-%E0%A4%AE/

http://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

http://letstalksexuality.com/sexual-pleasure/

http://letstalksexuality.com/sexual-health/

You might also like More from author