नसबंदी

259
गर्भधारणा asked 1 month ago

जर बायको चे ऑपरेशन केल्यानंतर  मुल नको आहे पण  सेक्सचा आनंद घ्यायचा   आहे परत गर्भधारणा नको आहे तर घेऊ शकतो का

व मुल हवे असल्यास परत गर्भधारणा होऊ शकते का?

1 Answers
let's talk sexuality answered 1 month ago

कसलं ऑपरेशन ?
जर मूल न होण्यासाठी करावे लागणारे ऑपरेशन बाबत बोलत आहात काय?
जर हे ऑपरेशन केलं तर मूल होणार नाही कारण त्यासाठिच तर हे केलेले असते. जर परत मूल हवे असल्यास पुन्हा ऑपरेशन करावे लागेल व तरीही मूल राहिल याची शाश्वती देता येत नाही. तेव्हा आधीच विचार करा व त्यानंतर ऑपरेशन करुन घ्या.
अन ऑपरेशन नंतर संभेग सुखात काहीही कमीपणा येत नाही. तुम्ही दोघेही पूर्वीसारखाच आनंद घेऊ शकाल.
खरं तर बाईने ऑपरेशन करण्यापेक्षा पुरुषांनी केले तर ते फार साधे, सोपे अन लवकर उरकणारे असते. अन त्यासाठी सरकार पैसे पण देते. अधिक माहितीसाठी काही लोकांनी त्यांचे अनुभव सांगितलेले त्याची लिंक सोबत देत आहोत.
http://letstalksexuality.com/vasectomy/
http://letstalksexuality.com/nasabandi-kelayas-vhay/
http://letstalksexuality.com/family-planning-and-women/