नेटवर काही पोर्नसाईट वर दाखवतात कि, लिंगवर्धक स्प्रे, गोळ्या, औषध यामुळे लिंग आठ इंच लांब व तिन इंच जाड होते पैसे परतीची ग्यारंटी देतात फायदा न झाल्यास, हे खंर असतं का ?

244
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsनेटवर काही पोर्नसाईट वर दाखवतात कि, लिंगवर्धक स्प्रे, गोळ्या, औषध यामुळे लिंग आठ इंच लांब व तिन इंच जाड होते पैसे परतीची ग्यारंटी देतात फायदा न झाल्यास, हे खंर असतं का ?
anil kature@gmil.com asked 4 weeks ago
1 Answers
lets talk sexuality answered 4 weeks ago

लिंगवर्धक स्प्रे, गोळ्या, औषध यामुळे लिंगाचा आकार मोठा होत नाही. अशा फसव्या व खोट्या जाहिरातीवर बंदी यायला हवी आहे. खरं तर पुरुषांच्या लिंगाचा आकार थोडा मोठा करण्याचा शस्त्रक्रिया हा एकमात्र मार्ग आहे, परंतु त्याचे परिणामदेखील खूप सामान्य आहेत. त्याने खूप काही मोठा फरक दिसत नाही.

अन लिंगाचा आकार मोठा हवा तरी कशाला? पॉर्न क्लिप्स किंवा अशास्त्रीय पुस्तकांमध्ये अनेकदा चुकीची माहिती दिली जाते. त्यामध्ये संभोगाविषयी अनेक अतिरंजित कल्पना असतात.

लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्त्वाचा आहे हे सांगणारी लिंक सोबत देत आहोत. नक्की वाचा व लेखा खाली आपली प्रतिक्रिया आवर्जुन द्या.

http://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/