पतीचे लिंग

1,695
Bab asked 6 months ago

नमस्तेमाझे 1 महिन्यापूर्वी लग्न झाले आहे मी आणि माझे पती संबंध करताना माझ्या पतीच्या लिंगावरील त्वचा जास्त मागे जात नाही थोडीशी जाते मागे जर ती त्वचा जास्त मागे जात नसेल तर काही problem तर होत नाही ना आणि संबंध करताना ती त्वचा किती मागे जायला पाहिजे

1 Answers
let's talk sexuality answered 6 months ago

लिंगाच्या टोकाला एक फुगीर भाग असतो ज्याला शिस्नमुंड म्हणतात. शिस्नमुन्डावर एक त्वचा असते. मुलगा तारुण्यात आल्यावर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात.
फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. तुमच्या पतीला संभोगाच्यावेळी त्रास होतो का विचारा जर अशी अडचण असल्यास डॉक्टरांकडून तपासून घ्या.
डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही. योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त योग्य असेल.
सुंता विषयी अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा http://letstalksexuality.com/male-circumcision/